म्हणून गांधी परिवारातल्या या सदस्याला जाणून बुजून राजकारणापासून लांब ठेवलं गेलं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रत्येक कुटुंबाचे आपले काही वाद असतात. पण जर कुटुंब हाय प्रोफाइल राजकारणी असेल तर पूर्ण जगाला चार भिंतींआड काय चाललंय याची उत्सुकता लागलेली असते. आणि ते राजकारणी कुटुंब भारताच्या पंतप्रधानांचं असेल तर मग बघायलाच नको.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, त्यांच्या घरात होणारे वाद राजकीय चर्चेचा विषय झाले होते. लोकं कितीही मोठी असो, घरातल्या स्वयंपाकावरून, दोन सुनांमध्ये होणाऱ्या भेदभावावरून अगदी एखाद्या टीव्ही मालिकेसारखे वाद होऊ लागतात.
राजकारणात कोणी प्रवेश करावा, कोणी करू नये, कोणाच्या किती सीमा असाव्या ह्या विषयांवरून गांधी परिवारात सतत तणाव होताच. पण संजय गांधींच्या मृत्यूनंतर तो शिगेला पोहोचला.
काय झालं त्यानंतर ज्यामुळे गांधी परिवारातील एका सदस्याला त्याची इच्छा असूनही, जाणून बुजून, राजकारणापासून लांब ठेवण्यात आलं? चला पाहूया.
मनेका गांधी – इंदिरा गांधींचे सुपुत्र स्व. संजय गांधी यांच्या पत्नी आणि भारतीय जनता पक्षातील एक अनन्य साधारण महत्वाचं नाव. पण मनेका गांधींसाठी, राजकारणात सासरचं पूर्वतयारी केलेलं व्यासपीठ हाताशी असताना त्यांनी भाजपशी हातमिळवणी का केली? याचं उत्तर आहे गृहक्लेश.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – इंदिरा गांधींसमोर झुकलेले राष्ट्रपती : बस्स हीच आहे यांची आठवण…!
–
गांधी कुटुंबात इंदिरा गांधी व त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र राजीव गांधी आणि त्यांची पत्नी सोनिया गांधी, कनिष्ठ सुपुत्र संजय गांधी आणि त्यांची पत्नी मनेका गांधी आणि राजीव सोनियाची दोन मुलं इतके सदस्य होते.
पण यांपैकी एकाचंही दुसऱ्याशी पटायचं नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, सोनिया गांधी या राजकारणापासून कोसोहात दूरच राहणे पसंत करीत आणि अगदी त्याच उलट मनेका गांधी, राजकारणात शिरण्याची संधी शोधत.
इंदिराजींच्या दोन्ही सुनांमध्ये एकही लक्षण सारखं नव्हतं. त्यांचं म्हणणं कधीच एकमेकींना पटायचं नाही. एक पूर्व म्हणेल तर दुसरी लगेच पश्चिम आणि ह्याचमुळे त्यांच्या घरात सतत कोणत्या ना कोणत्या वादळाने थैमान घातलेलेच असे.
सोनिया गांधी, शांत, सय्यमी, घरातील कामांना जवळ करून घर दार, पती मुलांकडे लक्ष देणाऱ्यातल्या होत्या. बाजारात स्वतः जाऊन भाजी आणणे, दिल्लीच्या बड्या लोकांच्या खरेदीच्या ठिकाणी जाऊन घरातील वस्तू, वाण सामान आणणे हे त्यांना फार आवडत असे.
आपल्या दोन्ही मुलांना त्या स्वतःच्या हाताने बनवलेलंच अन्न खाऊ घालत. त्यांनी त्यांच्या घरामागे ब्रोकोलीची सेंद्रिय शेती सुद्धा केली होती. इंदिरा आणि सोनिया यांचं बऱ्यापैकी जमायचं.
इंदिराजींच्या स्वयंपाक्याच्या मृत्यूनंतर, कोणावरही विश्वास नसल्याने त्या सोनियाच्या हातचंच अन्न ग्रहण करायच्या, इतका त्यांचा तिच्यावर विश्वास होता.
इकडे राजीव गांधी राजकारणात विशेष रुची घेऊन मोठ्या सय्यमाने, शांत राहून आपल्या आईला मदत करत होते म्हणून आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांनी राजीव गांधींचं आधीच चयन करून ठेवलं होतं.
पण मनेका मात्र या दोघांच्याही पूर्ण विरुद्ध होत्या. जेमतेम २१ – २२ वयाच्या असलेल्या मनेका गांधी, स्वभावाने तेजस्वी आणि बुद्धीने अत्यंत हुशार होत्या. त्यांना एखाद्या सामान्य गृहिणी प्रमाणे घरकाम, बागकाम, स्वयंपाक इत्यादी करायला आवडत नसे.
त्यांना राजकारणाची फार आवड होती. पण त्यांच्यात एक खूप मोठा दुर्गुण होता. तो म्हणजे, त्यांचा त्यांच्या जिभेवर ताबा नसणे आणि राजकारणात ही गोष्ट तुम्हाला भरपूर महागात पडू शकते. म्हणून इंदिरा गांधी त्यांना शक्यतो राजकारणापासून लांबच ठेवत.
