' कोणीतरी रागाने शिव्या दिल्या आहेत अशी वाटणारी रेल्वे स्थानकांची नावे.. जाणून घ्या… – InMarathi

कोणीतरी रागाने शिव्या दिल्या आहेत अशी वाटणारी रेल्वे स्थानकांची नावे.. जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘दोन चिंचपोकळी द्या एक सिंगल ठाणे द्या’ अशी वाक्य आधी आपल्या तोंडवळणी पडली होती. रोज धकाधकीचा प्रवास जरी असला तरी हा प्रवास करायला एक वेगळीच मज्जा असायची. गेल्या वर्षांपासून कोरोना नावाच्या आजराने पूर्ण देशात थैमान घातले आहे.

मागच्या वर्षी लागलेल्या कडक लॉकडाऊन मध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे खंडित झाली होती. मुंबईची लाईफलाईन ओळखल्या जाणारी, मुसळधार पाऊस असो किंवा आणखीन कोणतेही संकट असो, मुंबईच्या लोकलने कधीही आपली सेवा देणे थांबवले नाही, मात्र लॉकडाऊनमुळे या सेवेला तूर्तास ब्रेक दिला गेला होता.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यावर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना या लोकल सेवेची मुभा देण्यात आली होती ती आजही आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकलसाठी अजून वाट बघावी लागेल.

आज जरी निर्बंधांमुळे बाहेरचा प्रवास करता येत नसला तरी याआधी आपण ट्रेनने प्रवास करताना, स्टेशनवर कुठे गाडी थांबली की लगेच उतरून तिथे काय स्पेशल खायला मिळते हे पाहायचो. स्टेशनच्या नावाच्या पाटीसोबत फोटो काढायचे आणि लगेच सोशल मीडियावर टाकायचो.

भारतीय रेल्वेची जशी वैशिष्टय आहेत तशीच स्टेशनची सुद्धा अनेक वैशिष्ट्य आहेत. खास करून त्यांच्या नावात. बाप, काला बकरा, बिल्ली यासारखी नाव चक्क स्टेशनना दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात अशीच भन्नाट नाव असलेली स्टेशन्स.

साली :

मराठीत सर्रास दिली जाणारी ही शिवी, राजस्थानामध्ये तर या शिवीच्या नावाने स्टेशन आहे. मेहुणीला हिंदी भाषेत साली म्हणतात. भाषेची हीच गंमत असते.

 

 

भैसा :

एखाद्याला साधं म्हशा म्हंटल तरी राग येतो मात्र इथे तर रेल्वेस्टेशनला नाव चक्क भैसा असं दिले आहे.

 

station bhaisa inmarathi

हे ही वाचा – ऑक्सिजन एक्सप्रेस आधी तहानलेल्या लातूरकरांसाठी ही ट्रेन धावली होती…

सिंगापूर रोड :

आज पर्यटनामुळे ओळख निर्माण झालेल्या सिंगापूर या देशाची एक ओळख आपल्या इथे सुद्धा आहे. ती म्हणजे आपल्याकडे सुद्धा सिंगापूर रोड नावाचे स्टेशन तामिळनाडू मध्ये आहे.

 

station singpore inmarathi

 

काला  बकरा :

आज अनेकांना मस्करीत  ‘बकरा’ बनवायची पद्धत असते. मग अशा बकऱ्याला नंतर चांगलेच चिडवले जाते. बकरा बनवता बनवता आता एका स्टेशनलासुद्धा हे नाव पडले आहे.

 

kala bakra inmarathi

 

बिल्ली :

घरात अथवा आपल्या आसपास सतत एक घुटमणळणारा प्राणी म्हणजे मांजर, अनेकांच्या आवडीचा हा विषय. मांजरप्रेमींनो तुमच्या लाडक्या प्राण्याच्या नावाने सुद्धा एक स्टेशन उत्तर प्रदेश मध्ये आहे.

 

billi station inmarathi

 

बाप :

रिश्ते मै तो हम तुम्हारे बाप लगते हैं….बच्चनजींचा हा दमदार डायलॉग आज प्रत्येकच्या तोंडी असतो. आज एखाद्याचा बाप काढला तर तो लगेच आपल्या अंगावर धावून येतो. अशा या बाप नावाचं सुद्धा स्टेशन राजस्थानमध्ये आहे.

 

station baap inmarathi

 

छाता :

पावसाळा सुरु झाला आहे माळ्यावरच्या छत्र्या काढल्या पाहिजेत, असे संवाद अनेक घरात आजकाल ऐकू येतात. अशा या छत्रीचे हिंदी नाव असलेल्ये स्टेशन दिल्ली मथुरा मार्गादरम्यान आहे.

 

station chata inmarathi

 

इलू:

इलू इलू इलू का मतलब आय लव्ह यू, सौदागर मधले हे गाणे आजही अनेकजण गुणगुणतात. पण याच इलू नावाच स्टेशन बंगाल मध्ये आहे.

 

station londa inmarathi

 

नाना :

आज घरोघरात आणिक वडीलधाऱ्या माणसांचे नाव नाना असते. अशा या नानांच्या नावाने सुद्धा एक स्टेशन आपल्याकडे राजस्थानमध्ये आहे.

 

station nana inmarathi

 

लोंडा :

आज अनेक मुलं स्वतःला सक्त लौंडा म्हणून समजतात, लोंडा नावाचे सुद्धा एक स्टेशन कर्नाटकमध्ये आहे.

 

londa inmarathi

हे ही वाचा – या रेल्वे स्टेशनला नावच नाही…! यामागची कहाणी वाचाच…!

भारतीय रेल्वे आज कात टाकते आहे. नवनवीन रेल्वे आज भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीने दर्जेदार  सोयीसुविधा पुरवण्याकडे भारतीय रेल्वे भर देत आहेत.

आज रेल्वे कितीही आधुनिक झाली तरी त्यांना अशा विचित्र आणि भन्नाट नाव असलेल्या स्टेशवरुनच जायचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?