आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – ब्रम्हा चट्टे
===
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकतात, मग ते देशाबद्दलची अवहेलना असो किंवा सरकारी धोरणे असो, सध्या ते एका पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत.
या पुस्तकावरून त्यांच्यावर समाजमाध्यमातून चांगलीच टीका होत आहे. मध्यंतरी पत्रकार ब्रह्मा चट्टे यांनी आपल्या फेसबुक वर याबाबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती. वाचा ते काय म्हणतात…
गिरीश कुबेरांनी त्यांच्या Renaissance State : The Unwritten Story of the Making of Maharashtra पुस्तकात कोणताही पुरावा न देता थेट छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणार लिखाण केले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कुबेरांनी लिहिले आहे की, छत्रपती संभाजीराजे यांनी महाराणी सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा खून केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठा सैन्याने प्रजेवर जुलूम केले, अत्याचार केले.
छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्यामध्ये दूरदृष्टीचा अभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांची तुलना करुन दोघांचे व्यक्तिमत्त्व एकसारखेच असल्याचे मत मांडले आहे.
–
- छत्रपती शंभूराजेंच्या धारदार लेखणीतून…स्वराज्य आणि स्वधर्म निष्ठेची घवघवीत साक्ष!
- छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?
–
छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांना एकदाही भेटल्याचा पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यात गुरु-शिष्य संबंध जोडण्याचाही प्रकार केला आहे. या लेखनाचा योग्य प्रतिवाद इतिहास संशोधक करतीलच. पण काही निरीक्षणे मला या ठिकाणी तुम्हाला सांगावी वाटतात.
आपण केले संपादकीय लेखन माघारी घेत माफी मागण्याची नामुष्कीची नोंद ऐतिहासिक म्हणून गिरीश कुबेर यांच्या नावावर आहे. पत्रकारितेचे इतिहासामध्ये ‘संपादकीय माघारी घेणे’, हा इतिहास ज्या संपादकाच्या नावावर नोंदवला आहे तो संपादक इतिहासावर भाष्य करतोय. हे म्हणजे आरोग्य मंत्री हर्षवर्धनने कृषी कायद्यांवर पत्रकार परिषद घेतली. त्याचीच पुनरावृत्ती आहे.
गिरीश कुबेर हे “जातखुळे” आहेत हे काय पुन्हा एकदा नव्याने सांगायची गरज नाही. कारण “डीएसके”नी जो आर्थिक घोटाळा केला होता. त्या डीएसके “कुलकर्णी” यांची बाजू घेऊन संपादकीय पान खर्ची घालण्यासह लोकसत्तावाल्यांनी कहरच केला होता.
मधल्याकाळात बऱ्याच वेळा लोकमान्य लोकशक्तीकार हे #जातखूळे आहेत हे सिध्दच झालयं. महाराष्ट्र बँकेवर कार्यवाही केल्यानंतर या बँकेचे संचालक मराठे, देशपांडे, कुलकर्णी यांना वाचवण्यासाठी पानेच्या पाने खर्ची घातलेली पाहिली आहेत.
शेतकऱ्यांच्या संतापाला, मराठा, धनगर समाजाचा असंतोष हा ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यानेच होत असल्याचे निलाजरे प्रतिउत्तरही लोकमान्य लोकशक्तीकारांनी दिल्याचं वाचलयं. फक्त आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकून या भाषांतरकारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे लेखन करायचे ही समृद्ध परंपरा लोकसत्ताकारांची आहे. शिवछत्रपती, संभाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड करणारे लेखन उचलून धरणे, असे लेखन करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या पाठीशी तन – मन आणि धन वापरून उभे राहणे, माध्यमाचा गैरवापर करत लोकसत्ता ज्ञानसंस्कृती निधीच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद जोपासणाऱ्या प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचे, पर्यायी इतिहासाची मांडणी नाकारत ब्राह्मणी अधिमान्यता लादणे असे एक ना अनेक गुन्हे लोकसत्ताच्या माध्यमातून मागील २० वर्षात करण्यात आलेले आहेत.
कुमार केतकर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता गिरीश कुबेर यांच्यापर्यंत पोहचला आहे. जगात जे जे श्रेष्ठ तेथे आमच्या जातीचे किंवा आमच्याच वंशाचे ह्या विकृत मानसिकतेची शिकार लोकसत्ताकार झाले आहेत.
एक पत्रकार म्हणून गिरीश कुबेर यांचा जितका म्हणून निषेध करावा तितका कमीच आहे. इंग्रजी दैनिकांमध्ये छापून आलेला मजकूर मराठीत भाषांतर करून त्याला संपादकिय म्हणून शेखी मिरवणारे गिरीश कुबेर यांची ओळख एक विकृत संपादक म्हणून ही यापुढे होईल.
विकृत मानसिकतेने केलेलं लिखाण मागे घेऊन महाराष्ट्राची माफी मागून गिरीश कुबेर यांनी हा वाद मिटवायला हवा आहे. कारण माफी मागण्याचा सराव कुबेर यांना जास्त आहे, अन्यथा कुबेर यांना शिव-शंभू प्रेमींच्या रोषाला सामोरे लागणार आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.