अकाली, प्री मॅचुअर प्रसूती कशी टाळाल? वाचा, महत्त्वाचा सल्ला…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आई होणं हा स्त्रीजन्मातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. एक जीव आपल्या पोटात वाढत असतो ही भावनाच त्या स्त्रीला किती आनंदी करणारी असते. गरोदर बनल्यापासून ते प्रसूती पर्यंतचा काळ स्त्रीसाठी अत्यंत महत्वाचा आणि काळजी घेण्याचा असतो.
आज प्रसुतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र फार पूर्वी महिलेची प्रसूती घरातच केली जायची त्यामुळे मुलं दगावणायचा धोका जास्त असायचा.
आजही नवजात मृत्यूचं एक कारण आहे, मुदतपूर्व जन्म आणी अशा मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांना नंतरही काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. याचं मुख्य कारण आहे, मातेच्या आहारातील ओमेगा थ्री चं कमी प्रमाण. या संदर्भात केलेल्या एका अभ्यासात हे आढळून आलेलं आहे.
गर्भारपणाला आपल्याकडे बाईचा दुसरा जन्म म्हणलं जातं. या अवस्थेतील स्त्रीला दोन जिवांची म्हणलं जातं. हे केवळ शब्दप्रयोग नाहीत तर वस्तुस्थिति आहे. जेंव्हा स्त्री गर्भ धारणा करते तेंव्हा ती स्वत:सोबतच गर्भाचिही काळजी घेत असते. यात मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्याचाही समावेश आहे.
या कालखंडात काय खावं आणि काय खाऊ नये याचे काही संकेत आहेत. पूर्वंपार काही पदार्थ आवर्जून खाल्ले जातात तर काही कटाक्षानं टाळले जातात.
गर्भाला इजा पोहोचेल असं काहीही न खाण्याकडे कल असतो. यापैकी काही समज हे आधुनिक शास्त्रानं मोडीत काढत अशा अन्नघटकांचा आहारात समावेश करण्यावर भर दिलेला आहे. असाच एक समज आहे, मासे खाण्याबाबतचा.
नवजात मृत्यूचं एक मुख्य कारण आहे, बाळाचं मुदतीपुर्व जन्म घेणं. एका अभ्यासात असं आढळून आलेलं आहे की ज्या गर्भवतीच्या गर्भारपणाच्या पहिल्या आणि दुसर्या तिमाहीत ओमेगा थ्री फ़ॅटी ॲसिडची कमतरता आढळून आलेली आहे, त्यांच्याबाबतीत प्रिमॅच्युअर बाळंतपणाचा धोका जास्त जाणवतो.
हा अभ्यास असंही सांगतो की गर्भवतीच्या आहारात जर योग्य प्रमाणात ओमेगा थ्री असेल तर हा धोका कमी होतो. मासे किंवा फ़िश ऑईलमधून ओमेगा थ्री मिळतं.
ज्या गर्भवती स्त्रियांत एन३ फ़ॅटी ॲसिडची प्लाझ्मा लेव्हल कमी असते, त्यांना मुदतपूर्व बाळंतपणाच्या धोक्याला सामोरं जावं लागतं असं एका अभ्यासात आढळलं आहे. दुसर्या बाजूला गर्भवतींना मासे खाणं टाळावं (कारण त्यात असणारं मर्क्युरीचं प्रमाण) असा सल्ला साधारणपणे दिला जात असतानाच दुसरीकडे अभ्यासकांचं मत मस्त्याहार न टाळण्याचं आहे.
विशेषत: त्या गर्भवती स्त्रियांनी ज्यांच्यात ओमेगा ३ ची कमतरता आहे. यामुळे मुदतीपूर्वीच जन्म होऊन बाळ दगावण्याची शक्यता वाढते. तसेच यातूनही वाचलेल्या बालकांना पुढे जाऊनही काही आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावं लागतं असं अभ्यासकांचं मत आहे.
हॉवर्ड विद्यापिठातील प्राध्यापक ओल्सेन यांच्या चमुनं केलेल्या अभ्यासात हे आढळून आलं आहे. यासाठी त्यांनी डेन्मार्क येथील ९६ हजार बालकांचं सर्वक्षण केलं.
ज्या स्त्रियांची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी (३४ आठवड्यांपूर्वी) झालेली आहे अशा ३७६ स्त्रियांच्या रक्ताचे नमुनेही त्यांनी तपासले. तसेच पुर्ण मुदतीत वाढ झाल्यानंतर ज्यांची डिलिव्हरी झाली अशा ३४८ स्त्रियांच्या रक्ताचे नमूनेही घेतले.
या सर्व महिलांची त्यांच्या गर्भारपणातल्या पहिल्या आणि दुसर्या तिमाहीत रक्ताची तपासणी केलेली होती. या तपासणीत असं आढळलं की, ज्या स्त्रियांची EPA + DHA सिरम पातळी कमी आहे त्यांच्यात मुदतपूर्व डिलिव्हरीचा धोका १० टक्के जास्त आहे. म्हणूनच गर्भारपणात विशेषत: ज्यांच्यात ही पातळी कमी आहे अशा स्त्रियांनी आवर्जून मत्स्याहार करावा असं मत त्यांनी मांडलं आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी फ़िश ऑईल टॅबलेटचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावं असंही यात मत मांडण्यात आलं आहे.
–
- गरोदरपणात कसं झोपावं? काय काळजी घ्यावी? शांत झोप लागण्यासाठी या टिप्स वाचा
- हे दहा उपाय तुम्हाला गरोदरपणात होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून वाचवतील
–
सॅलमोन, ट्यूना आणि सॅरडीन यांच्यात EPA आणि DHA यांचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात असतो. याव्यतिरिक्तही याचा मेंदूच्या वाढीसाठी, दृष्टीसाठी फ़ायदा होतो.
याशिवाय एक अभ्यास असंही सांगतो की ओमेगा ३ चं सेवन केलं असता बाळांना संसर्गाचा धोका कमी संभवतो. तसेच बाळंपणानंतरच्या नैराश्यातून मातेला मुक्त करतो
डिलिव्हरीनंतर आईला भरपुर आणि सकस दूध येण्यासाठीही ओमेगा३ चा उपयोग होतो. मात्र मस्त्याहार करतानाही काही प्रकारचे मासे टाळलेलेच बरे. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुम्ही योग्य त्या प्रकारचे मासे गर्भारपणातही खाऊ शकता.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.