शाहरुख म्हणतो, इच्छा असूनही मी कधीच अक्षय कुमारसोबत काम करणार नाही…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलिवूड म्हणजे मायानगरी! स्क्रीनवर दिसणारे सिनेमातील कलाकार, त्यांचं प्रसिद्धीचं वलय, त्यांचं स्टारडम या सगळ्या गोष्टींची सामान्य माणसाला क्रेझ असते. ही कलाकार मंडळी त्यांच्या आयुष्यात काय करतात, त्यांचं जीवनमान कसं असतं या सगळ्याची उत्सुकता असते.
सोशल मीडियाने आता या सगळ्याच गोष्टी अगदी साध्या आणि सोप्या करून टाकल्या आहेत. कधी मॉर्निंग वॉकला तर कधी सायकलिंगसाठी, कधी विरंगुळा म्हणून कुत्र्यांना फिरवण्यासाठी बाहेर पडणारे हे स्टार्स लोकांच्या कॅमेऱ्यात कैद होतात, आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी सगळ्यांच्या समोरच प्रकट होतात.
कधी कधी तर हे सेलिब्रिटी स्वतःच त्यांच्या दिनक्रमात एखाद्या गोष्टीचा विडिओ इन्स्टाग्राम किंवा फेसबुकसारख्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांसाठी प्रसिद्ध करतात. थोडक्यात काय, तर सोशल मीडियामुळे, चाहत्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू लागली आहेत. मात्र तरीही असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं चाहते शोधू शकलेले नाहीत.
अशाच प्रशांमधील एक प्रश्न म्हणजे, शाहरुख, आमिर आणि सलमान ही तिन्ही खान मंडळी एकत्र काम कधी करणार?
त्यांच्या चाहत्यांना हा प्रश्न अगदी नक्कीच पडत असणार. अर्थात, या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल, किंवा कदाचित कधीच मिळणार नाही, पण अशाच एका क्लिष्ट प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं आहे. बॉलिवूडमधील दोन तगडे स्टार्स शाहरुख आणि अक्षय कुमार एकत्र काम का करत नाहीत, याचं उत्तर शाहरुखने दिलं आहे.
पाहायला गेलं तर, शाहरुख आणि अक्षय कुमार हे दोन कलाकार ‘दिल तो पागल हैं’ या सिनेमात पडद्यावर एकत्र दिसले होते. मात्र त्यानंतर हा योग कधीच जुळून आलेला नाही.
===
हे ही वाचा – खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!
===
या मधल्या काळात अक्षय कुमारने देशभक्तीवर आधारित चित्रपट बनवणारा, म्हणून आपली छबी निर्माण केली. शाहरुखने सुद्धा त्याच्या खास शैलीत अनेक हिट सिनेमे दिले. काही सुपरफ्लॉप सिनेमांचं पाप सुद्धा माथी मारून घेतलं, आणि तरीही अक्षय आणि शाहरुख ही जोडी पुन्हा एकत्र काही दिसली नाही. याला कारणही तसंच विचित्र आहे.
कामाची पद्धतच आड येते
शाहरुख खान आणि अक्षय कुमार या दोन मोठ्या स्टार्सची काम करण्याची पद्धत, हेच त्या दोघांनी एकत्र काम न करण्याचं कारण आहे. यात ना कुठेही अहंकार आड येतो, ना हेवा ना इतर काही…
या २५ वर्षाच्या काळात, ना खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या कामाची पद्धत बदलली आहे ना किंग खान शाहरुखने…
अक्षय कुमार सकाळची लवकर उठून, लवकर दिवस सुरु करून काम करणं पसंत करतो. शाहरुख मात्र याच्या अगदी विरुद्ध! तो निशाचर आहे म्हणायलाही हरकत नाही. त्याला रात्री काम करणं अधिक आवडतं. हातात या अशा सूर्य-चंद्र असणाऱ्या कलाकारांनी एकत्र काम करणं म्हणजे दुर्मिळ योगच म्हणायला हवा.
शाहरुखनेच दिली होती माहिती
हे दोन्ही स्टार्स एकत्र काम करत नसल्याचं खरं कारण हेच असल्याची माहिती दस्तरखुद्द किंग खान यानेच आपल्या एका मुलाखतीत दिली होती. अक्षय सोबत काम करायला नक्कीच आवडेल अशी भूमिका मांडणारा शाहरुख, ते एकत्र काम करणार कसं हा प्रश्न पुढे करतो.
===
हे ही वाचा – लक्ष्मी ते राम सेतू : “बिझनेसमन” अक्षय कुमारची तुम्हाला माहीत नसलेली बाजू!
===
अक्षय जितक्या लवकर उठतो आणि कामाला सुरुवात करतो, तेवढ्या लवकर तो कधीच उठत नाही, असं शाहरुखचं म्हणणं आहे. बऱ्याचदा तर अक्षयची पॅकअपची वेळ आणि शाहरुखची काम सुरु करण्याची वेळ या दोन्ही वेळा अगदी जुळून येऊ शकतात. या दोघांच्या चाहत्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आहेच.
या दोन्ही कलाकारांच्या काम करण्याच्या वेळाच वेगवेगळ्या असल्यामुळे शाहरुखचं म्हणणं अगदीच योग्यही ठरतं.
शाहरुखचं मजेशीर उत्तर
दोन्ही कलाकार दर्जेदार आहेत दोघांचाही मोठा चाहता वर्ग आहे, हे तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे… त्यामुळे या दोघांनाही एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा असणं सुद्धा साहजिक आहे. तशीच इच्छा शाहरुखने व्यक्त केली होती.
अक्षय आणि शाहरुख यांनी एकत्र काम करण्याची वेळ कधी आलीच, तर काय होईल असा विचार तुम्ही करत असाल, तर जरा थांबा, कारण शाहरुखनेच हे काम तुमच्यासाठी करून ठेवलंय.
एकत्र काम करण्याचा अनुभव फारच भारी असेल, असं म्हणणाऱ्या शाहरुखचं गमतीशीर मत असं आहे, की “दोनो सेट पर ही नहीं मिलेंगे, वह आ रहा होगा और में जा रहा होऊंगा…”
अर्थात, सेटवर आमची भेट होणंच कठीण आहे. कारण त्याची येण्याची वेळ आणि माझी जाण्याची वेळ एक असेल… शाहरुखचं म्हणणं चूक नसलं, तरी या दोघांनी एकत्र काम करावं अशी त्यांच्या चाहत्यांची सुद्धा इच्छा असणारच! त्यामुळे, ‘भले तुम्ही सेटवरचे सूर्य-चंद्र बनून वावरा पण एका सिनेमात पडद्यावर तरी एकत्र दर्शन द्या’, असंच चाहते म्हणत असतील नाही का…
===
हे ही वाचा – हे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.