आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सिनेजगतातील अनेक कलाकार आपण राजकाराणाच्या पटलावर बघत असतो, कलाकारांची ही परंपरा आताची नसून फार पूर्वीपासून आहे. फक्त हिंदीतले नव्हे तर अगदी भोजपुरी सिनेसृष्टीतल्या कलाकारांपासून ते अगदी साऊथच्या सिनेसृष्टीतले कलाकार असो, अनेकजण निवडणुकीच्या राजकारणात उतरतात.
सिनेसृष्टीतुन अचानक राजकारणात येणारे कलाकार काही विशिष्ट कारणांनीच येतात. मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर ते राजकारणात निवडणूका लढवण्यासाठी करतात, मात्र त्यातले सगळेच कलाकार जिंकून येतीलच असे नाही.
७० एम एमचा पडदा गाजवणारे हे कलाकार संसदेत सुद्धा आपल्या आपल्या शैलीने सभागृह गाजवतात. त्यातीलच एक नाव सध्या चर्चेत आले आहे ते म्हणजे नवनीत राणा कौर. हनुमान चालीसाचे पठण मातोश्रीवर येऊन करणार होत्या मात्र पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली.
मूळच्या पंजाबी, जन्म शिक्षण मुंबई, तेलगू सिनेमात काम, लग्न अमरावतीच्या एका राजपूत खासदाराबरोबर, रामदेव बाबांना गुरु मानणाऱ्या, अशा या नवनीत राणा, निवडणुकीत जातीचा बनावट दाखला दिल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत, या आधी सुद्धा त्या वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. चला तर मग जाणून घेऊयात नवनीत राणा यांच्या वादांबद्दल….
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
–
हे ही वाचा – “असं काहीतरी” केल्याशिवाय यश मिळणं अशक्यच! “या” कलाकारांकडून मिळतो मौल्यवान धडा
–
कोण आहेत नवनीत राणा?
मायानगरीतील एका पंजाबी घरात जन्मलेल्या या मुलीने लहानपणीच आडनाव कपूर, खन्ना नसताना सुद्धा अभिनेत्री होण्याचे ठरवले, वडील आर्मी मध्ये तर आई गृहिणी. शिक्षण १२ पर्यंत झाल्यांनतर पुढचे शिक्षण न घेता थेट मॉडेलिंगकडे आपला मोर्चा वळवला.
काही अल्बम्स मध्ये त्यांनी काम केले, मात्र ते काही हिट ठरले नाहीत, पुढे त्यांनी पहिला सिनेमा केला तो कानडी भाषेत. त्यानंतर इतर साऊथच्या भाषेत काम केले. त्यांची मातृभाषा असलेला पंजाबी चित्रपट सुद्धा आपले नशीब आजमावले,मात्र त्यांनी कुठेच मोठे यश मिळेल नाही.
सुरवातीपासूनच त्या चर्चेत राहिल्या त्यांच्या बोल्ड लुक मुळे, २०१९ साली सुद्धा निवडणूक जिंकल्यानांतर त्यांचा चेहरा पुन्हा एकदा एका नव्या ओळखीमुळे चर्चेत आला. संसदेमधील सर्वात सुंदर चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला.
फोटो लीक होणे:
२०११ साली त्यांनी अमरावतीच्या रवी राणा यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली, त्यांची प्रेमकहाणी आजच्यासारख्या चॅट संस्कृतीमध्ये फुलली नसून, चक्क बाबा रामदेव यांच्या आश्रमात फुलली. लग्न झाल्यानंतर नवनीत यांचे काही खाजगी फोटो त्यांच्या परवानगीशिवाय व्हायरल करण्यात आले होते.
मुळातच बोल्ड अशी इमेज असणाऱ्या नवनीत यांचे फोटो अनेक सोशल नेटवर्किंग साईटने प्रसिद्ध केले, त्याविरोधात त्यांच्या पतीने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती.
शिवसेना नेत्याशी पंगा:
सिनेमात हवे तसे करियर झाले नाही म्हणून त्या २०१४ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, मात्र समोर असलेल्या शिवसनेच्या वाघाने त्यांना चितपट केले.
२०१९ साली त्यांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्या जिंकून आल्या, ज्या अडसूळांनी त्यांना मागच्या निवडणुकीत पराभूत केले होते, त्याच अडसुळांना नवनीत यांनी पराभूत केले.
दोघांच्या मधील वादाला २०१४ सालीचा सुरवात झाली होती. नवनीत यांनी २०१४ सालीचा त्यांच्यावर विनयभंगाची केस टाकली होती. त्या नंतर हा वादात वाढतच गेला होता.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसनेच्या अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात आली होती, शिवसेनेचे चाणक्य, राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय राऊतांवर आणि त्यांच्या पत्नीवर देखील ईडीची कारवाई करण्यात आली होती.
नवनीत यांचे पती रवी राणा यांनी ,’आनंद अडसूळ यांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली होती’. आनंद अडसूळ हे तब्बल ५ वेळा शिवसेनेचे खासदार होते. सिटीबँक घोटाळ्यात त्यांचा हात आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
विना मास्क बाईक राईड:
–
हे ही वाचा – ‘त्या’ एका भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”!
–
कोरोनाची दुसऱ्या लाटेची सुरवात झाली होती तेव्हा सरकारने लगेचच लॉकडाऊन लावण्यास सुरवात केली होती , त्यावेळी कोरोनाची लाट अपेक्षित नसलेल्या ठिकाणी जास्त आढळून आली होती. अमरावतीचे हे लोकप्रतिनिधी दाम्पत्य लॉकडाऊन असताना सुद्धा विनामास्क मस्त बुलेटवरून फिरत होते. विशेष म्हणजे त्यांचा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही.
आपल्या सडेतोड भाषणामुळे, वेळोवेळी कर्मचाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या या लोकप्रतिनिधींना आपल्या जातीचा मात्र बहुदा विसर पडलेला असावा. हाय कोर्टाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे, यामुळे त्यांची खासदारकीसुद्धा धोक्यात येऊ शकते. त्याबाबतीत माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘कोर्टाचा या निर्णयाचा मी आदर करते, आम्ही नक्कीच या निर्णयावर स्थगिती आणू’.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.