ही लक्षणं म्हणजे एका गंभीर समस्येची सुरुवात… अशा त्रासांकडे दुर्लक्ष करू नका
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रोगप्रतिकारकशक्ती उत्तम राहण्यासाठी ‘सी’ व्हिटॅमिनची गरज असते, हे तर आपण नेहमीच ऐकतो. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डीची सुद्धा याकरिता आवश्यकता असते. कारण, डी व्हिटॅमिन हे अत्यंत महत्त्वाचे आणि शरीरातील अनेक घटकांसाठी उपयुक्त असणारे व्हिटॅमिन आहे.
सध्याच्या काळातील कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यामुळे घराबाहेर न पडण्याचा आपला प्रयत्न आणि एकूणच जीवनमान या सगळ्याचा विचार करता, आपल्याला व्हिटामिन डी मिळवण्यासाठी कोवळ्या उन्हात जाणे शक्य होत नाही.
एवढेच नाही, तर आपल्या नियमित आहारातून व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळवणे फारच कठीण आहे. मासे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामधून काही प्रमाणात डी व्हिटॅमिन मिळत असतं, मात्र हे प्रमाण पुरेसं ठरत नाही.
यामुळेच मग व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची शक्यता निर्माण होते. व्हिटॅमिन डीची कमतरता, ही शरीरासाठी फार मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. एक नाही तर अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता वेळेत लक्षात येणं कधीही फायदेशीर ठरतं.
व्हिटॅमिन डी न मिळण्याची काही सामान्य कारणं
१. त्वचेचा काळा अथवा गडद रंग
२. वय अधिक असणं
३. दुधजन्य पदार्थ आणि मासे अशा पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन
४. सातत्याने सनस्क्रीनचा
५. स्थूलपणा
६. घराबाहेर न पडणं
सध्या लॉकडाऊनसदृश्य स्थितीमुळे घराबाहेर न पडणं, हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. थोडक्यात काय तर, व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होण्याची कारणं अगदी साधी आहेत. त्यामुळेच, या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – अनेक गंभीर आजारांवरील एकच रामबाण, पण दुर्लक्षित उपाय!
===
‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेची प्रमुख लक्षणं
डी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जाणवणारी लक्षणं अगदी तुमच्या नेहमीच्या जीवनातील असू शकतात. त्यामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. म्हणूनच या लक्षणांकडे कानाडोळा होणार नाही याची काळजी घ्या.
सतत आजारी पडणं
सातत्याने येणारं आजारपण, हे व्हिटॅमिन डी कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. रोगप्रतिकार शक्ती उत्तम राखून व्हायरस आणि बॅक्टरीया यांचा सामना करत राहण्याचा काम व्हिटॅमिन डी करत असतं. त्यामुळेच त्याची कमतरता आजारपणासाठी कारणीभूत ठरते.
हाड आणि सांधेदुखी
व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळेच, त्याच्या कमतरतेचा थेट परिणाम हाडांवर होतो. म्हणूनच हाडे आणि पर्यायाने सांधे सुद्धा दुखू लागतात.
थकवा आणि स्नायू दुखणे
हाडांप्रमाणेच सँयूंसाठी सुद्धा व्हिटॅमिन डी फार आवश्यक असते. ते न मिळाल्याने स्नायू दुखणे किंवा थकवा येणे अशी लक्षणं दिसू शकतात.
पाठदुखी आणि अंगदुखी
डी व्हिटॅमिनचा हाडांच्या मजबुतीशी थेट संबंध असल्याने, असे विविध आजार बघायला मिळतात. हाडे मजबूत नसतील तर त्याचा परिणाम अंगदुखी किंवा पाठदुखी असा होऊ शकतो.
त्यामुळेच सतत दुखणारी पाठ किंवा सातत्याने होणारी अंगदुखी याकडे दुर्लक्ष करू नका.
===
हे ही वाचा – पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…
===
नैराश्य
होय… नैराश्य हेसुद्धा व्हिटॅमिन डीची कमतरता असण्याचं लक्षण आहे. व्हिटॅमिन डी कमी असण्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. त्यामुळेच अशावेळी मूडमध्ये फरक पडू शकतो. निराश वाटणं हे त्याचंच एक लक्षण ठरतं.
फ्रॅक्चर
हे हाडं मजबूत नसण्याचं लक्षण ठरतं. हाडांची मजबुती कमी झाली, तर अर्थातच फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते.
केस गळणं
ताण हे केस गळण्याचं एक कारण असतं, हे तर तुम्हाला माहीतच असेल. पण सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचे केस गळणं, हे पोषकतत्वांच्या कमतरतेचं कारण असू शकतं. डी व्हिटॅमिन पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास ना त्रास होऊ शकतो.
===
हे ही वाचा – रोज गळणाऱ्या केसांचं कारण आहेत तुमच्याच या १० सवयी, आजपासूनच बदला
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.