आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
झोप घेणे हे आपल्यापैकी बहुतांश लोकांना नेहमीच आवडत असतं. रावणाचा भाऊ कुंभकर्ण सलग सहा महिने झोपलेला असायचा, हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. ज्यांना पाश्चिमात्य चित्रपट आणि मालिका पाहण्याची आवड असेल, त्यांना कॅप्टन अमेरिका नक्की माहित असेल. अनेक वर्ष थंड वातावरणात राहून तसाच जिवंत राहिलेला एक योद्धा!
हे असं अनेक महिने किंवा अनेक वर्षं शरीर तसंच ठेऊन जिवंत राहणं शक्य आहे का? असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही म्हणाल असं फक्त चित्रपट आणि मालिकांमध्येच घडू शकतं. पण असं नाहीये. हायबरनेशन खरोखर शक्य आहे.
‘हायबरनेट’ – हा एक शब्द सध्या इंटरनेटवर खूप चर्चिला जातोय. अंतराळात जाण्याची इच्छा असलेले किंवा त्याबद्दल प्रचंड कुतूहल असणाऱ्या लोकांना हे काय प्रकरण आहे हे नक्की माहिती असेल. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आम्ही ही माहिती उपलब्ध करून देत आहोत.
===
हे ही वाचा – ‘मृत’ शरीर जतन करून ठेवण्याची ह्या गावातली ही “विचित्र प्रथा” ठाऊक आहे का?
===
‘हायबरनेट’ म्हणजे काय ?
‘हायबरनेट’ म्हणजे एक अशी निद्रावस्था ज्यामध्ये तुम्ही किती तरी तास किंवा दिवस झोपू शकतात. ज्या लोकांना झोपेची प्रचंड आवड आहे त्यांच्यासाठी ही अवस्था म्हणजे पर्वणीच म्हणता येईल.
जंगलातील प्राणी ही बराच मोठा काळ ‘हायबरनेट’ अवस्थेत जगत असतात. आता ही अवस्था मनुष्यांना सुद्धा अनुभवता येईल अशी सध्या चर्चा सध्या सुरू आहे. एका ठराविक वेळेनंतर आपण झोपू शकतो की नाही यावर सध्या दुमत आहे. युरोपियन देशातील काही लोक मात्र ‘हायबरनेट’ अवस्था शक्य आहे यावर ठाम आहेत.
‘हायबरनेट’ अवस्थेत जाण्यासाठी तुम्हाला अतिथंड हवामानात रहावं लागतं, असं शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनानंतर सांगितलं आहे. अतिथंड वातावरणाची निर्मिती करण्यासाठी कित्येक केंद्र उभारण्यात आली आहेत.
‘ह्युमन हायबरनेशन’ या नावाने संशोधन सुरू झालेला हा विषय इलॉन मस्क यांच्या ‘सहज अवकाश वारी’च्या आवाहनानंतर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
अवकाशात जाण्यासाठी तुम्हाला गरज असते ती जास्तीत जास्त काळ एका अवस्थेत राहता येण्याची, त्याची तक्रार नसण्याची आणि त्या स्थितीतही तुमची शरीर यंत्रणा व्यवस्थित राहण्याची. ‘हायबरनेट’ स्थितीत हे आपण साध्य करू शकतो. तुमचं शरीर हे सुस्थितीत असतं. तुम्ही झोपेत असतात आणि तुम्हाला मर्यादित संवेदना होत असतात.
===
हे ही वाचा – घराच्या चाव्या, एलइडी लाइट्स स्वतःच्या शरीरात बसवणारी ही “बायोनिक वुमन” आहे तरी कोण?
===
‘हायबरनेट’ कसं होता येऊ शकतं ?
इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल फूड सेक्युरिटी यांनी जाहीर केलेल्या एका पत्रकानुसार मानवी शरीराचं ‘झेब्राफिश’ प्रमाणे बदल करणं शक्य झाल्यास ‘हायबरनेट’ या अवस्थेत पोहोचणं सहज शक्य आहे. २००९ मध्ये सुरू झालेलं हे संशोधन तब्बल १० वर्ष सुरू होतं. झेब्राफिशला कमी झोपेची आवश्यकता असते, कारण त्यांचा मेंदू लहान असतो. झेब्राफिश च्या ‘हायबरनेशन’ ला ‘टॉर्पर’ असं नाव देण्यात आलं आहे.
