सनी धावून आला नसता तर धर्मेंद्रची अॅडल्ट फिल्म बीग स्क्रीनवर झळकली असती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दिलदार आणि मनमौजी म्हणून अभिनेता धर्मेंद्रची ख्याती आहे. हिंदी चित्रपटांत ‘हीमॅन’ची इमेज असणार्या धर्मेंद्रच्या निरागसतेचे किस्सेही प्रसिद्ध आहेत. असाच एक किस्सा त्यानं चुकून केलेल्या एका ॲडल्ट सिनेमाचा आणि हे समजल्यावर भडकलेल्या सनीनं काय केलं याचा.
धर्मेंद्र आणि त्याची मुलं हा बीटाऊनमधे आदरानं चर्चिला जाणारा विषय आहे. एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व असणार्या धर्मेंद्रच्या विरुध्द त्याचा मोठा मुलगा सनी! चार चौघात बोलायला संकोचणारा सनी, आपण बरं की आपलं काम बरं, घर बरं असा सरळमार्गी.
तसं डिंपलसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आणि अजूनही त्यांच्यातलं खास नातं टिकून असल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी या दोघांचे लंडनमधील फोटोही व्हायरल झाले होते. मात्र एरवी सनी सरळमार्गी आणि कुटुंबासाठी काहीही करायला तयार असणारा थोरला मुलगा आहे. आपल्या कुटुंबाच्या बाबतीत विशेषत: पापा धर्मेंद्रच्याबाबतीत तो प्रचंड प्रोटेक्टिव्ह आहे. त्याच्या या गुणाचा एक किस्सा खूप लोकप्रिय आहे.
तेंव्हा सनी साधारण तीन वर्षाचा होता आणि धर्मेंद्रचा एक सिनेमा आला होता, शोला और शबनम. एका सिनमधे व्हिलन राजन नायक धर्मेंद्रला लाथा बुक्क्यानं मारतो असं दाखविलं होतं. या सिन बघून छोटा सनी खूप चिडला. आपल्या वडिलांना इतकं मारणारा हा माणूस कोण? असा प्रश्न त्याला पडला होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – दारूच्या नशेत थेट चेन्नईला जाऊन धर्मेंद्रने थांबवलं हेमामालिनी आणि जितेंद्रचं लग्न!!
–
ख-या आयुष्यात राजन आणि धर्मेंद्र चांगले असल्याने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकदा एम राजन धर्मेंद्रला भेटायला घरी आले होते. सनीनं त्यांना आपल्याच घरातल्या सोफ्यावर हसत खेळत निवांत बसलेलं बघितलं आणि तो चिडून राजन यांच्याकडे धावला. संतापून ओरडला, “आज मैं तुम्हें नहीं छोडुंगा”. छोट्या सनीचा संताप बघून सगळे चकीत झाले. सनी मात्र संतापानं नुसता धुमसत होता. त्याची समजूत काढून त्याला विचारल्यावर त्यानं सांगितलं की याच माणसानं पापाजींना खूप मारलं होतं, आता आज मी याला सोडणार नाही. हे ऐकलं मात्र हास्याची कारंजी फ़ुटली.
अखेर धर्मेंद्रनीच सनीची समजूत घालून त्याला सांगितलं की सिनेमात दाखवतात ते खोटं असतं. राजन हे त्याचे चांगले मित्र आहेत आणि लाथाबुक्क्यानी मारणं तर दूरच त्या दोघांत कधी साधी भांडणंही होत नाहीत.
लहानपणीचा हा किस्सा सनी पुढे जाउन वडिलांची कशी काळजी घेणार होता याची चुणूक होती. नंतर अनेक वर्षांनी खरंच एक किस्सा असा घडला की वडिलांच्या एका चुकीमुळे सनी संतापला आणि एका निर्मात्याला त्यानं आसमान दाखवलं.