पण त्यांनी मनेका वर एक जाबाबदारी टाकली होती. त्या काळी दिल्लीत सूर्या नावाचा अंक फार प्रसिद्ध होता आणि त्या अंकातून इंदिराजींच्या १९७७ च्या पंतप्रधान निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांच्यावर अक्षरशः ताशेरे ओढले जात होते.
मनेका गांधींना ही गोष्ट अजिबात पटत नव्हती. त्यांनी स्वतःहून इंदिरा गांधींकडून त्या अंकाला उत्तर देण्याची जबाबदारी मागून घेतली होती आणि आपलं पूर्ण लक्ष त्यांनी त्यावरच केंद्रित केलं होतं.
–
हे ही वाचा – मिडलक्लास वर्गाला परवडणारी कार बनवण्यात संजय गांधी यांचा सिंहाचा वाटा होता!
–
पण तरीही घरातील वाद विवाद काही केल्या थांबत नव्हते. एकदा संजय आणि मनेका गांधींमध्ये होणारा वाद इतका टोकाला पोहोचला कि मनेकाने आपली लग्नाची अंगठी काढून संजयला फेकून मारली होती.
हे सगळं इंदिरा गांधींच्या दृष्टीत येत होतं. ज्यामुळे सोनिया आणि त्यांच्यातील अंतर कमी होऊन, त्यांना सोनिया जास्त जवळच्या वाटू लागल्या. घरातील तीच एक व्यक्ती इंदिराजींची इतकी आवडती झाली होती की, तिची प्रशंसा करण्याची एकही संधी त्या गमावत नव्हत्या.
ह्याच, सोनियाला मिळणाऱ्या अनावश्यक महत्वाचे आणि त्यांच्या केल्या जाणाऱ्या कौतुकामुळे मनेका गांधींना वाईट वाटू लागले.
आपणही इंदिराजींना इतक्या महत्वाच्या कामात मदत करतो, त्यांची प्रेस आणि मीडिया कडून केली जाणारी बदनामी व त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांना हाणून पडतो तरीही आपल्याला घरात काहीच किंमत नाही, ह्याचं त्यांना दुःख होतं.
अशातच, घरातील असेच वाद ज्वलंत असताना २३ जून १९८० साली, संजय गांधी सफदरजंग विमानतळावर आपल्या खाजगी विमानाचा, म्हणजे Pitts S-2A चा सराव करत होते.
इंदिराजींनी त्यांना अनेक वेळा आपला हा छंद जोपासण्याचा सुरक्षेमुळे विरोध आहे, हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी आईचे म्हणणे न ऐकता, आपला सराव सुरूच ठेवला.
त्या सरावातच २३ जूनला त्यांचा विमानावरचा ताबा सुटल्याने एक मोठा अपघात झाला व ते त्या अपघातात गेले आणि संजयच्या जाण्याने गांधी कुटुंब कायमचं बदलून गेलं.
संजय गांधींचा मृत्यू झाला त्यावेळी, मनेका गांधी फक्त २३ वर्षांच्या होत्या आणि त्यांचे सुपुत्र वरुण गांधी हे ८ महिन्यांचे होते. मनेकाला सावरण्यासाठी आणि आपल्या दुःखातून लक्ष विचलित करण्यासाठी इंदिरांनी एक पर्याय सुचवला, कि मनेका गांधींनी त्यांची सेक्रेटरी होऊन त्यांच्या बरोबर प्रत्येक राजकीय दौऱ्यावर, बैठकीत, कचेरीत यावं.
मनेकादेखील तयार झाल्या. पण सोनियाचा मात्र या निर्णयाला तीव्र विरोध होता. त्यांना मनेका, त्यांच्या तिखट बोलण्यामुळे राजकारणात शिरायला नको होत्या. इतकंच नाही, तर त्यांना राजीव गांधींचं सुद्धा राजकारणात जाणं मान्य नव्हतं.
ह्यासाठी त्यांनी सासूबाई, इंदिरा गांधींना पत्र लिहून आपलं मत कळवलं. राजीव गांधींच्या बाबतीतील पात्रत तर त्यांनी, आपण घर सोडून जाऊ असं म्हटलं होतं.
इंदिरा गांधींना राजीव आणि सोनिया दोघेही प्रिय असल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि ह्या गोष्टीचं मनेका गांधींना फार वाईट वाटलं.
पुढे मनेका गांधींनी संजय विचार मंचाची स्थापना केली. काँग्रेस असताना, आपल्याच घरातील एखादी व्यक्तीने असं काही करावं, तेही आपल्या सुनेने हे इंदिरा गांधींना न पटण्यासारखं होतं.
त्यांच्यात आणि मनेका गांधींमध्ये रात्री एक कडाक्याचं भांडण झालं व मनेका गांधींना घरातून एकही वस्तू न घेता निघून जाण्यास सांगण्यात आलं.
मनेका गांधींनी मुकाट्याने घर सोडलं, व संजय गांधींच्या ट्रान्सपोर्ट एजन्सीमधील ट्रक विकून काही दिवस उदरनिर्वाह केला. पुढे त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली, जिथे त्यांना योग्य सन्मान मिळाल्याचं त्यांना समाधान होतं.
===
हे ही वाचा – “त्या”दिवशी इंदिरा गांधींनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलं नव्हतं, कारण….
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.