आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नव्वदच्या दशकात जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी होत होत्या. अमेरिका आणि आणि रशिया यांच्यामधलं शीत युद्ध जवळजवळ संपुष्टात येत होतं, याचं कारण म्हणजे रशियाचे झालेलं पतन. अमेरिका आणि रशिया यासारखी बलाढ्य राष्ट्रे आपलं वर्चस्व जागतिक स्तरावर ठेवण्याकरिता कायमच एकमेकांविरुद्ध होत्या.
परंतु रशियामध्ये अंतर्गत बंडाळी, देशाची खालावलेली आर्थिक परिस्थिती या सगळ्यामुळे देशाची एकूण अवस्था बिकट झाली.
जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा आकाराने मोठया असलेल्या रशियाचे त्यावेळेस खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुळे शेवटी तुकडे पडले. त्यातून १५ नवीन देश उदयास आले.
(USSR) युएसएसआर म्हणजेच युनियन ऑफ सोशलिस्ट सोव्हिएट रिपब्लिक, ज्याला पूर्वी सोव्हिएत युनियन म्हटलं जायचं. १९४५ ते १९९१ पर्यंत हा एक बलाढ्य देश म्हणून अस्तित्वात होता आणि जागतिक महासत्ता होण्याच्या शर्यतीतही होता.
–
हे ही वाचा – “कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या
–
या मोठ्या घडामोडीचे जागतिक स्तरावर वेगवेगळे परिणाम तर घडलेच पण अंतराळात देखील रशियाच्या विभाजनाचे पडसाद उमटले. म्हणजे त्याचं झालं असं की रशिया आणि अमेरिका तसंही आधीपासूनच एकमेकांशी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा करायची.
अमेरिकेच्या नासाने आणि रशियाने अंतराळात आपली आपली अवकाश स्थानक निर्माण केली होती तर रशियाने निर्माण केलेल्या अवकाश स्थानकाचे नाव होते मीर.
आता आपण जे बघतो नासाचे अंतराळवीर सतत अंतराळात जात येत असतात, त्याचप्रमाणे त्यावेळेस रशियाचे अंतराळवीर देखील अंतराळात जायचे. त्यापैकीच एक म्हणजे सर्जी क्रिकलेव.
सर्जी क्रिकलेव यांचा जन्म अगोदरच्या रशियातील लेनिनग्राड येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अंतराळात जायचे होते. त्यांना पक्षाच्या उडण्याचे आकर्षण होतं.
पुढे त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि रॉकेट इंजिनिअरिंग करून अंतराळवीर बनायचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. पुढे अंतराळात जाण्यासाठी त्यांनी एक वर्षाचे ट्रेनिंगही घेतलं.
ज्यामध्ये अंतराळ स्थानक दुरुस्त करणे आणि स्पेसवॉक करणे या गोष्टी अंतर्भूत होत्या. फक्त त्यात अंतराळ स्थानकात एकटच कसं राहायचं ह्याचं मात्र ट्रेनिंग नव्हतं.
तशी त्यांच्या अंतराळ यात्रेची सुरुवात देखील कठीणच झाली. १८ मे १९९१ ला अंतराळ स्थानकात जातानाच त्यांना अडचणी आल्या.
त्यांचं स्पेस शटल अंतराळ स्थानकाला नीट जोडलं गेलं नव्हतं, त्यावेळेस सर्जी क्रिकलेव यांनी मॅन्युअलीच सगळ्या गोष्टी हाताळल्या. ज्यामध्ये त्यांच्या सकट इतर अंतराळवीरांच्या जीवालाही धोका होता. पण त्यात ते यशस्वी झाले आणि त्यांनी अंतराळ स्थानकात प्रवेश केला.
सुरुवातीला त्यांना अंतराळ स्थानकात खूप छान वाटत होतं. तिथून दिसणारी पृथ्वी त्यांना खूप सुंदर भासत होती. आपण पक्षाप्रमाणे हलके होऊन उडतोय याचं त्यांना कौतुक वाटत होतं.
तसं त्यांचं अंतराळ स्थानकातलं नॉर्मल आयुष्य सुरू होतं. त्यांना तिथे अजून पाच महिने घालवायचे होते पण त्यांना पृथ्वीवरुन काही बातम्या येत होत्या ज्या त्यांची काळजी वाढवणाऱ्या होत्या.
रशियाचं पतन आणि नवीन झालेले देश याची माहिती त्यांना मिळाली. त्यावेळेस ते म्हणतात की, त्यावेळेस पहिल्यांदा कुटुंबाची आणि मित्रांची काळजी वाटली. आणि या गोष्टीचा अंतराळ क्षेत्रावर काय परिणाम होईल ही भीती देखील त्या वेळेस वाटून गेली. त्यांची भीती खरी ठरली!
दुसऱ्या देशाचे नागरिक म्हणून रशियाने त्यांना परत आणण्यासाठी नकार दिला. रशियाचे त्यावेळेसचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या देशाने म्हणजेच कझाकस्तानने सर्जी क्रिकलेव यांच्या पाच महिन्यांच्या काळानंतर त्यांच्या जागी दुसऱ्या माणसाची नियुक्ती करावी.