‘टॉर्पर’ या अवस्थेत अन्न कमी खाणे, तापमानात बदल होणे असे बदल शरीराला जाणवत नाहीत. प्राण्यांना सहज शक्य असलेली ही गोष्ट माणसांना शक्य व्हावी यासाठी सध्या विज्ञान प्रयत्न करत आहे.
‘टॉर्पर’ या अवस्थेत जर मनुष्य जाऊ शकला तर त्याच्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल असा या क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आहे. शरीराची अन्न, पाणी, ऑक्सिजनची गरज कमी झाल्याने या अवस्थेत माणसाला इतर कोणत्याही जाणिवा होत नाहीत असं सांगितलं जातं. सात महिने अंतराळ प्रवास करू पाहणाऱ्या हौशी लोकांना ‘टॉर्पर’ अवस्थेत जाता आलं तर हा प्रवास सुखकर होऊ शकतो.
झेब्राफिशला समोर ठेवून केलेला हा अभ्यास माणसांना कितपत लागू पडेल याचं उत्तर सध्या कोणाकडेही नाहीये. शरीरात अन्न नसतानाही शरीरात रोग प्रतिकारक शक्ती कशी तयार होत राहील? हा सर्व शास्त्रज्ञांसाठी प्रश्न आहे.
आजवर झालेल्या संशोधनातून हे लक्षात आलं आहे की, ‘टॉर्पर’ ही अवस्था माणसांसाठी सुद्धा शक्य आहे. हे साध्य करण्यासाठी अंतराळातील ग्रह, तारे आणि तिथे जिवंत राहण्यासाठी कमीत कमी आवश्यक गोष्टी यांचा सध्या अभ्यास सुरू आहे.
२०३० मध्ये ‘नासा’ ही अंतराळ संशोधन संस्था काही अंतराळवीरांना मंगळावर पाठवण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर हा अभ्यास सुरू आहे. हे मिशन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा अंतराळात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती शास्त्रज्ञांकडे उपलब्ध असेल आणि त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध असेल.
नासाच्या आधी म्हणजे २०२४ मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून लोकांना अंतराळात पाठवण्याच्या इलॉन मस्क यांच्या घोषणेकडे सध्या पूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.
प्राण्यांप्रमाणे माणसांना ‘टॉर्पर’ अवस्थेत नेण्याचे बरेच असफल प्रयत्न यापूर्वी देखील करण्यात आले आहेत. पण, ‘नासा’ने अजूनही ‘ह्युमन हायबरनेशन’ या विषयावर आपलं संशोधन सुरू ठेवलं आहे या बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शरीराच्या मूलभूत गरजांची आवश्यकता ही ७% पर्यंत कमी करण्यात सध्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. पण, हायबरनेशन साध्य करण्यासाठी त्यांना अजूनही लांबचा पल्ला गाठायचा आहे. हे सोपं नाहीये आणि या अवस्थेत अनिश्चित काळात राहिल्यास आपण कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो हे सुद्धा शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
हायबरनेशन या अवस्थेत माणसाच्या शरीराचं तापमान हे कमीत कमी म्हणजे ‘-३’% इतकं कमी झालं तरी तो जिवंत राहू शकतो हे संशोधनात समोर आलं आहे.
प्राण्यांमध्ये आपल्या सर्वांच्या आवडत्या ‘खारुताई’कडे सर्व परिस्थितीमध्ये जिवंत राहण्याचं सामर्थ्य असतं हे अभ्यासात समोर आलं आहे.
शरीराला कमीत कमी तापमानात राहण्याची सवय लावल्यास आणि प्रयोग म्हणून शरीराची कमीत कमी तापमानाची गरज अभ्यास केल्यावर पूर्ण माहिती समोर येईल.
सध्या कोणताही मनुष्य कमीत कमी तापमानात, अन्न, ऑक्सिजन शिवाय उणे तापमानात ३ तासांपर्यंत राहू शकतो हे समोर आलं आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी आणि माणसांना अवकाशात पाठवता यावं यासाठी सध्या प्रयत्न, अभ्यास सुरू आहे. येणाऱ्या काळात हा प्रयोग यशस्वी झाला तर अवकाशात जाणं काही प्रमाणात तरी सोपं होईल असा विश्वास सर्व शास्त्रज्ञांना आहे.
अंतराळात जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अंतरळवीरांना आणि संशोधन करणाऱ्या नासा च्या टीम ला ‘ह्युमन हायबरनेशन’ साध्य करण्यासाठी शुभेच्छा देऊयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.