Site icon InMarathi

“काय गूढ लपलं असेल…” स्पृहा जोशीची नवी कविता होतीये सोशल मीडियावर व्हायरल!

spruha joshi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्पृहा जोशी म्हणजे एक मनस्वी, लाघवी आणि लोकांचं आवडतं व्यक्तिमत्व… तिचा अभिनय आणि तिचं लिखाण याविषयी बोलायचं झालं, तर ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ हे शब्द अगदी चपखल बसतात. ती एक उत्तम अभिनेत्री आहे, आणि अनेकांची लाडकी सुद्धा आहे.

ती जशी एक अभिनेत्री म्हणून, अनेकांना आवडते, तशीच कवयित्री म्हणूनही सगळ्यांची लाडकी आहे. आजच्या काळात कवितांना मनसोक्त दाद देणारी मंडळी आधीपेक्षा कमी झालेली दिसून येतात, पण तरीही स्पृहाच्या कवितांना मात्र नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो.

नेहमीच फेसबुकवर अगदी उत्साहाने लिखाण करणाऱ्या स्पृहाची अशीच एक कविता सध्या फाकरच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय.

 

 

हे पहिलं कडवं वाचताच, अथांग समुद्र नजरेसमोर येऊन जातो. या कवितेत स्पृहाने पुढे म्हटलंय;

 

 

अगस्ती ऋषींच्या उदाहरणातून दुसरं कडवं उत्तम रंगवलंय, आणि कवितेचा शेवट सुद्धा तितकाच छान केलाय;

 

 

या कवितेवरील कमेंट्सचा सागर सुद्धा तितकाच अथांग पसरलाय. बघुयात. स्पृहाचे चाहते या कवितेबद्दल आणि स्पृहा बद्दल नेमकं काय म्हणतायत ते…

===

हे ही वाचा – एका शिक्षकाने ‘अवघ्या काही तासात’ लिहिलं गाणं: जे भारताला ‘स्वच्छतेची’ सवय लावतंय

===

स्पृहा कायम हसतमुख असते, तिचं ते लाघवी हास्य अनेकांना आवडतं हेही आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. असाच एका हसऱ्या वआणि निरागस व्यक्तीने अशी काहीशी दुःख दाखवणारी कविता करावी, यावर आशिषजी व्यक्त झालेले आहेत.

 

 

स्पृहाने या कवितेसोबतच तिचा एक छानसा फोटो सुद्धा फेसबुकवर टाकलेला आहे. हा फोटो आणि कविता दोन्ही सुंदर आहे, असं काहींचं म्हणणं आहे, तर एक व्यक्ती म्हणूनही स्पृहा गोड असल्याने तिला अशा कविता सुचतात असंही चाहते म्हणतायत.

 

 

या कवितेवर कमेंट करण्याच्या माध्यमातून काहीजण स्पृहाशी संवादही साधू पाहतायत. एवढंच नाही, तर तिच्या नियमित वाचकांनी त्यांची फर्माईश सुद्धा व्यक्त केलेली पाहायला मिळतेय.

 

 

स्पृहाचं सौंदर्य आणि लिखाण या दोन्हीचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स कमी नाहीत बरं का मंडळी… काही चाहत्यांनी तर स्पृहासह, तिने वर्णन केलेल्या सागराचं अंतरंगदेखील उत्तम असल्याचं म्हटलंय.

 

 

अथांग सागराविषयी खोलवर आशयाचं भाष्य करणाऱ्या स्पृहाच्या या कवितेवर, एखादी तशीच खोलवर विचारांची एखादी कमेंट आली नसती, तरच नवल होतं, नाही का…!!

 

 

नेहमीच्या वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतायत असं म्हणायला हरकत नाही. अशाच एका वाचकाने, आणखी एक फर्माईश केलेली दिसतेय. त्यांच्या एका लाडक्या मालिकेतील, स्पृहाने साकारलेलं त्यांचं लाडकं पात्र, आणि त्या पात्राने म्हटलेल्या कविता सुद्धा पुन्हा वाचायला मिळाव्यात असं तत्या म्हणतायत.

 

 

अगदी मोजक्या शब्दांत काहींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्पृहाच्या स्मितहास्याचं सुद्धा कौतुक केलेलं दिसतंय.

 

===

हे ही वाचा – स्पृहा चा वादग्रस्त फोटो आणि अवधुत गुप्तेची चपराक!

===

स्पृहाच्या लिखाणात जड शब अगदी लीलया वापरलेले आढळतात. मग तिच्या कवितेविषयी अभिप्राय देताना चाहत्यांनी तरी मागे का राहावं?

 

 

एखादी कविता किंवा साहित्य वाचून त्याविषयी व्यक्त व्हायला शब्दच सुचले नाहीत, की मग अशा एकाच शब्दाचा किंवा फेसबुकने तयार करून ठेवलेल्या रेडिमेड शब्दांचं आधार घ्यावा लागतो.

 

 

चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांविषयी खूपच कौतुक असतं यात शंकाच नाही. अशाच एका चाहत्याने, या पोस्टवर त्याच्या भावना माणपऊन व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात.

 

 

स्पृहाच्या कविता अगदी नियमितपणे वाचणारे अनेक रसिक असल्याचं कमेंट्समधून पाहायला मिळतंय. तिच्या फोटोची आणि शब्दांची तुलना करणाऱ्या सुद्धा अनेक कमेंट्स तुम्हाला दिसू शकतील बरं का मंडळी…

 

 

तिचं कौतुक करताना चाहते थकत नाहीतच. कुणी तिला इतके छान शब्द कसे सुचतात असं विचारतंय, कुणी तिची काव्यरचना वाचून स्फुरलेली काव्यरचना कमेंटमधून मांडतंय, तर कुणी या कवितेतून त्यांना काय उमगलं ते मांडायचा प्रयत्न करतंय.

 

 

या कवितेच्या पोस्टसह तिने फेसबुकवर टाकलेला फोटोदेखील खरंच छान आहे.

 

 

आता हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा कदाचित याच विचारात पडला असाल, की स्पृहाची कविता अधिक सुंदर आहे, की स्पृहा स्वतः…!!

===

हे ही वाचा – स्पृहा जोशीचा हा अनुभव मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version