' ऐकावे ते नवलच! इथे लग्नासाठी चक्क पळवली जाते ‘होणारी बायको’… – InMarathi

ऐकावे ते नवलच! इथे लग्नासाठी चक्क पळवली जाते ‘होणारी बायको’…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

या जगात असणाऱ्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टींमधील एक परंपरा म्हणजे लग्न. देश कोणताही असला तरी लग्नाला असलेले महत्व सगळीकडे सारखेच आहे. असे असूनही लग्नाच्या प्रत्येक देशांच्या, धर्माच्या, जातींच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात.

आपण आपल्या देशाचाच विचार केला तरी आपल्याला या लग्नांमधील विविधता लक्षात येईल. ‘लग्न ‘ सर्वांसाठी एकच असले तरी ते संपन्न करण्याच्या परंपरा, रीतिरिवाज मात्र वेगळे. आपल्या कडे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी एक म्हण आहे. यात जर आपण थोडा बदल करून ‘जमाती तितक्या पद्धती’ असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

 

marriage 1 inmarathi

 

===

हे ही वाचा : मुघलांचा विचित्र इतिहास: मुघल बादशहा मुलींची लग्न नातेवाइकांतच लावत

===

लग्नाच्या असणाऱ्या विविध पद्धतींपैकी आज आम्ही तुम्हाला या लेखातून एका अशा लग्नाच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्यापासून राहणार नाही. काही खट्याळ लोकांना तर ही पद्धत ऐकून आनंद सुद्धा होईल.

आपल्या देशात तर लग्नाला, लग्नाच्या विधींना अनन्यसाधारण महत्व आहे. एक पवित्र सोहळा म्हणून आपल्याकडे लग्नाकडे पाहिले जाते. मात्र जगातील एका देशात लग्नाचा अर्थ जरा वेगळा आहे.

 

marriage 2 inmarathi

 

सामान्यतः लग्न हे आई वडील ठरवतात. किंवा मुलामुलींची आधीपासूनच ओळख आणि पसंती असेल तर ते आपल्या आईवडिलांना सांगतात आणि त्यांच्या परवानगीने लग्न करतात. पण या जगात एक असा देश आहे. जिथे हे काहीच केले जात नाही.

पूर्व आफ्रिकेतील दक्षिण सुदानच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या ‘लटूका’ नावाच्या एका जमातीमधील लग्नाच्या हटके आणि विचित्र पद्धतीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

या जमातीमधील लोकांच्या सर्वच पद्धती परंपरा ह्या जगाच्या परंपरा आणि पद्धतींच्या एकदम उलट आणि खूपच वेगळ्या आहेत. खासकरून लग्नाच्या पद्धती तर खूपच वैशिट्यपूर्ण आहेत.

 

latuka tribe 5 inmarathi

==

हे ही वाचा : आधी मुलांना जन्म, नंतर लग्न : विचित्र प्रथा जपणा-या या अजब समाजाची गजब कथा

==

या जमातीमध्ये जर पुरुषांना एखादी स्त्री आवडली आणि त्यांना तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असेल तर ते त्या स्त्रीचे अपहरण करतात आणि तिला पळवून घेऊन जातात. पुढे काही कालावधीनंतर तो मुलगा त्या मुलीला घेऊन आपल्या सर्व नातेवाईकांसह मुलीच्या घरी तिच्या कुटुंबाची लग्नासाठी संमती घ्यायला पोहचतो.

 

latuka tribe 6 inmarathi

 

जर त्या मुलीच्या वडिलांनी त्या लग्नाला होकार दिला तर ते लग्न होते. जर मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला तर त्या मुलाला पुन्हा तिच्या वडिलांकडे परत द्यायचे की परवानगीशिवाय लग्न करायचे हे त्या मुलाच्या निर्णयावर ठरते. मुलाला यापैकी एक निर्णय घेण्याचे पूर्ण स्वतंत्र असते.

 

latuka tribe inmarathi

 

या समाजात स्त्रियांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुष विविध शक्कल लढवतात. त्यासाठी इथे दरवर्षी ‘गेरेयोल’ नावाचा महोत्सव देखील भरवला जातो. या महोत्सवात पुरुष वेगवेगळ्या वेशभूषा करून येतात आणि आलेल्या महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

 

latuka tribe 3 inmarathi

 

या जमातीमधील लोक शेतीसोबतच शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्या पाळण्याचे काम करतात. ते ज्वारी, मका, शेंगदाणे, बटाटा आणि कंद आदी पिकांची शेती करून त्यांचा उदरनिर्वाह करतात.

===

हे ही वाचा : अजब लग्नाची गजब गोष्ट – उतावळ्या नवऱ्याला त्याच्याच लग्नात ‘नो एन्ट्री’

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?