आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनेकांना वाटत, की आपण विदेशामध्ये नोकरी करावी तेथली लाइफस्टाइल जगावी, गडगंज पैसा कमवावा आणि आयुष्याची अखेर सुखाने घालवावी. अनेक पालक देखील आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्याची अशीच स्वप्न पाहत असतात. पण सर्वानाच विदेशामध्ये नोकरी मिळते आणि सर्वांचीच स्वप्ने पूर्ण होतात असे नाही.
याला मुख्य कारण आहे ते म्हणजे आपण डोळ्यासमोर एकच फिक्स गोल ठेवत नाही. म्हणजे आपल्याला पुढे जाऊन नेमक काय करायचं यापासूनच आपला गोंधळ असतो, त्यामुळे छोट्याश्या कंपनीमध्ये कमी पगाराची नोकरी मिळते आणि शेवटपर्यंत तेच करावं लागतं, एका वाक्यात सांगायचं झालं तर अख्ख करियर धुळीला मिळतं. पण शाळेत किंवा कॉलेजला असल्यावर जर तुम्ही एखादं ध्येय निश्चित केलं तर मात्र खरंच तुम्ही जी स्वप्न पाहता ती प्रत्यक्षात अवतरू शकतात.
आज आम्ही तुम्हाला अश्या काही कोर्सेसची (अभ्यासक्रमांची) माहिती देणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने जर तुमचं विदेशी जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न असेल ते तुम्ही पूर्ण करू शकता. (याचा अर्थ भारत स्वप्नपूर्तीसाठी नाही असा घेऊ नये.
आपल्या भारतात देखील प्रगतीची दारे सताड उघडी आहेत, पण काहींची मनापासून परदेशात जाऊन तेथील भूमीवर आपले आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी ही उपयुक्त माहिती.)
सिव्हील इंजिनियरिंग
सिव्हील इंजिनियरिंग हा सध्याच्या युवा पिढी पुढील एक हॉट पर्याय आहे. सध्या भारतात देखील विद्यार्थ्यांचा बांधकाम क्षेत्राशी निगडीत हा कोर्स घेण्याकडे वाढता कल दिसून येतो आहे.
सिव्हील इंजिनियर्सना ऑस्ट्रेलिया, युएइ आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अहवालानुसार परदेशामध्ये सिव्हील इंजिनियर्सना वर्षाला सरासरी ५६ लाखाचं सॅलरी पॅकेज मिळतं.
इन्श्युरन्स सायन्स
हा अभ्यासक्रम भारतीय विद्यार्थ्यांसाठी नवा असला तरी यात उत्तम करियर निर्माण करण्याची संधी आहे. विदेशामध्ये फाईनान्स आणि इन्श्युरन्स क्षेत्रामध्ये नेहमीच हुशार मनुष्यबळाची गरज भासते.
जर तुमच्यामध्येही या क्षेत्राबद्दल पॅशन असेल तर तुम्ही या अभ्यासक्रमामध्ये महारथ मिळवून ऑस्ट्रेलिया, युरोप, न्युझीलँड, अमेरिका या देशांमध्ये नोकरी मिळवू शकता. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विदेशात वर्षाला किमान ६४ लाखांचं सॅलरी पॅकेज मिळतंच.
फार्मास्यूटिकल सायन्स
फार्मास्यूटिकल सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास औषधे निर्मिती, औषधांची टेस्टिंग म्हणजेच एकप्रकारे मेडिकल क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते. विदेशातील नावाजलेल्या ड्रग्ज मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्या, बायोटेक कंपन्या, अॅकेडमिक इंसिट्यूशन, सरकारी संस्था किंवा हॉस्पिटल नेहमीच या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या शोधात असतात.
आयर्लंड, स्वीडन, सिंगापूर या देशांमध्ये फार्मास्यूटिकल सायन्स मधील अनुभवी व्यक्तींसाठी लाईफ चेंजिंग ऑपोर्च्यूनीटी उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रामध्ये का करणाऱ्या व्यक्तीस वर्षाला ५२ ते ६६ लाखाचं सॅलरी पॅकेज मिळू शकतं.
बायोमेडिकल इंजिनियरिंग
हा अभ्यासक्रम देखील हेल्थ आणि मेडिकल क्षेत्राशी निगडीत असला तरी यातील काम मात्र वेगळे असते. हेल्थकेयर मध्ये वापरात येणारे डिवाइज तयार करणे, त्यांच डिजाइन आणि रिसर्च करणे, तसेच मेडिकल उपकरणांची मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय, नेविगेशनल, मेजरिंग, इलेक्ट्रोमेडिकल आणि कंट्रोल इंस्ट्रूमेंट्सची मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या नोकऱ्या विदेशामध्ये या क्षेत्रामधील व्यक्तींना उपलब्ध होतात.
या नोकऱ्यांसाठी कंपन्या वार्षिक ५६ लाख रुपयांचं सॅलरी पॅकेज ऑफर करू शकतात.
कॉम्प्यूटर सायन्स
कॉम्प्यूटर सायन्स बद्दल अनेकांना माहिती असेल, सध्या भारतातील काही आघाडीच्या कोर्सेसे मध्ये या कोर्सचं नाव घेतलं जातं. वाढत्या तंत्रज्ञानामुळे कॉम्प्यूटर क्षेत्राशी संबंधित या फिल्डमधील नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत.
अमेरिका, युरोप, जर्मनी, चीन, जपान, यांसारख्या प्रत्येक आघाडीच्या देशांमध्ये कॉम्प्यूटर सायन्स अभ्यासक्रमाशी निगडीत अनुभवी व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या फिल्डमध्ये काम करणाऱ्यांस वर्षाला ६० लाख रुपयांचं सॅलरी पॅकेज मिळू शकतं.
इथे आम्ही काही मोजक्याच कोर्सेसचा समावेश केला आहे. पण जर तुम्हाला देखील या व्यतिरिक्त अन्य काही कोर्सेस माहिती असतील जे विदेशामध्ये नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, तर नक्की कमेंटमध्ये कळवा. म्हणजे आपल्या विद्यार्थी वर्गाला त्याचा फायदाच होईल..!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.