' उन्हाची काहिली घालवणारी कुल्फी सुद्धा थेट मोघलांच्या काळापासून अस्तित्वात आहे… – InMarathi

उन्हाची काहिली घालवणारी कुल्फी सुद्धा थेट मोघलांच्या काळापासून अस्तित्वात आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थंडी पावसाचा खेळ संपून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. स्वेटर कधीच कपाटात गेले, आता घराघरात फक्त AC सुरू असतो. फ्रीजमध्ये आपलापल्या आवडत्या सरबतच्या बाटल्या दिसू लागतील.

 

kokam-sarbt-inmarathi

 

वाढत्या उन्हाळ्यामुळे घर सुद्धा चांगलेच तापत आहे, फॅन AC सतत चालू असले तरी त्यांची  सवय लागणे हे घातकच आहे. उन्हाळा आला की मग घराघरात सरबतांच्या बाटल्या दिसू लागतात. पूर्वी लोक मे महिन्याच्या सुट्टीत कोकणात फिरायला गेल्यावर आवर्जून कोकम सरबताचा कॅन आणत असत.

उन्हातून आल्यावर लिंबू सरबत, आवळा सरबत, प्यायल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत होते, उन्हाने आलेला थकवा देखील निघून जातो. उन्हाळा आला की AC फ्रिज पेक्षा सर्वात जास्त धंदा होतो तो म्हणजे आईस्क्रीमचा, लहानांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत अनेकांची आवडीची गोष्ट म्हणजे आईस्क्रीम.

 त्यात मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना, शाळांना सुट्ट्या, त्यामुळे बच्चे कंपनीसाठी ती पर्वणीच, उन्हातान्हात खेळणे हे तर रोजचे रुटीन, मग अशा थकल्या भागल्यांना खुश करण्यासाठी यायचा तो म्हणजे कुल्फी वाला.

 

kulfi inmarathi

 

कुल्फीवाल्याची चाहूल ही त्याच्या कुल्फीवरच्या गाडीवर असलेल्या घंटेने यायची, तेव्हा कानात कॉर्ड नसल्याने, कोपऱ्यावर कुल्फीवाल्याने वाजवलेल्या घंटीचा आवाज थेट घरात यायचा.  उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीचे जेवण झाल्यावर लोक फेरफटका मारायला म्हणून जात असत, नाक्यावर मेवाड कुल्फीवाले त्यांची वाटच बघत बसलेले असायचे.

 

kulfi 1 inmarathi

 

‘आमच्या लहानपणी आमच्यकडे कुल्फी खाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे’, हा संवाद जवळजवळ प्रत्येक घरात आजोबा आजी आपल्या नातवांवर फेकत असतातच, जवळजवळ तीन पिढ्या या कुल्फीने पहिल्या आहेत, मग या कुल्फीचा नक्की जन्म तरी कसा झाला, चला तर मग थोडे इतिहासात डोकवूयात..

 

kulfi 2 inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – रॉयल लोकांची रॉयल बिर्याणी… जिची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल…!

कुल्फी म्हणजे एका काडीवर गोठवलेले आइस्क्रीम, दुकानातून कुल्फी घ्यायची एकीकडे चालताना मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यासोबत गप्पा मारता मारता खायची, एवढे साधे गणित आहे या कुल्फीचे. गप्पांच्या ओघात जसा चहा कधी संपतो कळत नाही तसे या कुल्फीचे.

सर्वाना आनंद देणारी अशी ही कुल्फी जिने आपल्या अनेक पिढ्या बघितल्या असतील, कुल्फीचा जन्म  १६व्या शतकाच्या आसपास लागला आहे. कुल्फीचा शोध लावला तो मोघलांनी, शाही जेवण झाल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी म्हणून काहीतरी थंड गोड पदार्थ हवा, म्हणून याचा शोध लागला.

 

mughals in india inmarathi

 

अगदी कमीत कमी सामग्रीमध्ये बनणारा हा पदार्थ अनेकांच्या पसंतीस पडला. दूध, बर्फ, सोबतीला केशर  बदाम यांचे मिश्रण एका धातूच्या शंकूमध्ये भरून ते बर्फात ठेवले जाई, विशेष म्हणजे हा बर्फ थेट हिमायलातून आणलेला असे , अशा पद्धतीने कुल्फी बनवणायची सुरवात त्याकाळात झाली.

कालांतराने त्यात अनेक बदल होत गेले, वीज आली मोठमोठाले फ्रिज आले, ज्यात कुल्फ्या वेगवेगळ्या चवीत तयार होऊ लागल्या. हातगाडीवर मिळणारी कुल्फी आता दुकानात मिळू लागली.

सध्या फेमस कुल्फी म्हणून प्रसिद्ध आहे ती म्हणजे मटका कुल्फी, मटका म्हणजे मातीचे भांड ज्यात मिश्रण भरून ते व्यवस्थित पॅक करून थंड केले जाते. ज्यांना काडी असलेली कुल्फी आवडत नाही त्यांना हा पर्याय नक्कीच आवडतो.

 

kulfi 3 inmarathi

हे ही वाचा – छोट्या हॉटेलमध्ये बनवण्यात आलेल्या या चविष्ट पदार्थाच्या जन्माची कथा, वाचा!

आज भारताच्या प्रत्येक शहरात त्या त्या शहराची कुल्फी फेमस आहे, शहराच्या एका भागात जर कुल्फी फेमस असेल तर लोक दुसऱ्या भागातून खास कुल्फी खाण्यासाठी येतात. कुल्फी फक्त आपल्याकडेच नाही तर आपले सख्खे शेजारी असेलल्या देशात सुद्धा आवडीने खालली जाते.

आज बिर्याणीवर ताव मारणारे आपण, स्वीट डिश म्हणून कुल्फीचा आस्वाद घेतोच, यासाठी आपण मुघलांचे आभार मानायलाच हवेत.

कुल्फी शब्द आला कुठून? असा अनेकांना प्रश्न पडला असेल, तर कुल्फी हा शब्द फारसी भाषेतून आला आहे तर काहींचे म्हणणे आहे तो अरेबिक भाषेतून आला आहे. शब्द कोणत्याही भाषेतून आलेला असो आज पदार्थ मात्र विविध भाषकांच्या पसंतीस पडला आहे.

आपल्याकडे आज जरी भाषावाद, सीमावाद, प्रांतवाद असले तरी आपले खाद्यपदार्थ मात्र हे वाद विसरायला लावतात हे नक्की,

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?