Site icon InMarathi

३० हून अधिक महिलांनी ‘तसले’ व्हीडिओ विनापरवानगी वापरणाऱ्या साईटवर केली केस!

non consentual fetured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या पिंक सिनेमातला तो डायलॉग तर तुम्हाला नक्कीच लक्षात राहीला असेल, जेव्हा अमिताभ एका शब्दात त्यांचं Argument मांडतात, “नो मिन्स नो, ना का मतलब ना ही होता है!”

आजही तो डायलॉग तंतोतंत लागू होतो, कारण आजही इच्छेविरुद्ध महिलांवर शारीरिक जबरदस्तीचा प्रयत्न केला जातो, मग ती घरातील गृहिणी असो का वैश्याव्यवसाय करणारी स्त्री असो, तिच्या मताला काही किंमत नाहीच.

 

 

यामागे कितीही मानसिकता दडलेली असली तरी याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे समाजमाध्यमांतून स्त्रियांचं केलं जाणारं बीभत्स चित्रण. सिनेमातलं आयटम नंबर असो किंवा एखादा इंटीमेट सीन स्त्रियांना objectify करणं हेच आपण आपल्याइथल्या कलाकृतीतून सतत पहात आलो आहोत.

त्यात आणखीन भर घातली ती इंटरनेटने आणि त्या ओघाने येऊ घातलेल्या पॉर्न साइट्सनी! सुरुवातीला या गोष्टी फार क्वचितच बघितल्या जायच्या, पण जसजशी प्रगती होत गेली, ब्रॉडब्रॅंड, २ जी पासून आता आपण ४ जी पर्यंत पोहोचलो आणि या अशा पॉर्न साईट्स बघणं आणखीन सोप्पं झालं.

सध्या तर भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन सर्रास सॉफ्ट पॉर्नसारखा कंटेंटही दाखवला जातो, त्यामुळे खरंच या सगळ्यावर जे नियंत्रण असणं गरेजचं आहे ते कुठेतरी निसटत चाललं आहे.

 

 

आज आपल्या देशातला बहुतांश समाज सेक्स एज्युकेशन एखादा घाणेरडा विषय असल्यासारखं बघतो पण हाच समाज स्वतःच्या स्मार्टफोनवरून सर्रास पॉर्नसाईट्सचा आनंद घेताना दिसतो.

मध्यंतरी या पॉर्नसाईट्सवर भारत सरकारने बंदी आणलेली खरी, पण आपण त्यातही माहिर आहोत, व्हीपीएनसारखा पर्याय उपलब्ध असताना आपल्याला कोण थांबवणार आहे या साईट्स बघण्यापासून? हे पाहता आता त्यावर घातलेली बंदीदेखील आता काढलेली दिसून येतीये.

पण तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेत बऱ्याच महिलांनी एका मोठ्या पॉर्नसाईटवर केसेस टाकायला सुरुवात केली असून, काही महिलांचे प्रायव्हेट व्हीडियोज त्यांच्या consent शिवाय त्या साईटवर टाकून त्यातून अर्थाजन करणाऱ्या कंपनीला हे सगळं महागात पडलेलं आहे.

हे ही वाचा पॉर्न इंडस्ट्रीबद्दल, ह्या १२ सत्य गोष्टींची, तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल!

 

ती साईट म्हणजे पॉर्नहब आणि त्यांची पेरेंट कंपनी माइंडगिक. बऱ्याच महिला, मुली यांच्या पार्टनर्सनी त्यांच्या इच्छेविरुद्ध काढलेले प्रायव्हेट व्हीडीयोज, सेक्स टेप या पॉर्नहबवर टाकून त्यातून कंपनी आणि चॅनल्स पैसे कमवत आहेत असा आरोप बऱ्याच महिलांनी केला आहे

अमेरिका सरकारशी संवाद साधताना माइंडगिक कंपनीने याबाबतीत लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात येईल आणि अशा अवैध कंटेंटच्या बाबतीत Zero Tolerance पॉलिसीच असेल असंही स्पष्ट केलं आहे.

माइंडगिक कंपनी तब्बल १०० हून अधिक पॉर्नसाईट्स चालवते ज्यात पॉर्नहब, रेडट्यूब, यूपॉर्न सारख्या नावाजलेल्या वेबसाईट्सचा समावेश आहे.

 

 

लॉसूट फाइल करणाऱ्या Brown Rudnick LLP यांच्या मते “कोणाच्याही इच्छेविरुद्ध असे व्हीडियोज काढून ते साईटवर पब्लिश करून त्यातून पैसे मिळवणे हा एक प्रकारचा बलात्कारचं आहे, लहान मुलं, मुली यांचं हे लैंगिक शोषण थांबायलाच हवं”.

Brown Rudnick LLP या संस्थेद्वारे ३४ लोकांच्या केसेस फाइल केल्या गेल्या असून, त्यातील काही व्यक्ती या मायनर अर्थात अल्पवयीन आहेत त्यामुळेच हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

पॉर्नहब ही एक “Criminal Enterprise” नाही, काही लोकं या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये अडथळे आणण्यासाठी हे षडयंत्र रचत आहेत असंही पॉर्नहबचं म्हणणं आहे.

 

 

एकंदरच हा प्रकार भयावह आहे, यामागे लोकांची मानसिकता जरी असली तरी ती विकृत मानसिकता निर्माण होण्यामागे पॉर्नइंडस्ट्रीचाही हात आहे असं सध्या समाजमाध्यमांतून मांडलं जात आहे.

अमेरिकेत पॉर्न इंडस्ट्री ही कायदेशीर जरी असली तरी याचे भयावह दुष्परिणाम आता लोकांच्या समोर यायला सुरुवात होत आहे. या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या दुनियेत तुम्ही कुठेच सुरक्षित नाही, तुमचा डेटादेखील अजिबात सुरक्षित नाही.

कोणाच्याही इच्छेविरुद्ध हे असे व्हीडियो शूट करणं हा तर गुन्हा आहेच पण ते व्हीडियोज आपल्या साईटवर पब्लिश करून त्यातून पैसे कमवणं हा देखील तितकाच अक्षम्य गुन्हा आहे.

 

 

आपण म्हणतो अमेरिका कीती प्रगत आहे, पुढारलेली आहे, पण त्यादेशासमोर असलेले हे प्रॉब्लेम्सही कीती भयावह आहेत याचा साधा अंदाजसुद्धा आपल्याला नाही.

===

हे ही वाचा दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version