पण त्यावेळी कजाकिस्तान म्हणजे नवीन झालेला देश. तिथे कोणताही प्रशिक्षित अंतराळवीर नव्हता. सहाजिकच सर्जी यांची स्थानकात राहण्याची वेळ वाढली.
सर्जी यांना जे ट्रेनिंग मिळालं होतं ते फक्त पाच महिने अंतराळात राहण्याचे होतं. परंतु आता त्यांना अजून एक महिना अंतराळात काढावा लागणार होता..
त्यांच्याबरोबर असलेले इतर अंतराळवीर पृथ्वीवर परत गेले. आता त्या मिर अंतराळ स्थानकात ते एकटेच उरले होते. रशियाने देखील परत दुसरे अंतराळवीर त्या स्थानकावर पाठवले नाहीत, कारण देशात आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.
–
हे ही वाचा – मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही!
–
तो महिना त्यांनी कसाबसा एकटं राहून काढला. परत एक महिन्यानंतरही त्यांना हेच ऐकवण्यात आलं. आता मात्र सर्जी यांची चिंता वाढली, कारण जास्त काळ अंतराळात राहणे देखील धोकादायक आहे.
अंतराळातील रेडिएशनचा परिणाम, कॅन्सरची भीती इत्यादी गोष्टी चिंतादायक होत्या. दिवसेंदिवस त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होत होती.
ते त्यांच्या घरापासून खरंतर ३५४ किलोमीटर अंतरावर होते. परंतु त्यांना त्यांच्या घरी जाता येत नव्हतं.
तसं पाहिलं तर मिर अंतराळ स्थानकावर आणीबाणीच्या काळात पृथ्वीवर परतण्यासाठी सोयुझ कॅप्सूल ठेवलेल्या होत्या. त्यात बसून ते येऊ शकत होते. परंतु त्यांना मिर अंतराळ स्थानकाचीही तितकीच काळजी होती.
ते गेल्यानंतर अंतराळ स्थानकावर कोणीच राहणार नव्हतं आणि अंतराळ स्थानक नष्ट होण्याची भीती होती म्हणूनच ते मीर वरच राहिले. तोही महिना गेला आणि नंतर अजून एक महिना. केवळ वाट पाहण्यापलीकडे सर्जी यांच्या हातात काहीच नव्हते.
त्यांच्या जवळचे खाण्याचे पदार्थही संपत आले होते. त्यांनी सकारात्मकता यावी म्हणून मध पाठवण्याची विनंती केली, पण त्यांना जे पाठवण्यात आलं ते तेल लावलेले लिंबू.
देशाची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे मला चांगलं खायला मिळणं देखील अवघड होतं. असं सर्जी म्हणतात. शेवटी अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये अंतराळ क्षेत्राबद्दल काही समझोता झाला.
अमेरिकेने रशियाला काही आर्थिक मदत दिली ज्यामुळे रशियाने दुसरे अंतराळवीर मिर वर पाठवले आणि सर्जी क्रिकलेव यांना त्यांच्या अंतराळातील ३११ (हा जो त्यावेळेचा विक्रम होता) दिवसानंतर २५ मार्च १९९२ रोजी पृथ्वीवर परत आणण्यात आलं. त्यांनी पृथ्वीभोवती ५००० चकरा मारल्या होत्या.
ज्यावेळी सर्जी क्रिकलेव पृथ्वीवर आले त्यावेळी त्यांना प्रचंड अशक्तपणा आलेला होता. त्यांना उभे राहणे देखील अशक्य होतं. त्यांच्या मिशन कंट्रोल मधील लोकांनी त्यांना उचलून आणलं. त्यांना फरकोट देण्यात आला आणि त्यांना पिण्यासाठी सुप देण्यात आलं.
ज्यावेळी ते अंतराळात गेले त्यावेळेस त्यांना सायंटिस्ट म्हणून दर महिन्याला सहाशे रुबल पगार मिळायचा पण परतल्यानंतर मात्र त्यांच्या पगारात घट झाली.
ज्या लेनिनग्राड मधून सर्जी क्रिकलेव गेले होते आता ते पृथ्वीवर अस्तित्वात नव्हते. आता त्याचं नाव सेंट पीटर्सबर्ग असं करण्यात आलं होतं.
सर्जी परत आले त्यावेळेस त्यांच्या अंगावर जो स्पेस सूट होता त्यावर युएसएसआर असं नाव होतं आणि रशियाचा लाल रंगाचा झेंडा होता. म्हणूनच त्यांना शेवटचा सोव्हिएत रशियन नागरीक म्हटलं गेलं.
नंतर त्यांना रशिया मध्ये हिरो म्हटलं गेलं. कारण त्यांनी जास्त काळ प्रचंड मानसिक तणावात अंतराळात राहण्याचा एक विश्वविक्रम रचला होता. पृथ्वीवर परत आल्यानंतर दोनच वर्षात परत एकदा ते स्पेस मिशनच्या कामावर गेले.
पण या वेळेस रशियन अंतराळवीर म्हणून नासाच्या शटल मधून अंतराळात गेले. त्यानंतर थोड्याच वर्षात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे ते पहिलेच रशियन अंतराळवीर ठरले.
===
हे ही वाचा – ही कुत्री प्रत्येक माणसाचं स्वप्न शब्दशः जगली आहे! जाणून घ्या, तिचा भावूक जीवनप्रवास!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.