Site icon InMarathi

अंत्यसंस्काराला जाताना सुचली नव्या शो ची कल्पना, करण जोहरची विकृत मानसिकता

karan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुशांत सिंगच्या आत्म्हत्याने पूर्ण देश हादरला होता, एक सच्चा आणि मनस्वी कलाकार म्हणून सुशांत सिंगकडे बघितले जात होते, त्याच्या मृत्यूच्या तपासाच्यावेळी अनेकांवर संशयाची सुई ठेवली गेली होती यात एक नाव प्रामुख्याने घेतले जात होते ते म्हणजे कारण जोहर, स्टार किड्सला लाँच करतो असे आरोप आजही त्याच्यावर केले जात आहेत.

 

 

केवळ सुशांतचा मृत्युच नव्हे तर यापुर्वीही अनेक कलाकारांनी बॉलिवुडच्या या जीवघेण्या स्पर्धेत अपेक्षित नसतानाही हात पत्करली. त्यामुळे मोठ्या पडद्यावर मेकअप आणि भरजरी पोषाख चढवणा-या या बड्या सिलेब्रिटींचा खरा चेहरा किती विद्रूप असेल याची सामान्य प्रेक्षकांना कल्पनाही करता येणार नाही.

नेपोटिझन, ड्रग्सचा विळखा, आपले स्थान टिकवण्यासाठी केली जाणारी कॉम्प्रमाईझेस, अनैतिक संबंध या बॉलिवूडला मिळालेल्या शापातून उःशाप मिळवण्याचा प्रयत्न कलाकार करत नाहीत किंबहूना चंदेरी दुनियेत प्रवेश करताना या सवयी चटकन कशा अंगीकारल्या जातील याचा क्रॅशकोर्सही केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दिग्दर्शक करण जोहर आणि वाद हे समीकरण नव्याने सांगायला नकोच. यापुर्वी अनेक मुद्द्यांवरून कायमच चर्चेत राहणा-या करणने हम करे सो कायदा हा पवित्रा कधीही सोडला नाही.

स्टारकिडला कुरवाळणाऱ्या करणने सुशांत आता त्यापाठोपाठ कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक नवोदितांना बाजूला सारण्याचा जणूकाही चंगच बांधला आहे. पण केवळ नेपोटिझम नव्हे तर एकंदरित बॉलिवूड आणि चित्रपट यांकडे त्याचा पाहण्याचा बिभित्स दृष्टिकोन वारंवार समोर आला आहे.

 

हे ही वाचा – आधी सुशांत आता कार्तिक, असे कीती गुणी कलाकार बॉलिवूड गिळंकृत करणार?

असाच एक प्रसंग म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटी किती असंवेदनशील आहेत याचा जीवंत नमूनाच. हा प्रसंग अनेकांना यापुर्वीच ठाऊक असता तर नेटफ्लिक्सवर काही महिन्यांपुर्वी प्रदर्शित झालेली ‘बॉलिवूड वाइव्हज’ या सिरीजकडे तुम्ही ढुंकूनही पाहिलं नसतं.

बॉलिवूडमध्ये कलाकारांचा जितका बडेजाव आहे त्याहून कित्येक पटीने त्यांच्या पत्नी या चंदेरी दुनियेत मिरवताना दिसतात. पेज थ्री पार्टी असो वा शुटिंगचा सेट, डिझायनर ड्रेस, आपलं वय झाकण्याचे आतोनात प्रयत्न करणारा मेकअप आणि या क्षेत्रात फारसं कर्तृत्व नसूनही मक्तेदारी गाजवणाऱ्या या ‘सेलिब्रिटी वाईफ’ ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून अधिक फोफावताना दिसतोय.

नेमका हाच विषय कॅच करणाऱ्या करण जोहरने बॉलिवूड वाईव्हज ही सिरीज आखली. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांना तात्पुरता विरंगुळा मिळेल असं वाटलं होतं, मात्र प्रत्यक्षात सिरिजीचे पहिले दोन भाग पाहिल्यानंतर जो काही मनस्ताप झाला त्यापेक्षा मराठी वाहिन्यांवरील पठडीतल्या मालिका बऱ्या असं म्हणण्याची वेळ आली.

