आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
ओम शांती ओम सिनेमातला ‘एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’ हा संवाद आठवतोय का? मिम्सच्या जगात तोही तुफान लोकप्रिय झाला होता. आज अनेक नेटिझन्स हाच डायलॉग थोडासा ट्विस्ट करून युरो कपमध्ये खेळत असलेला फुटबॉल लिजंड ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यासाठी वापरत आहेत.
होय, आज सगळेच जण त्याला विचारतायत, ‘दो बोतल कोका-कोला की किमत तुम क्या जानो रोनाल्डो बाबू’…!!
आता तुम्ही म्हणाल, रोनाल्डो आणि कोकाकोलाचा नेमका काय संबंध? तर मंडळी संबंध आहे, आणि तोही थोडाथोडका नाही तर तब्बल ४ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा!
युरो कप स्पर्धेमध्ये घडली घटना…
फुटबॉलमधील मिनी वर्ल्डकप मानली जाणारी युरो कपची स्पर्धा सध्या सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ‘स्ट्रेस बस्टर’ म्हणून जगभरातील फुटबॉलप्रेमी या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. या स्पर्धेतील पोर्तुगाल विरुद्ध हंगेरी या सामन्याने अवघ्या जगभरात हल्लाबोल निर्माण केलाय असं नक्कीच म्हणता येईल.
रोनाल्डो हा पोर्तुगाल संघाचा कर्णधार आहे. हंगेरीविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत, माईकसमोर येता क्षणीच त्याने एक असं कृत्य केलं, ज्याचे पडसाद अवघ्या जगभरात उमटले आहेत.
रोनाल्डो पत्रकारांना सामोरं जाण्यासाठी माईकसमोर येऊन बसला, त्याच्यासमोर असलेल्या कोकाकोलाच्या २ बाटल्या त्याने उचलल्या आणि बाजूला सरकवल्या. हे करताना त्याने ही खबरदारी घेतली, की त्या बाटल्या कॅमेरा फ्रेममधून बाहेर जातील. हे केल्यानंतर कोकाकोलाच्या बाजूला ठेवलेली पाण्याची बाटली त्याने उचलली आणि ती उंचावून दाखवत “पाणी प्या” असा संदेश दिला.
हे सगळं ज्या कोकाकोलाच्या बाबतीत घडलं, ती कंपनी युरो कप स्पर्धेच्या प्रयोजकांपैकी एक आहे. आता याच घटनेचा पुन्हा विचार करा.
===
हे ही वाचा – रोनाल्डोकडून एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे
===
थेट प्रोयोजकांना बाजूला सारण्यासाठी धमक लागते. अशा घटनेचे पडसाद कशाप्रकारे उमटू शकतात, याची कधी कधी आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.
Water only for Cristiano Ronaldo ⛔
(via @EURO2020) pic.twitter.com/XZBDoDnIZJ
— B/R Football (@brfootball) June 15, 2021
शेअर मार्केटवर थेट परिणाम
रोनाल्डो हा केवळ एक खेळाडू नाही, तर अनेकांसाठी आदर्श आहे. जगप्रसिद्ध अशा या व्यक्तिमत्वाच्या हातून घडलेली कृती कोकाकोलावर मोठा परिणाम करू शकेल, असं त्यावेळी तरी कुणाला वाटलं नसेल.
रोनाल्डोने तिथे कोकाकोलाच्या बाटल्या फ्रेम बाहेर केल्या आणि दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये कोकाकोला कंपनीचे शेअर्स ५६.१० अमेरिकन डॉलर या किंमतीवरून घसरून ५५.२२ अमेरिकन डॉलर या किंमतीवर आले.
या सगळ्यामुळे कोकाकोला कंपनीची ब्रँड व्हॅल्यू २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलरवर आली. कंपनीला थोडं थोडकं नाही, तर ४ बिलियन डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं.
कंपनीची सावध भूमिका
रोनाल्डोच्या या कृतीने कोकाकोलाच्या ब्रँडला मोठा धक्का बसला. मोठं नुकसान सहन करावं लागलं. याबाबतीत कोकाकोलाने मात्र, सावध पण स्पष्ट भूमिका घेतली आहे.
“प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. ज्याच्या त्याच्या आवडीने प्रत्येकाने आपलं प्येय निवडावं” असं म्हणत कोकाकोलाने ब्रँडला आणखी धक्का लागू नये याची काळजी घेतली आहे. रोनाल्डोच्या या कृतीने कोकाकोलाची जळजळ झाली आहे, हे मात्र नक्की!
रोनाल्डोचा फिटनेस
वयाच्या ३६ व्या वर्षी सुद्धा रोनाल्डो फिट आहे, हे तर सगळ्या फुटबॉलप्रेमींना माहित असेल. आजही वयाने त्याच्याहून १० वर्ष लहान असणाऱ्या तरुण खेळाडूंशी सुद्धा तो उत्तम स्पर्ध करू शकतो. या फिटनेसचं रहस्य शोधायला गेलं, तर कॅलरीज वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांपासून लांब राहायला हवं, हे कुणीही सांगेल.
त्यामुळे कोकाकोला हे रोनाल्डोचं प्राधान्य असूच शकत नाही. म्हणजेच, कंपनीने घेतलेली भूमिका अगदीच चुकीची ठरत नाही, हेदेखील सत्य आहे. यासगळ्या प्रकरणावर बोलताना, युरो कपच्या प्रतिनिधीने पाणी आणि साखरविरहित कोकाकोला असं दोन्ही खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचं आम्हाला सांगण्यात आलं आहे, असं म्हणत विषय तिथेच संपवल्याचं पाहायला मिळतंय.
===
हे ही वाचा – रोनाल्डो बद्दल या १५ गोष्टी कदाचित रोनाल्डो फॅनला देखील माहित नसाव्यात!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.