इस्त्राइल सैन्यात अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यमग्न, वाचा प्रेरणादायी भारतीय कन्यांबद्दल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
इस्राइल, मध्य पूर्वेतील एक छोटासा, फक्त ९०.५ लाख लोकसंख्या असलेला देश. इस्राइल हा आपल्या वक्तव्यांमुळे, शिस्तीमुळे, सुरक्षा व्यवस्था, सैन्यबल या सगळ्यांमुळे सतत चर्चेत असतोच. पण इस्त्राईल पॅलेस्टिन वादामुळे सध्या जिथे तिथे इस्राइलच्याच चर्चा रंगताना दिसतायत.
इस्राईल हे राष्ट्र अध्यात्म, टेक्नॉलॉजी, युद्ध कौशल्य ह्या सगळ्यांसाठी ओळखलं जातं. टेक्नोलॉजीचा वापर करून केली जाणारी मॉडर्न शेती, ख्रिस्ती बांधवांच्या अत्यंत श्रद्धेचं असलेलं स्थान जेरुसलेम, मुस्लिम बांधवांसाठी महत्वाची असलेली अल-अक्सा मशिद ही सगळी इस्राइलच्या प्रसिद्धीची काही कारणं आहेत. तिथल्या लोकांचं राहणीमान, शिक्षणाचा दर्जा, देशभक्ती हे सगळंच आत्मसात करण्यासारखं आहे.
पण ह्या सगळ्यांपेक्षा जगभरात इस्राएलच्या ज्या धोरणाची जास्त चर्चा होते ते म्हणजे ‘प्रत्येक नागरिकाने इस्राइल सेनेत योगदान देण्याचा नियम’! इस्राइल मध्ये तिथे राहण्याला प्रत्येक व्यक्तीला सेनेसाठी, देशसेवेसाठी आपल्या आयुष्यातील काही मौल्यवान वेळ देणं अनिवार्य असतं.
एकदा का मुलं सुजाण झाली, त्यांचं वय १८ वर्षे झालं की त्यांना आर्मी प्रशिक्षण घेऊन तिथल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. ही सेवा देण्याची मर्यादा मुलांसाठी २ वर्षे 8 महिने आहे, तर मुलींसाठी २ वर्षे आहे.
प्रशिक्षणाच्या वेळी जर कोणाचा परफॉर्मन्स अत्यंत जबरदस्त, वाखाणण्याजोगा असेल आणि त्या नागरिकाची इच्छा असेल, तर त्याला पुढे सेनेत विशिष्ट खात्यात नोकरीसुद्धा दिली जाते.
–
हे ही वाचा – “स्पर्म” चे स्मगलिंग करणारे तुरुंगातले दहशतवादी, वाचा अविश्वसनीय सत्य!
–
या नियमातून फक्त विकलांग, धर्मगुरू किंवा अध्यात्माचा मार्ग निवडणारे नागरिक आणि काही अरब नागरिकांनाच सेवा न देण्याची मुभा दिली आहे.
या नियमांमध्ये दुसऱ्या देशातून स्थलांतरित झालेले, मूळ निवासी, तात्पुरत्या कालावधीसाठी इस्राइलमध्ये स्थायिक झालेले नागरिक सगळ्यांचा समावेश आहे.
याच नियमाधारे सेनेत सेवा देणाऱ्या २ भारतीय बहिणी चर्चेचा विषय झाल्या आहेत. बातम्यांचे चॅनेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, सगळीकडे या दोन बहिणीचं फार कौतुक होतंय. कोण आहेत या बहिणी आणि त्यांना नेमकी कोणती सेवा देण्याचा मान मिळालाय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
रिया आणि निशा मुणियासिया अशी यया दोन बहिणींची नावं आहेत. मुणियासिया कुटुंब मुळचं भारतीय असून, गुजरात येथील कोठडी हे त्यांचं मूळ गाव! हे गाव गुजरातच्या माणावदर तहसीलात येतं. कोठडी गावातून अनेक वर्षांपूर्वी जीवाभाई मुणियासिया, त्यांचे बंधू सवदासभाई मुणियासिया हे आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर, इस्राएलची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या, तेलअवीव येथे स्थलांतरीत झाले. तिथे त्यांनी अनेक कष्ट घेऊन आपला किरण्याचा व्यवसाय उभा केला, वाढवला आणि ये कायमचे इस्राएलचे रहिवासी झाले.