कोणतीही कथा, पटकथा आणि कोणताही सारासार विचार नसलेली सिरीज पाहणं जितकं त्रासदायक आहे त्याहूनही क्लेषकारक आणि संतापजनक आहे ते म्हणजे या कथेमागची कहाणी.

 

 

तर झालं असं की करण जोहर आणि महिप संजय कपूर, सीमा सोहल खान, भावना चंकी पांडे आणि अभिनेत्री निलम ही गॅंग मुंबईहून दिल्लीला निघाली होती. त्यांच्याच ग्रुपमधील एका मैत्रिणीच्या वडिलांचे अकस्मात निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ही मंडळी निघाली होती.

यामध्ये अभिनेत्री निलम हीने काही वर्षांपुर्वीपर्यंत मोठा पडदा गाजवला असला तरी त्यानंतर मात्र बॉलिवूड वाईफ होणंच पसंत केलं होतं. उर्वरित तिघींची ओळख म्हणजे यशस्वी कलाकारांच्या पत्नी, एवढीचं!

तर दिल्लीला जाताना विमानप्रवासात यांच्या गप्पा सुरु झाल्या, बॉलिवूडमध्ये गॉसिप सुरु व्हावे आणि तिथे करण जोहर नसावा हे शक्यच नाही, तर या चौघींच्या गप्पात करणही मिसळला आणि नेहमीप्रमाणेच इतर कलाकारांची उणीधुणी काढणं सुरु झालं, त्यानंतर कपडे आणि फॅशन यांवर विषय घसरणं अपेक्षितच होतं.

दिल्लीला अंत्यसंस्काराला निघालेल्या या चौघींच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. एकमेकींच्या कपड्याची स्तुती करत, फॅशन टिप्स देणाऱ्या या चौघींना पाहून या एखाद्या पिकनीकसाठी निघाल्याचे कुणालाही वाटले असते.

नेमकी हीच बाब करण जोहरने हेरली आणि या प्रवासादरम्यानच या चारही सेलेब्रिटी पत्नींचा रोजचा जीवनपट मांडणारी वास्तवदर्शी सिरीज बनवण्याचं त्याने निश्चित केलं.

 

हे ही वाचा – पडद्यावर रोमान्स, घरात मारहाण – ५ आणि ८ व्या जोडीबद्दलचं धक्कादायक वास्तव तुम्हाला ठाऊक नसेल

एखाद्याच्या दुःखात सहभागी होताना किंवा अंत्यसंस्कारासारख्या गंभीर विधीला जातानाही सेलिब्रिटींमध्ये नसलेली संवेदनशीलता किंवा स्वतःच्या कोषातून बाहेर न येण्याची इच्छा हे वास्तव भयावह आहेच मात्र त्याहूनही विकृत मानसिकता म्हणजे ही बाब करणने स्वतः एका मुलाखतीत मांडणं.

बॉलिवूडकरांसाठी कोणताही प्रसंग हा इव्हेन्ट म्हणून मानला जातो. मग तो एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी बाळाचा जन्म असो, सेलिब्रिटी कपलचा घटस्फोट, किंवा सहकलाकारांच्या घरातील मृत्युसारखी दुःखद घटना!

बॉलिवूडकरांना कशाचेही गांभिर्य नाही, किंबहुना त्यांना स्वतःपेक्षा इतर कोणाचाही विचार करणं रुचत नाही ही बाब यापुर्वीही अनेकदा समोर आली आहे. मात्र सिनेमा, सिरीजमधून प्रेम, विश्वास यांचा खोटा आदर्श देणाऱ्या कलाकारांची असंवेदनशीलता, मेकअपने लपवलेल्या मुखवट्यांमागील विद्रुपता आणि हे वास्तव मान्य करत ते साजरं करण्याचा निर्लज्जपणा यांना जबाबदार कोण? स्पर्धेतील कलाकार? त्यांना प्रोत्साहन देणारी मिडीया की या कलाकारांचे खरे चेहरे ठाऊक असूनही त्यांना आदर्श मानणारे प्रेक्षक?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version