वडील मुलाला ‘नंबर वन’ करण्याचे स्वप्न बघत होते, मुलगा मात्र फ्लॉप!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपल्या मुलाचं आपल्या नंतरच पुढचं आयुष्य सुखाचं जाव, यासाठी वडील अतोनात कष्ट करत असतात. आपला मुलगा एकदा मार्गाला लागला की आपण मोकळे, अशीच भावना आपल्याकडे अनेक वडील मंडळींची असते.
हा प्रकार समाजातील सर्व स्तरातून दिसून येतो. अगदी सर्वसामान्य कुटुंबात देखील वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी झटत असतात मग ती मुलाची ऍडमिशन असो किंवा नोकरी. मुलाला मार्गाला लावण्यासाठी वडील जीवाचं रान करतात. याला अपवाद देखील काही मुलं असतात.
बॉलीवूडमध्ये तुमचा कोणी गॉडफादर नसेल तर तुम्हाला संघर्ष अटळ आहे. नवाजुद्दीन सारखे फार क्वचित असे अभिनेते टिकून राहतात, बाकीचे मोहमया असलेल्या या दुनियेला रामराम ठोकतात.
राजकीय नेतेसुद्धा यात मागे कसे पडतील, आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक वरिष्ठ नेत्यांची मुले आज राजकारणात सक्रिय आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते राजकरणात शिरले आहेत.
–
हे ही वाचा – विलासराव – एक उत्कृष्ट नेते आणि उत्तम वक्ते! त्यांचे हे ३ भन्नाट किस्से तुम्ही वाचायलाच हवे!
–
स्व. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाची सर्व सूत्र आता त्यांच्या मुलाकडे आहेत. मात्र त्याच मुलाला आज पक्षाच्या अध्यक्ष पदावरून काढून टाकले आहे. ते सुद्धा दुसरे तिसरे कोणी नाही तर त्या मुलाच्या काकाने, म्हणजे रामविलास पासवान यांच्या कनिष्ठ भावाने. राजकरणाकडे वळण्याआधी हेच सुपुत्र आपले करियर करण्यासाठी बॉलीवूडमध्ये गेले होते. मात्र तिथे सुद्धा पराभव स्वीकारावा लागला.
कंगना सारखी अभिनेत्री असताना सुद्धा हा सिनेमा पडला त्यानंतर त्याने आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला, हे जाणून घेऊच त्याआधी पक्षातून का काढून टाकले थोडक्यात जाणून घेऊ…
नेमक काय घडले?
रामविलास पासवान हे २००० साली जेडीयू पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. प्रामुख्याने हा पक्ष दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतो आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षाची संपूर्ण धुरा त्यांच्या मुलाच्या म्हणजे चिराग पासवान यांच्या खांदयावर आली.
नुकत्याच मागच्या वर्षी बिहारमध्ये निवडणूक होऊन गेल्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिराग पासवान आणि त्यांचा पक्ष हे एनडीए मधून बाहेर पडले. त्यांच्या या वैयक्तिक निर्णयाचा त्यांच्या पक्षाला फटका बसला. आज लोकसभेत त्यांच्या पक्षाचे ५ खासदार आहेत.
ते ५ खासदार आज बंडोखरी करत आहेत आणि त्यांच्या बंडोखरींमागे हात आहे तो चिरागच्या सख्ख्या काकांचा. काका पुतण्यांमधला वाद हा महाराष्ट्रापुरता राहिलेला नसून बिहारमध्ये सुद्धा हा वाद दिसून येतो आहे.
आज चिराग पासवान यांचे राजकारणातले करियर आज टांगणीवर आहे. राजकारणात येण्याआधी या सुपुत्राने आपल्या करियरची सुरवात चंदेरी दुनियेतून केली होती.
कोणता पिक्चर होता?
२०११ साली मिले ना मिले हम या चित्रपटातून आपले चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच चित्रपटात हिरॉइन होती, आजची वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत. तेव्हा तिच्या करियरला हळूहळू गती मिळत होती.
आपल्या मुलाच्या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी वडील रामविलास पासवान थेट प्रमोशनच्या मैदानात उतरले होते. देशात विविध ठिकाणी त्यांनी आपल्या मुलाच्या चित्रपटाचे प्रमोशन केले होते.
अगदी ते जेव्हा दिल्ल्लीत राहत होते. तेव्हा त्यांच्या निवासस्थानी देखील त्यांनी आपल्या मुलाच्या चित्रपटाच्या प्रमोशनची जय्यत तयारी केली होती. ज्यात ते म्हणाले होते, ‘ मी आनंदी आहे आज माझ्या मुलाने त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचे ठरवले आहे. मी नेहमीच त्याच्या पाठीशी उभा आहे, नक्कीच तो एक दिवशी बॉलीवूडमध्ये नंबर एकवर असेल’.
–
हे ही वाचा – जेव्हा संघाचा कार्यकर्ता भारताच्या सर्वात शक्तिशाली दलित महिलेची आब्रू वाचवतो…
–
चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ आपटला. सिनेमाचे परीक्षण सुद्धा चांगले नव्हते त्यामुळे प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. रातोरात चिरागने आपल्या करियरची गाडी आपल्या वडिलोपार्जित क्षेत्राकडे वळवली ती म्हणजे राजकरण.
वडिलांच्या असलेल्या आपल्या बद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठेतरी त्यांचे चिंरजीव मागे पडले. वडिलांच्या निधनानंतर पक्षाची धुरा स्वतःच्या खांद्यावर जरी घेतली तरी पूर्णपणे पेलली गेली नाही. पक्षाच्या विचारांना बाजूला सारून त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत, असा आरोप त्यांच्याच पक्षातील लोकांनी केला आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.