“महिलांनाही” मंदिरात ‘पुजारी’ म्हणून ओळख मिळणार! या राज्याचा ऐतिहासिक निर्णय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोरोनामुळे गेल्यावर्षी अनेक मंदिर बंद होती. त्यामुळे भक्तगणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती. प्रत्येक राज्याच्या सरकारने आपापल्या पद्धतीने निर्बंध हळूहळू कमी करून मंदिरांचा प्रश्न देखील सोडवला. मंदिर खुली होताच लाखोंचा भक्तिसागर दर्शनासाठी धावला.
मंदिर, पूजाअर्चा, पुजारी असे विषय निघाले की अगदी सहजपणे आपल्या डोळ्यांसमोर सोवळ्याओवळ्यातील एखादा पुरुष डोळ्यांसमोर येतो. मंदिरातील पुजारी म्हणून नेहमी आपण एखाद्या पुरुषालाच पाहिलेलं असतं. भारतातील पुरुष प्रधान संस्कृतीमधील अनेक गोष्टींपैकी हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे.
महिला काही प्रमाणात पौरोहित्य करायला लागल्याचं, काहीवेळा पाहायला मिळतं. मात्र पुजारी म्हणून एखादी महिला बघितल्याचं तुम्हाला आठवत नसेल. पण समजा तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात आणि तिथे चक्क एखादी स्त्री मंदिरातील पुजारी म्हणून पाहायला मिळाली, तर…? होय हे असं होणं आता फक्त कल्पितामध्ये नाही, तर प्रत्यक्षात शक्य आहे!
दक्षिण भारतातील एका राज्यात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तामिळनाडू हे भारतातील असं पहिलं राज्य ठरणार आहे, जिथे मंदिरात पुजारी होण्याचा हक्क महिलांना सुद्धा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नेमका काय आहे आणि यापुढे काय असणार आहे, तामिळनाडूमधील मंदिरांमधील पूजेचं स्वरूप, ते जाणून घेऊयात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कुणी घेतला निर्णय?
Hindu Religious and Charitable Endoments म्हणजेच HR&CE या विभागाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी अर्चकार म्हणजे पुजारी होण्यासाठीचा पाठयक्रम अभ्यासण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
मंत्री शेखर बाबू यांनी हा निर्णय घोषित केला असून, महिलांना यासाठीचे योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलं आहे. असा निर्णय घेणारं तामिळनाडू हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे.
तामिळनाडू राज्यसरकारचा हा निर्णय हिंदू धर्मासाठी आणि मंदिरांसाठी नवी संजीवनी ठरू शकतो, यात शंकाच नाही.
–
- शिवलिंगाची पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!
- चमत्कारिक : या अद्भुत मंदिरात गेली ९ वर्ष फक्त “पाण्याने” दिवा लावला जातोय!
–
सरकारच्या निर्णयाचे स्वागत
तामिळनाडूमधील स्थानिक आणि मंदिराच्या ट्रस्टशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडूमध्ये पूजापठणामध्ये महिलांना महत्त्वाचे स्थान दिले जात असे. तामिळ संस्कृतीमध्ये महिलांना सुद्धा योग्य प्राधान्यक्रम मिळण्याची प्रथा होती. मात्र आर्यांमुळे ही संस्कृती नष्ट झाली होती.
जुनी तामिळ संस्कृती पुन्हा नव्याने सुरु होणार असल्याचा आनंद आहे. यासाठी सरकार प्रयत्नशील असल्यामुळे, त्यांच्या या निर्णयाचे मंदिर प्रशासनाकडून स्वागत होत असल्याचं पाहायला मिळतंय.
शंभर दिवसांमध्ये नियुक्ती होणार
हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्यानंतर, महिला पुजऱ्यांची नेमणूक नक्की कधी होणार, हे सुद्धा तामिळनाडू सरकारने निश्चित केलं आहे. पुढील शंभर दिवसांमध्ये सर्व जातीधर्माचे पुजारी मंदिरांमध्ये पाहायला मिळतील. यामुळे समाजात मोठा बदल झालेला दिसून येईल.
पौरोहित्याचं योग्य प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची सुद्धा नियुक्ती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या महिला पुजारी होण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना हे प्रशिक्षण घेणं मात्र बंधनकारक असणार आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री स्टालिन यांचाही मोठा वाटा आहे.
या निर्णयामुळे ब्राह्मणेतर समाज आणि सर्वच समाजांमधील महिला यांचा समावेश धर्मव्यवस्थेत होण्यात नक्कीच मोठी मदत होईल. अयोग्य ठरणाऱ्या धार्मिक रूढी आणि परंपरांचं समूळ उच्चाटन होण्यासाठी सुद्धा या निर्णयच हातभार लागू शकतो, असं म्हणायला हरकत नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.