Site icon InMarathi

इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

family man 2 featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अनलॉक बाबतचा संभ्रम, मराठा आरक्षणाचा वाद आणि आता पाठोपाठ फॅमिलीमॅनचा सीझन २, या तीन विषयांवरून सध्या सोशल मीडिया पेटला आहे. आधीच लोकं घरी बसून वैतागले होते अशातच फॅमिलीमॅनचा दूसरा सीझन प्राईम व्हीडियोवर रिलीज केला गेला!

सिरिजच्या ट्रेलरपासून ही सिरिज वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होती, तांडवमुळे झालेली दिरंगाई असो किंवा तमिळ लोकांबद्दल केलेलं भाष्य असो, पण अखेर असे अनेक अडथळे पार करत ही सिरिज रिलीज झाली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.

 

हे ही वाचा “पुढच्याला ठेच मागचा शहाणा!” फॅमिली मॅन २ पुढे का ढकलली जातीये?

मुळात या सिरिजच्या पहिल्याच सीझनचा शेवट असा केला होता की लोकं हमखास दूसरा सीझन बघणारच, त्यामुळे संपूर्ण सिनेविश्वात या सिरिजची चर्चा होती. सिरिज रिलीज होऊन ४-५ दिवसच झाले असतील, तर लगेच या सिरिजचे भरमसाठ मीम्स सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलेत.

यातला तो आयटी फर्मच्या बॉसला मनोज वाजपेयी जो दम देतो तो सीन असो, तामीळ संवाद असो किंवा यातलं चेल्लम नावाचं एक भन्नाट पात्र असो, यावर आधारित सोशल मीडियावर बरेच मीम्स तुम्हाला व्हायरल होताना दिसतील.

 

 

एकंदरच हे मीमकरी मंडळी नेमकं कसं एवढा क्रिएटिव विचार करून इतकी धम्माल मीम्स तयार करतात याचं आश्चर्य वाटतंच, शिवाय सुपरहिट होणाऱ्या प्रत्येक फिल्म आणि सिरिजच्या बाबतीत हे घडतं.

फॅमिलीमॅनच्या या सीझनचे काही मीम्स तर इतके भन्नाट आहेत की तुम्ही पोट धरून हसाल, चला तर ते मीम्स बघूया आणि मनसोक्त हसूयात!

या सिरिजमधलं चेल्लम हे पात्र म्हणजे आपल्या गुगलबाबापेक्षा अजिबात कमी नाही, म्हणूनच तर मीमकऱ्यांनी गुगलला बगल देत चेल्लम सरांचच सर्च इंजिन उपयोगी आहे हे सांगितलं आहे!

 

 

सिरिजमध्ये अर्ध्याहून अधिक संवाद हे तामिळ भाषेत आहेत, त्यामुळेही प्रचंड ट्रॉलिंग होताना दिसत आहे, पण ज्यांनी ज्यांनी टॉरेंटसारख्या अवैध साइट्स वरुण डाउनलोड करून ही सिरिज पाहिली आहे त्यांची काहीशी अशीच अवस्था झाली असेल ना!

 

 

हा फोटो मीम म्हणून कितीही मजेशीर वाटला तरी हे सत्य आहे, या २ व्हीलन्सपेक्षा श्रीकांत तिवारीचे मोठे शत्रू त्याच्याच घरात लपलेत!

 

 

हा चेल्लम सरांचा पेटंट डायलॉग असणार जो कधीच आपल्याला स्क्रीनवर ऐकायला किंवा बघायला मिळालेला नाही.

 

 

या सीनने तर इंटेरनेटवर धुमाकूळ घातला आहे. आयटी फर्म आणि कॉर्पोरेट जॉब्स करणाऱ्या कित्येक लोकांचं स्वप्न मनोज वाजपेयीने या सीनमधून पूर्ण केलं आहे!

 

 

सिरिजमधल्या जेके या पात्राला जसा अनुभव आला तसाच तुम्हालाही कधीतरी आला असेलच नाही का?

 

जी लोकं ही सिरिज बघू इच्छित आहेत त्यांना सबटायटल्स असोत किंवा नसोत ही गोष्ट यायलाच पाहिजे, तरच तुम्ही ही सिरिज बघण्यासाठी पात्र आहात.

 

 

पहिला सीझन बघून झाल्यावर ज्यांनी “लोणावळ्यात नेमकं काय झालं?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दूसरा सीझन पाहिला त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली असणार!

 

 

मनी हाइस्टचा प्रोफेसर असो किंवा एलॉन मस्क…चेल्लम सर सगळ्यांसाठी कधीही available असतात, त्यांच्या महितीशिवाय मोठमोठे दिग्गजदेखील त्यांची रणनीती आखत नसतील.

 

 

हा झाला मजेचा मुद्दा पण या सिरिजमधले चेल्लम हे पात्र साकारणारा कलाकार असो किंवा मनोज वाजपेयीपासून छोटे छोटे कलाकार असो, प्रत्येकाने या सिरिजमध्ये जीव ओतून काम केलंय त्यामुळेच तर यावरचे मीम जोक्ससुद्धा लोक आवडीने शेयर करतायत.

तुम्ही सिरिज पहिली नसेल तर एकदा अवश्य बघा आणि तुमच्याकडेसुद्धा असेच काही भन्नाट मीम्स किंवा जोक्स असतील तर ते कॉमेंटमध्ये जरूर शेयर करा!

===

हे ही वाचा इरफान आणि मनोजमधली एक अज्ञात “दौड”… जिच्या कथा आजही चर्चिल्या जातात

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version