आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या हिंदी चित्रपटसृष्टी ही रिमेकची पंढरी झाली आहे. बॉलीवूडकरांकडे ओरिजिनल कथांचा अभाव असल्याने ते एखाद्या साऊथच्या हीट फिल्म्सचे हक्क विकत घेतात आणि काहीही मेहनत न घेता कम्प्युटरप्रमाणे Cntrl C आणि Cntrl V अर्थात कॉपी-पेस्ट करतात.
कथा थोडीफार बदलून त्याला आपला रंग द्यायचे कष्टसुद्धा ही लोकं घेत नाहीत, कथा तर सोडाच पण गाणीसुद्धा रिमेक आणि रीमिक्स करून वापरतात. बरं कोणता साऊथचा सिनेमा नसेल तर इतर कोणत्याही परदेशी सिनेमाची भ्रष्ट कॉपी बनवतात!
–
हे ही वाचा – आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!
–
एक काळ मात्र असा होता की भारतातले सिनेमे हे वर्ल्ड सिनेमा म्हणून अभ्यासले जायचे. केवळ सिनेमाच नव्हे त्या जुन्या सिनेमात काम करणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाचे जगभरातून कौतुक व्हायचे.
इरफान खान, ओम पुरीसारख्या कित्येक कलाकारांनी हॉलीवूडवरसुद्धा आपली छाप सोडली आहे. नीरज पांडेच्या A Wednesday सिनेमाचा तर ऑफीशियल रिमेक बनवण्यात आला ज्यात बेन किंग्सले सारख्या कसलेल्या नटाने काम केले!
सध्याची काही वर्षे सोडली तर भारतीय सिनेमाला एक मान होता तो या कमर्शियल मारधाड मसाला सिनेमांमुळे कमी झाला आहे. याच भारतीय सिनेमाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर करून देणारा एक मातब्बर कलावंत म्हणजे नासिरूद्दीन शहा!
नासिर यांच्या अभिनयाच्या चर्चा सातासमुद्रापारसुद्धा होतात, त्यांनी जितकं हिंदी सिनेमात काम केलंय त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त काम इंग्लिश थिएटर आणि सिनेमे यात केलं आहे, कमर्शियल सिनेमा आणि आर्ट सिनेमा यांच्यातला दुवा म्हणजे नासिरुद्दीन शहा.
तुम्हाला माहितीये का की चक्क हॉलीवूडच्या ‘गॉडफादरने’ आपल्या नासिरभाईला फॉलो केलं आहे, ते पण नासिरच्या एका भूमिकेमुळे. तो गॉडफादर म्हणजे दूसरा तिसरा कुणी नसून हॉलिवूडचा क्लास अॅक्टर अल पचीनो!
अल पचीनो कोणाला माहीत नाही? गॉडफादर हा सिनेमा जेवढा ब्रांडोचा तेवढाच अल पचीनोचाही. स्कारफेस सिनेमात त्याने साकारलेल्या टोनी मोंटानाचे मोठे पोस्टर संजय दत्तच्या बेडरूममध्ये टांगलेले असायचे, याच टोनी मोंटानावरुन बच्चनचा ‘अग्निपथ’ घेतला आहे.
आजही आपले कित्येक अभिनेते असे आहेत की जे अल पचीनोला आपला गुरु मानतात, पण खुद्द अल पचीनो आपल्या भारतीय कलाकाराच्या एका भूमिकेमुळे भारावून गेला होता त्याविषयीच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!
अल पचीनोच्या बऱ्याच दर्जेदार सिनेमांपैकी एक म्हणजे १९९२ मध्ये आलेला ‘सेंट ऑफ अ वुमन’. या सिनेमात अल पचीनोने एका अंध निवृत्त कर्नलची भूमिका साकारली होती, अत्यंत मानी, करारी अशा व्यक्तीची ती भूमिका होती.
फिल्मफेअरच्या मासिकात छापून आल्याप्रमाणे या भूमिकेसाठी अल पचीनोला नासिरूद्दीन शहाची बरीच मदत झाली होती.
खुद्द अल पचीनोनेच एका मुलाखतीत सांगितलं की – ही भूमिका करताना त्याने १९८८ मध्ये आलेल्या स्पर्श सिनेमातल्या नासिर यांनी साकारलेल्या अंध अनिरुद्ध परमार हा परफॉर्मन्स बऱ्याच वेळा पाहिला होता!
त्यानंतरच अल पचीनो यांनी सेंट ऑफ अ वुमन या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. एक अंध पण मानी व्यक्ती कशाप्रकारे बोलते, वावरते हे नासिर यांनी हुबेहूब वठवलं होतं.
–
हे ही वाचा – या सिनेस्टार्सनी खुलेआम सांगितलेत त्यांच्या खाजगी जीवनातील धक्कादायक किस्से
–
त्या वर्षी म्हणजे १९८८ मध्ये नसिरुद्दीन यांना स्पर्शसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर त्यानंतर अल पचीनो यांना सेंट ऑफ अ वुमनसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
यावरून लक्षात येतं की दोघांनी कीती सचोटीने ते पात्र साकरलं की दोन्ही देशातल्या प्रेक्षकांना ते पात्र भावलं आणि म्हणूनच दोघांनाही त्यांच्या क्षेत्रातले सर्वोच्च पुरस्कार मिळाले!
तर अशा या गॉडफादरला अभिनयाचे धडे गिरवायला भाग पाडणाऱ्या आपल्या लाडक्या नासिरुद्दीन शहा यांना आणि त्यांच्या कारकिर्दीला सलाम!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.