' कोवॅक्सिन लशीच्या निर्मितीत गाईच्या वासराचे रक्त वापरतात का? नेमकं तथ्य जाणून घ्या – InMarathi

कोवॅक्सिन लशीच्या निर्मितीत गाईच्या वासराचे रक्त वापरतात का? नेमकं तथ्य जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या आपल्या समोर अनेक प्रश्न उभे  ठाकले आहेत, वाढती बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, पेट्रोलने शंभरी पार केली आहे यासारखे अनेक प्रश्न आज आपल्यासमोर आहेत. आणि यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरणाचा.

देशात दुसरी लाट येण्याआधीच लसीकरणाला सुरवात झाली होती. सुरवातीला ४५ वयाच्या पुढील नागरिकांना लसी दिल्या जाव्यात, असे सरकारने जाहीर केले. सुरवातीला लोकांचा तितकासा प्रतिसाद काही मिळाला नाही. मात्र दुसरी लाट आल्यावर मात्र लोकांनी लसीकरणाकडे लगेच धाव घेतली.

 

vaccination inmarathi

 

सध्या अन्नध्यानापेक्षा, लसीचा तुटवडा जास्त जाणवत आहे. काही महिन्यांपूर्वी परदेशी कंपन्या आपली लस विकण्यासाठी आल्या होत्या. मात्र केंद्राने त्या नाकारल्या. सरकारने स्वदेशी कंपनीचा नारा दिला आणि फक्त कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींवर अवलंबून राहिले.

लसीकरणाच्या एकूणच नियोजनामध्ये बरीच गडबड झालेली दिसून येते. त्यामागे सुद्धा बरीच कारण आहेत. असो त्यावर चर्चा न करत सध्या गाजत असलेल्या मुद्दयाकडे वळूयात, तो म्हणजे कोवॅक्सिन लस तयार करताना वापरले जाणारे गायीच्या वासराचे रक्त, यात कितपत तथ्यता आहे, चला तर मग जाणून घेऊयात.

 

covaxin inmarathi

हे ही वाचा – या वेबसाईट्स आणि अँप्सने मिळते लसीकरण केंद्र आणि लशीच्या उपलब्धतेची माहिती

आरोप कोणी केले?

नुकतच काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक गौरव पान्धी यांनी हा आरोप केला असून, या विषयाला एक नवीनच राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे, जो केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे.

 

gaurav pandhi inmarathi

 

माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी कोवॅक्सिन लसीच्या निर्मितीची माहिती मागवली, ज्यात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये वासराच्या रक्ताचा उल्लेख आहे, यावरून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी पुढे असाही आरोप केला आहे की ‘वीस दिवसांच्या वासराची हत्या करून त्या वासराचे रक्त वापरले जाते’.

केंद्र सरकारचे काय म्हणणे?

सरकराने तातडीने हा दावा फोल ठरवत लसीच्या निर्मितीचे स्पष्टीकरण दिले आहे. सरकराने वासराच्या रक्ताचा वापर होतो हे मान्य केले आहे. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. वासराच्या रक्ताचा वापर फक्त पेशींची वाढ करण्यासाठी केला जातो (व्हेरो सेल).

 

health government inmarathi

 

कोरोनाची लस तयार करण्यासाठी व्हेरो सेलची गरज असते. पेशींची वाढ झाल्या नंतर पाणी आणि रसायनाने त्या धुतल्या जातात. पेशींच्या मदतीने विषाणूंची वाढ केली जाते. यानंतर पुढच्या प्रक्रियेत वीसहून आणि पेशी दोन्ही नष्ट होतात आणि लसीची अंतिम प्रक्रिया चालू होते.त्यामुळे लसीमध्ये वासराच्या रक्ताचा घटक राहत नाही.

 

शास्त्रज्ञांनी यावर काय म्हंटले?

मागच्या वर्षी भारत बायोटेक आणि इंडियन मेडिकल काउंसिलच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन कोवॅक्सिन लस तयार करण्यासाठी गाईच्या वासराचे रक्त वापरण्याचे ठरवले होते.

 

bharat biotech inmarathi

 

शास्त्रज्ञांनी तेव्हाच  स्पष्टीकरण दिले होते की, गाईच्या वासराचे रक्त वापरवुन बनवली जाणारी ही कोव्हीडवरची पहिली लस नसून, याआधी सुद्धा अनेक रोगांवरच्या लसीमध्ये हे वापरले गेले आहे. गाईच्या वासराचे रक्त वापरण्यामागे सुद्धा शास्त्र आहे, असे त्यांचे मत आहे आणि त्यांनी पुढे असेही नमूद केले की परदेशात सुद्धा अशाच प्रकारे लसी बनवल्या जातात.

एकीकडे राज्यसरकार लसीच्या अयोग्य वाटपावरून केंद्राकडे बोट दाखवत होते तर केंद्र सरकार राज्यकडे बोट दाखवत होते. लसीच्या किंमतीवरून सुद्धा अनेक दिवस राजकरण सुरु होते. त्यात आता विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित करून पुन्हा एक लसीवरून नवा वाद तयार करत आहे.

narednra modi inmarathi

हे ही वाचा – मोदी लसीकरणाबद्दल मौन का पाळून आहेत? वाचा या उत्तरात लपलेलं आंतरराष्ट्रीय षडयंत्र!

सत्ताधारी पक्ष कायमच हिंदुत्ववादी, गोरक्षक म्हणून ओळखला जातो कदाचित याच मुद्द्यवरून विरोधी पक्ष राजकारण करत असेल, मात्र तरी सुद्धा सर्वात महत्वाचा मुद्दे म्हणजे लसीकरण पूर्ण कधी होणार? आज बोगस लसीकरण सुद्धा अनेक ठिकाणी होताना दिसून येत आहे.

पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधून असे सांगितले की ‘लसी बद्दलचे सर्व अधिकार आपल्याकडे घेत आहोत. सरकारी ठिकाणी मोफत लसीकरण होईल तर खाजगी ठिकाणी १५० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल’.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?