दिग्दर्शक कांतीलाल शहा हे बी ग्रेड सिनेमे करत असत. धर्मेंद्र मात्र साधाभोळा. कोणी अडचणीत असेल, कोणी गोड बोलून गळ घातली की ते सिनेमात काम करायला तयार होत. आता कांतीलाल शहानं नेमकं काय सांगून धर्मेंद्रला त्याच्या चित्रपटात काम करायला तयार केलं हे कारण गुलदस्त्यातच आहे. मात्र कांतिलाल शहा, आज का गुंडा नावाचा चित्रपट करत होता आणि त्यात धर्मेंद्र भूमिका साकारत होता.
सगळं नेहमीप्रमाणेच चाललं होतं मात्र कांतीलाल शहा धर्मेंद्रला धोका देत होता. हा चित्रपट खरंतर एक ॲडल्ट फ़िल्म होती ज्याचा पत्ताच धर्मेंद्रला नव्हता. त्याकाळात बरेचदा संवाद, क्रिप्ट अर्धी कच्चीच असत आणि शुटिंग दरम्यान ती लिहिली जात असत. आज का गुंडाही अशाच प्रकारचा चित्रपट होता. त्याचं संपूर्ण कथानक धर्मेंद्रच्या हातात नसल्यानं चित्रपटात नेमकं काय काय दाखविलं जाणार आहे याबाबत तो अनभिज्ञ होता.
एक दिवस सेटवर सिन चित्रित होणार होता आणि त्यासाठी कांतीलाल शहानं धर्मेंद्रला शर्ट काढायला सांगितला आणि छातीवर तेल लावायला सांगितलं. हा सीन घेडेस्वारीचा असल्याचं धर्मेंद्रला सांगण्यात आलं होतं. सीनची गरज म्हणून धर्मेंद्रनंही शर्ट उतरवत हा सीन चित्रीत केला. कांतीलालनं नंतर धर्मेंद्रचा बॉडी वापरून अश्लिल सीन चित्रीत केले आणि या सीनमधे घुसवले.
धर्मेंद्रला कल्पना नसली तरिही सेटवर काहीजणांना कल्पना होती की हा सिन पडद्यावर नेमका काय असणार आहे. त्यापैकीच काहींनी सनीला गाठलं आणि कल्पना दिली की धर्मेंद्र त्यांच्याही नकळत ॲडल्ट सिनेमात काम करत आहेत आणि त्यांचे असे असे सीन्स चित्रीत केले गेले आहेत. हे कळल्यावर सनी संतापला.
धर्मेंद्रला याची काहीच कल्पना नव्हती आणि कांतीलालनं त्याच्या भोळसटपणाचा गैर फायदा घेतला हे तर उघडच होतं. सनीनं कांतीलालला भेटायला बोलवलं. कांतीलाल काहीच कल्पना नसल्यानं भेटायला गेलाही. पडद्यावर “ये ढाई किलो का हाथ” म्हणून गर्जना करणारा सनी वास्तव आयुष्यातही संतापला की समोरचा गर्भगळीत होतो. कांतीलाल याला अपवाद कसा असेल? सनीचं रुद्ररुप बघून तो हादरला.
–
हे ही वाचा – बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!
–
सनीनं त्याला घडल्या प्रकाराचा जाब तर विचारलाच शिवाय हा चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयी धमकावलं. त्यातूनही जर त्यानं चित्रपट प्रदर्शित केलाच तर त्याच्यावर फसवणूकीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला. सनी नुसतीच पोकळ धमकी देत नव्हता हे तर उघडच होतं.
अखेर कांतीलालनं हा चित्रपट डब्यात घालून बंद करण्याचं वचन दिलं आणि आज का गुंडानं थिएटर पाहिलंच नाही. वडिलांची प्रतिमा जपणार्या सनीचा दरारा इतका आहे की साक्षात धरमपाजीही त्याला जरा वचकून असतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.