पत्नीला वाचवू शकला नाही हा अधिकारी, पण आता लोकांच्या आरोग्यासाठी धडपडतोय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे लोक चांगलेच हायजेनिक झाले आहे, आजकाल लोक सतत हाथ धुवत असतात, कुठेही बाहेर गेले की हात सॅनिटाईझ केल्याशिवाय राहत नाहीत. घरी आल्यावर सुद्धा डायरेक्ट किचनमध्ये न जाता आधी हाथ पाय स्वछ करतात.
आपण भारतीय तसे पहिल्यापासून हायजिन न पाळणारेच, कारण रस्त्यावरील मिळणाऱ्या खाद्यपदार्थावर आपण चांगलाच ताव मारतो, तेव्हा स्वच्छतेबाबतचे विचार आपल्या मनाला शिवत देखील नाहीत. मात्र काही लोक याला अपवाद असतात, काही जणांना याचा त्रास होतो.
–
हे ही वाचा – CA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का? जाणून घ्या
–
हायजिनच्या बाबतीत म्हणायचे झाले तर लोक आजकाल फळभाज्या देखील घरी आल्यावर स्वच्छ धुवून वगरे ठेवतात. आज अनेकजण थेट शेतातला माल सुद्धा ग्राहकांपर्यंत पोहचवणायचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा ताजी भाजी मिळत आहे.
शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किमतीवरून काही दिवसांपूर्वी राजकारण चांगलेच तापले होते, शेतकऱ्यांनी या वाढीव किंमतीला चांगलाच विरोध केला. त्यांनतर पंतप्रधानांनी काही खतांच्या किंमती कमी केल्या.
आज आपला देश जरी कृषीप्रधान असला तरी ठिकठिकाणी पाण्याची समस्या आहे, त्यात रासायनिक खतांचा भडीमार, मातीची कमी होणारी क्षमता यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे फळ भाजीपाल्यांमधील पोषक तत्वे निघून जातात. फळे टिकवून ठेवण्यासाठी त्यावर अनेक फवारण्या केल्या जातात, यामुळे देखील फळातील सत्वे निघून जातात. आणि आपल्या पदरी केमिकल युक्त गोष्टी पडतात.
रसायनयुक्त असलेल्या गोष्टी आपल्या जेवणात आल्या तर आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. याबाबतची जनजागृती एक कृषिअधिकारी करत आहे. चला तर जाणून घेऊयात त्या अधिकाऱ्याबद्दल…
कोण आहेत पूर्णा शंकर बार्रचे?
पूर्णा शंकर बार्रचे मध्यप्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात कृषिअधिकारी म्हणून काम करत आहेत. उच्चशिक्षित असल्याने त्यांना कृषिविभागाने कृषीविस्तार अधिकारी म्हणून नेमले. सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक त्यांच्या पत्नीला कॅन्सर असल्याचे कळले.
पत्नीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले मात्र पत्नीचा जीव ते वाचू शकले नाहीत, पत्नीच्या निधनानंतर त्यांनी खचून न जाता उलट ते कामाला लागले.
पत्नीचा जीव वाचवता आला नाही, निदान इतरांचा जीव वाचवता यासाठी काहीतरी समाजउपयोगी काम करायचे ठरवले, ज्या क्षेत्रात ते आहे त्याच क्षेत्राच्या आधारावर त्यांनी जनजागृती करण्यास सुरवात केली.
नेमकी कोणती जनजागृती केली?
रासायनिक खतांच्या आणि बी बियांच्या भडिमाऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, जैविक आणि अस्सल देशी बी बियाणे कशी वापरावीत याचे ट्रेनिंग ते देत आहेत.
आज केवळ मध्यप्रदेश मध्ये ते वर्कशॉप घेत नाहीत तर ठिकठिकाणी भरणाऱ्या कृषिप्रदर्शनात जाऊन शेतकऱ्यांना ते जैविक बी बियाणे वापरण्यास सांगतात तसेच त्याची ट्रेनिंग सुद्धा देतात. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ सारख्या राज्यातून अनेक शेतकरी त्यांना वर्कशॉप घेण्यासाठी बोलवतात.
–
हे ही वाचा – शेती फायद्यात कधी आणि कशी येईल : समस्या मुळापासून सोडवणारा विचार
–
पूर्णा यांची ट्रेनिंग केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहिली नसून थेट आदिवासी पाड्यापर्यंत पोहचली आहे. आदिवासी पाड्यात जाऊन तिकडच्या आदिवासीनी लोकांना ते याचे ट्रेनिंग देतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या ट्रेनिंगची ते कोणतेही शुल्क आकारात नाहीत.
आज सेंद्रिय खते वापरून देशातील अनेक शेतकरी उत्तमरीत्या शेती करत आहे. जे शेतकरी पूर्वी हजारात कमवत होते ते आज लाखो रुपये कमवत आहेत.
आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातून समाजाला कसे उपयोगी पडता येईल, समाजाच्या बरोबरीने आपले क्षेत्र सुद्धा विकसित होईल, हे या अवालिया माणसाला अचूक कळले.
आज अनेकांना समाजउपयोगी काम करायची ईच्छा तर असते मात्र त्यांना मार्ग सापडतो, काहीजण मार्ग शोधण्यातच वेळ वाया घालवतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.