Site icon InMarathi

टाटा नसते तर ग्राहकांना मालामाल करण्याचं या दाम्पत्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं

tata app inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. २०१५ सालापासून त्यांनी देशात डिजिटल क्रांतीला सुरवात केली. ज्या गावात साधी वीज पोहचली नव्हती तिथे आज वीज, इंटरनेट पोहचले आहे. आज २०२१ साली आपण या डिजिटल क्रांतीची फळे खात आहोत.

आज आपण घरबसल्या शाळा, ऑफिसचे काम, किंवा घरात लागणाऱ्या वस्तू, साध्या मोबाईलवरून करू शकतो.

 

 

आज कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका पडलेला दिसून येतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा डळमळीतच आहे, त्यामुळे अर्थचक्र लवकरात लवकर सुरळीत व्हायला हवे.

 

आजच्या परिस्थितीसुद्धा भारतातअनेक स्टार्टअप्स सुरु होत आहेत. कोरोनाने अनेकांना देशोधडीला जरी लावले असले तरी काही लोकांना याचा फायदा झाला आणि त्यांनी नवनवीन कल्पना शोधून व्यवसायाची वाट पकडली.

आज एकवेळ लोकांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती नसेल पण कोणत्या वेबसाईटवर सेल चालला आहे? कुठे जास्त डिस्काउंट आहे, याची सर्व माहिती लोकांना असते.

 

आज प्रत्येक वेबसाईटवर कॅशबॅक, कुपन्स असा अनेक ऑफर्स असतात. कंपनीच्या वेबसाईटवर आढळणाऱ्या या कॅशबॅकच्या मागे सुद्धा एका स्टार्टअप्सचा हात आहे. चला तर मग जाणून घेऊयात या स्टार्टअपच्या प्रवास…

२०१३ साली जेव्हा  ई कॉमर्स क्षेत्राची सुरवात झाली त्याच दरम्यान भार्गव दाम्पत्याने ‘कॅशकरो’ नावाने देशातील पहिल्या कॅशबॅक पुरवणाऱ्या कंपनीची स्थापना केली.

कोण आहेत भार्गव दाम्पत्य?

स्वाती भार्गव या मूळच्या अंबाला, पंजाब येथील आहेत. जन्म आणि शालेय शिक्षण अंबाल्यातच झाल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट सिंगापुर गाठले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना सिंगापूर एअरलाईन्समध्ये शिष्यवृत्ती मिळाली.

 

 

१२ वीत उत्तम मार्क कमावून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ऍडमिशन घेऊन गणित विषयात पदवी मिळवली. अशा या हुशार मुलीने गोल्डमन सॅच्स या इन्व्हेन्टमेन्ट बँकिंग फर्म मध्ये जॉब सुद्धा मिळवला. पुढे तिने लग्न गाठ सुद्धा बांधली.

कॅशकरो ची स्थापना:

स्वदेस चित्रपटात जसा मोहन भार्गव (शाहरुख खान) नासा मधील सुखावह नोकरी सोडून भारतात येतो. त्याचप्रमाणे हे भार्गव दाम्पत्य सुद्धा सुखावह असणारी बँकेतील नोकरी सोडून भारतात नवा व्यवसाय करण्यासाठी आले.

आपल्याकडे आजही बँकेतील नोकरी म्हणजे हक्काची मीठभाकरी असे म्हटले जाते, ती सोडून एखाद्याने व्यवसाय सुरु केल्यास त्या व्यक्तीला समाज उपदेशाचे इतके सल्ले देईल की त्यात त्या माणसाची व्यवसाय करणायची इच्छा निघून जाईल.

 

 

२०१३ साली हे दाम्पत्य भारतात आले. कमी माणसात सुरवातीला कंपनी सुरु केली. बाकी सगळ्याची सोंगं करता येतात मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. भार्गव दाम्पत्याला कंपनीसाठी भक्कम आर्थिक पाठबळाची गरज होती.

आपल्या लंडनमधील ओळखीच्या व्यक्तींना त्यांनी संपर्क केला, मात्र त्यातील थोड्याच जणांनी सहभाग दाखवला. मात्र शेवटी एक भारतीयच भारतीयाच्या मदतीला आला आणि तो भारतीय म्हणजे दस्तुरखुद्द रतन टाटा.

रतन टाटा यांनी या स्टार्टअपला आर्थिक पाठबळ पुरवले. भारतीयांच्या अडीअडचणींमध्ये कायमच मदतीचा हात पुढे करणारे टाटा या दाम्पत्याच्या मदतीला सुद्धा धावून आले.

 

 

आज ऍमेझॉन, स्नॅपडील, मिंत्रा सारख्या ५०० हुन अधिक ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी या दाम्पत्यावर विश्वास ठेवल्याने, कंपनीच्या वाढीत नक्कीच भर पडली आहे.

 

कॅशकरोची कार्यप्रणाली :

कॅशकरो हे रिटेलरकडून मिळणाऱ्या कमिशनवर चालते. कॅशकरोच्या माध्यमातून व्यक्तीने  ऍमेझॉन स्नॅपडील सारख्या वेबसाईट वर शॉपिंग केल्यास त्या व्यक्तीला ६०% कॅशबॅक मिळून जातो. आजतगायत कंपनीने १० करोडच्या वर कॅशबॅक आपल्या यूजर्सना दिला आहे.

 

आज भारतात वर्षाला अनेक स्टार्टअप्स सुरु होत आहेत. मोदींनी ‘आत्मनिर्भर व्हा’, असे आवाहन केल्यावर अनेक तरुण मुलं नोकरीमागे न धावता स्वतःचा उद्योग सुरु करत आहेत. कोरोनाचे एकदा संकट टळले की, अनेकांच्या उद्योगाला पुन्हा एकदा बळ नक्कीच येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version