आज मुणियासिया कुटुंबाच्या दोन्ही मुली रिया आणि निशा या इस्राएली सेनेत आपली सेवा देत केवळ कुटुंबियाचंच नव्हे तर भारतीयाचंही नाव उज्वल करत आहेत.
दोन्ही बहिणींपैकी निशा ही वयाने मोठी असून रिया लहान आहे. त्यामुळे निशा रियाच्या आधीच सैन्यदलात रुजू झाली होती. इतर सैनिकांना ज्याप्रमाणे प्रशिक्षण दिलं जातं, तसंच प्रशिक्षण निशा आणि तिथल्या सगळ्याच मुलींना देण्यात आलं. मुलं – मुली असा भेद तिथे केला जात नाही. त्यामुळे अगदी भल्यामोठ्या बंदुका, रायफाल्स हाताळणे, आधुनिक यंत्र आणि रनगाड्यांचा उपयोग करणे, आपल्याकडील ब्लॅक कॅट कमांडोना दिलं जातं, त्या दर्जाचं ट्रेनिंग त्यांना दिल्या जातं.
इतकं कठीण ट्रेनिंग पूर्ण करून, आपलं प्रशिक्षण यशस्वीपणे संपवून, आज निशाची पोस्टिंग कम्युनिकेशन आणि सायबर सेक्युरिटी विभागात करण्यात आली आहे. याच बरोबर, ती फ्रंटलाईन युनिट हेडची जोखमीची जबाबदारीसुद्धा आत्मविश्वासाने आणि अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडते आहे.
निशाची धाकटी बहीण रिया हिनेसुद्धा आता आपलं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कमांडो ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर रियाला स्थायी कमांड प्रदान केल्या जाईल. मात्र सध्या रियादेकील बहिणीप्रमाणे या ट्रेनिंगमध्ये रमली आहे.
प्रत्येक नागरिकात देशप्रेमाची भावना निर्माण करायची असेल आणि आपल्या मायभूमीप्रती आपली काय जबाबदारी आहे, आपण तिचं देणं लागतो ह्याची जाणीव करून द्यायची असेल तर प्रत्येक देशाने आर्मी प्रशिक्षण अनिवार्य करायला हवं. आर्मीची शिस्त ही आपलं व्यक्तिमत्व विकसित करून ते प्रभावशाली बनवण्यास अत्यंत उपयोगी ठरू शकते. व्यक्ती खंबीर होते, वैचारिक स्थैर्य प्राप्त होण्यास, प्रसंगावधान कौशल्याचा विकास होण्यास सुद्धा मदत मिळू शकते.
जीवनात कोणताही वाईट प्रसंग आल्यास, आणीबाणीची परिस्थिती आल्यास मनुष्याचं मनोबल ढासळून जात नाही.
निशा आणि रिया ह्यांनी आपलं अतुल्य योगदान देऊन त्यांच्या आईवडीलां बरोबरच भारताचं नावसुद्धा मोठं केलं आहे. त्यांच्या उदाहरणातून आपण सुद्धा बरंच काही शिकू शकतो. केवळ मुलगी आहे म्हणून ती अबला आहे असं नाही हे रिया आणि निशानी सिद्ध करून दिलं आहे.
इस्राएल – पॅलेस्टाईन वादामुळे दोन्ही देशांचं भरपूर नुकसान झालं आहे. राजकीय उलथापालथ झाली, जनजीवन विस्कळीत झालं तरीही तेथिल नागरिक हार न मानता, खचून न जाता, पुन्हा उभे राहिले. हे सगळं तिथल्या सैन्यशिक्षणामुळेच शक्य झाल्याचं दिसून येतंय.
–
हे ही वाचा –
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.