Site icon InMarathi

“मी पैज लावून सांगतो कोरोनाची तिसरी लाट येणार नाही” मार्केटच्या तज्ञाची भविष्यवाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेली दीड वर्षं ठाण मांडून बसलेला कोरोना जायचं काही नाव घेत नाहीये. कित्येक देशात लसीकरण पूर्ण होऊन ते देश पुन्हा रुळावर यायला सुरुवात झाली आहे, पण भारतात अजूनही काही केल्या कोरोनाची भीती कमी होताना दिसत नाहीये!

आता तर फक्त कोरोनाच नाही तर त्याच्याशी संबंधित म्युकरमायकोसिस, पांढरी, हिरवी बुरशी अशा वेगवेगळ्या आजरांनी थैमान घातलं आहे. अजूनही भरतात कोरोना रुग्ण सापडत आहेत, दर जरी कमी असला तरी लसीकरण पूर्ण होत नसल्याने तो आकडा वाढतोय.

या संपूर्ण दीड वर्षात लॉकडाउनला सामोरं जावं लागलं, उद्योगधंदे ठप्प पडले, बिझनेस लॉबी पार झोपली. कर्ज, हफ्ते, भाडं हे सगळं भरता भरता व्यापारांच्या तोंडाला फेस यायची पाळी आली. असं म्हणतात की या लॉकडाउनमुळे आपला देश २५ वर्षे मागे गेलाय.

 

 

आता कुठे यातून सगळे व्यापारी आणि सामान्य जनता सावरू बघत आहे तोच सध्या आणखीन एका चर्चेला पेव फुटलेलं आपल्याला दिसेल ते म्हणजे ‘कोरोनाची तिसरी लाट’!

हे ही वाचा जगाला वेठीस धरणा-या या संसर्गजन्य रोगाला “COVID-19” हे नाव मिळण्याची प्रक्रिया नक्की वाचा

कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे अशा मथळ्याच्या बातम्या आपल्याला टीव्ही, वृत्तपत्र, सोशल मिडीया सगळीकडे पाहायला मिळत आहेत. न्यूज चॅनलवाले तर मसाला लावून लोकांना घाबरवायचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

एकीकडे लसीकरण सुरू आहे आणि या सगळ्या आर्थिक संकटातून बाहेर पडणारा सामान्य नागरिक किंवा व्यापारी या अशा बातम्या बघून पुन्हा डिप्रेस होतोय.

मात्र काळजी नसावी चक्क स्टॉक मार्केटच्या अत्यंत विश्वासू माणसाने एक वेगळीच घोषणा केलेली आहे.

मुंबईच्या दलालस्ट्रीटच्या शेयर मार्केटमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या अरबोपती राकेश झुनझुनवाला यांनी हे स्पष्ट केलं आहे की “कोरोनाची तिसरी लाट भारतात येणारच नाही!”

 

 

CNBC TV18 या चॅनलवर मुलाखत देताना राकेश यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असं भाकीत व्यक्त केलं आहे. एवढंच नाही तर ते यावर स्वतःच्या पैशाने पैज लावायलादेखील तयार आहेत असं त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं.

सध्या ज्या वेगाने भारतात लसीकरणाची मोहीम राबवली जातिये ती बघता आपल्याला तिसऱ्या लाटेचा धोका अजिबात नाही असंही राकेश यांनी सांगितलं.

पुढे ते मुलाखतीत असंही म्हणाले की “सोशल मीडियावर येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या अफवेमुळे आपण सगळेच चिंतित आहोत, मी पैज लावून सांगतो की तिसरी लाट येणार नाही, आणि जरी आली तरी तिचा भारतीय अर्थव्यवस्थेला जास्त फटका बसणार नाही!”

 

 

सध्याच्या आकड्यानुसार भारतातील २३ कोटी जनतेने कोरोनाची लस घेतल्याचं स्पष्ट झालं असून २१ तारखेपासून केंद्र सरकारने लसीकरणाची सगळी सूत्र हातात घेतली असल्याने लवकरात लवकर देशातले लसीकरण पूर्ण होईल अशी आशा आहे.

राकेश झुनझुनवाला यांची भविष्यवाणी खरी ठरो आणि आपण या संकटातून लवकर मुक्त होवो, तोपर्यंत आपली काळजी घेणं आपल्या हातात आहे!

===

हे ही वाचा या वेबसाईट्स आणि अँप्सने मिळते लसीकरण केंद्र आणि लशीच्या उपलब्धतेची माहिती

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version