Site icon InMarathi

ट्विटर बंदीनंतर आता पासपोर्टही धोक्यात: कंगनाचे नवे वादग्रस्त प्रकरण जाणून घ्या!

kangana featured 4 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारशी घेतलेला पंगा, ट्विटरवर केलेली भडक टिप्पणी, ट्विटर अकाऊंट बॅन होणं, अशा कित्येक अग्निदिव्यातून जाणाऱ्या कंगना रनौतच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ संपायचं नावच घेत नाहीये.

एवढं सगळं होऊनही कंगना अजिबात डगमगली नाही, किंवा तिने तिचा पॉलिटिकल स्टँड कधीच बदलला नाही, बीजेपी आणि मोदी सरकारच्या हातातलं बाहुलं म्हणून तिला प्रचंड हिणवलं जातं तरी ती तिच्या मुद्द्यावर ठाम असते!

हृतिक आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीशी तिचं वैर असो किंवा नुकतंच “संघी महिला हॉट नसतात” हे वाक्य ऐकल्यावर स्वतःचा हॉट फोटो शेयर करत स्वतःला “हॉट संघी” म्हणवून घेणं असो, कंगनाचा बेधडकपणा तिच्या कोणत्याही वर्तणूकीतून सिद्ध होतो.

हे ही वाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कंगनाचे “मी हॉट संघी” म्हणत फोटोसह स्पष्टीकरण!

 

सध्या मात्र कंगनाने चक्क मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे, यामागचं कारण ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कंगनाचा पासपोर्ट रीन्यू करायला बरीच अडचण येत आहे.

कंगनावर दाखल केलेल्या FIR मुळे पासपोर्ट अथॉरिटीने तिचा पासपोर्ट रीन्यू करायला नकार दिला आहे. मुंबईच्या बांद्रा पोलिसांकडून कंगनावर घृणास्पद ट्विट आणि देशद्रोह या गुन्ह्याअंतर्गत तक्रार नोंदवली असल्याने कंगनाचा पासपोर्ट रीन्यू होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे.

याविरोधात कंगनाने मुंबई हाय कोर्टात धाव घेतली असून तिने याविरुद्ध केस फाइल केली आहे. कंगनाचं स्टेटमेंट बघता अजून तरी कोर्टाने यावर काहीच टिप्पणी केली नसून कंगनाने केलेलं निवेदन हे अजूनतरी अस्पष्ट आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे.

 

 

आपले वकील रिज्वान सिद्दीकी यांच्याकडून केलेल्या निवेदनात या सगळ्या प्रकरणात आपली बहीण रंगोली हिलासुद्धा गुंतवण्यात येतंय असं कंगनाने स्पष्ट केलं असून. ऑक्टोबर महिन्यात केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे तिच्याविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असंही तिने यात नमूद केलं आहे!

हे ही वाचा इतरांचं ते फ्रीडम ऑफ स्पीच, कंगना करेल ते हेट स्पीच : वाह रे ट्विटर अजब तुझे नियम!

पासपोर्ट अथॉरिटीने कंगनाच्या पासपोर्ट रीन्यूअल बाबत कोणतंही लिखित स्टेटमेंट केलेलं नसून हे सगळं शाब्दिकच आहे असंही कंगनाच्या वकिलांचं म्हणणं आहे.

म्हणूनच केवळ काही शाब्दिक स्टेटमेंटसाठी कोर्टाने यावरची सुनावणी पुढे ढकलली असून कंगनाच्या वकिलांना त्यांच्या निवेदनात फेरफार करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

कंगनाच्या वकिलांनी सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले पण तरी येत्या २५ तारखेला कोर्टाची पुढची कारवाई होणार असून न्यायाधीशांनी पुढील टिप्पणी करत ते म्हणाले – 

“शूटिंगसाठी जायचं असेल तर ते पुन्हादेखील शेड्यूल करता येऊ शकतं, मुळात कंगनाचं निवेदन अस्पष्ट आहे, त्यात कशाबद्दलच सखोल माहिती नाहीये त्यामुळे २५ जून हीच तारीख आम्हाला देणं शक्य आहे!”

 

 

आपल्या आगामी फिल्म धक्कडसाठी बुडापेस्ट इथे आपल्याला शूटिंगसाठी जावं लागणार आहे असंही कंगनाने स्पष्ट केलं आहे, शिवाय एक अभिनेत्री आणि मॉडेल असल्याकारणाने वेगवेगळ्या बिझनेस ट्रीपसाठी तिला बाहेर जावं लागतं.

तिचा पासपोर्ट सप्टेंबर २०२१ मध्ये एक्सपायर होत असल्याने तो लवकरात लवकर रीन्यू करणं गरजेचं आहे असंही कंगनाने एका मुलाखतीत सांगितलं आहे!

बंगाल निवडणुकांनंतर कंगनाच्या आक्षेपार्ह ट्विटमुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे, तिच्याविरुद्ध ट्विटरने त्वरित कारवाई करून तिचं अकाऊंट बंद करून टाकलं, आणि या सगळ्या प्रकरणामुळेच कंगनाला आता पुढची कामं करणंसुद्धा किती कठीण जातंय ते आपण बघतोच आहोत.

 

 

सोशल मीडियावर कित्येक सेलिब्रिटीज गरळ ओकत असतात, कित्येक माणसं देशाबद्दल अपमानास्पद कंटेंट शेयर करत असतात, या प्रत्येकावर सरकारी यंत्रणांना नजर ठेवणं शक्य आहे का? पकडला गेला तो चोर असं समजून केवळ कंगनाला कॉर्नर केलं जात आहे असंही सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे.

पण अत्यंत धारदार, गरजेपेक्षा स्पष्ट बोलणं, भडक वक्तव्य करणं हे कंगनाला बरंच महागात पडणार आहे असं दिसत आहे. एक अभिनेत्री म्हणून कंगना कितीही चांगली असली, तिच्या पोलिटिकल स्टँडवर ती कितीही ठाम असली तरी जेव्हा गोष्ट आपल्या पोटापाण्याची येते तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप बेगडी वाटू लागतात!

कंगनाच्या या पासपोर्ट प्रकरणावर कधी पडदा पडेल? तिला पासपोर्ट रीन्यू करून मिळेल का नाही? यामुळे तिचं फिल्मी करियर संपुष्टात येईल की नाही? हे सगळं येणाऱ्या काही दिवसात कळेलच.

 

 

या प्रकारानंतर कंगना कोणतंही विधान किंवा सोशल मीडियावर मत व्यक्त करताना १०० वेळा विचार करेल.

भले तिने देशद्रोहासारखं काहीच केलं नाहीये, पण कायद्याच्या भाषेतली देशद्रोहाची व्याख्या ही फार वेगळी आहे आणि तीच व्याख्या तिच्या करियरचे तीन तेरा वाजवू शकते याची जाणीव तिला नक्कीच झाली असेल!

===

हे ही वाचा कंगना पुन्हा चर्चेत! सोशल मीडियावर मिम्स अन विनोदांचा धुरळा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version