' स्वामी समर्थांवरील मालिका चंदाभोवतीच का फिरते? अतिरंजितपणा थांबवायला हवा! – InMarathi

स्वामी समर्थांवरील मालिका चंदाभोवतीच का फिरते? अतिरंजितपणा थांबवायला हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सचिन कृष्णा तळे

===

महाराष्ट्रात दत्त अवतारात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ह्यांचा फार मोठा भक्त परिवार आहे. फक्त अक्कलकोट नाही तर राज्याच्या तसेच देशाच्या अनेक ठिकाणी स्वामींची पुजा केली जाते. अनेक ठिकाणी त्यांचे व त्यांच्या शिष्यांचे मठ आपल्याला दिसून येतील. पुण्यातील शंकर महाराज मठ, मुंबई मधील दादर येथील स्वामी सुतांचे मठ, श्री तात महाराज, नाशिकचे मारेदादा अश्या अनेक शिष्यांनी स्वामी आशिर्वादाने सेवा केंद्र स्थापन केलीत.

स्वामींचं अस्तित्व आज ही त्यांच्या भक्तांना ते असल्याची जाणीव करून देतं. दत्त गुरूंचा हा स्वामी अवतार १८ व्या शतकात झाला.

 

swami samrtha

 

“मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गारच आपल्याला ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे आठवण करून देतात. आंध्र प्रदेश मधील कर्दळीवनात प्रकट झालेले स्वामी पंढरपूरच्या मंगळवेढा इथून अक्कलकोटला स्थानबद्ध झाले.

चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. याच अक्कलकोटातून त्यांनी त्यांच्या दैवी रूपाचे दर्शन देत मानवी दूःखांना दूर करत दत्त भक्तीचा झेंडा रोवला आणि सर्वांना आपलंस करून घेतले.

स्वामी या शब्दाचा अर्थ जर शाेधला तर ताे असा हाेताे ” स्वा” म्हणजे भस्म करणे स्वतः ला आत्मसमर्पण करणे आणि “मी ” म्हणजे मी पणा अहंकार ईर्ष्या. स्वःताच्या मी पणाला भस्म करून स्वतः समर्थ हाेणे हा हाेय. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हा मंत्र ख-या अर्थाने तारक मंत्र आहे.

 

swami samrtha inmarathi

 

सध्या कलर्स मराठी वर चालू असलेली “जय जय श्री स्वामी समर्थ” ही मालिका फार गाजत आहे. कराेनाच्या या महामारीत सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबलेले असताना या मालिकेचे चित्रीकरण चालू आहे. त्यामुळे यंदाच्या टाळेबंदीत कलर्स मराठीने या मालिकेचा प्रत्येक भाग हा दाेनदा प्रसारित करायचा ठरवला हाेता.

कमी वेळात लाेकप्रिय ठरलेली ही मालिका स्वामी भक्तांची श्रध्दाच म्हणावी लागेल. बाळू मामा या मालिकेनंतर आठ वाजता स्वामी समर्थ ही मालिका लागते म्हणजे दिवसातून काही तास हे भक्तीचे तास! आधी ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा त्यामुळे जे कामावरून घरी ८ ते ८.३० पर्यंत पाेहचायचे त्यांना हा कार्यक्रम पाहता येत हाेता.

पण जी कथा मालिकेत दाखवली जातीय ती कथा नक्कीच स्वामी चरित्रात आहे का? या प्रेक्षकांच्या प्रश्नांवर नक्कीच कलर्स मराठीने विचार केला असावा. कारण या मालिकेला वटवृक्ष स्वामी समर्थ संस्थाची पुर्णतः परवानगी आहे.

हे ही वाचा – आताच्या टुकार मालिका सोडा.. या १० मराठी सिरीयल आजही आवर्जून बघा!!!

swami samarath serial inmarathi

 

शिर्षकगीत फार सुंदर असून त्यात डिजीटल रूपाने मांडण्याचा छान प्रयोग कलर्स मराठीने केलाय. त्यात कालंदी नक्की अशी हाेती का ? आणि असलीच तर तिचा आरडाओरडा जरा जास्तच दाखवला जातोय जे वाढीव आहे हे सहज दिसतय. स्वामींचा दरबार.. त्यांच्या समोर चालणारं अखंड नामस्मरण.. भक्तांची रांग.. भक्तांचे प्रश्न व त्याचे निवारण.. स्वामींचा रागीटपणा..हे सर्व काही प्रेक्षक मीस करताेय असे वाटतंय, कारण पूर्ण मालिका ही चंदाच्या आसपास फिरवली आहे. ज्या घटना दाखवल्या जातायत त्या सर्व घटनेत चंदा व त्या पात्राचे घर आहेच.

महाराजांचा सुरवातीचा काळ, त्यात त्यांना भेटणारे नवनवीन मंडळी, लाेकांना ते दत्त असल्याची प्रचिती हे दिसून येत नाहीय. मालिका पाहताना प्रक्षेक म्हणा किंवा स्वामी भक्त त्या मालिकेत नक्की काय शाेधत असेल ह्यांचा बारीक जरा विचार केला तर हि मालिका छान चालेल.

ह्या मालिकेत ” नमामी शंकर श्री हरी शंकर शिव शंकर शंभाे ….हे गिरिजात्मज भवानी शंकर शिव शंकर शंभाे” ह्या स्वरात स्वामी रूपात आपल्याला अभिनेते अक्षय मुडावदकर दिसतात. आजवर आपण स्वामींना वयस्कर रूपात पाहिले असेल. स्वामींसारखीच अजानबाहू रूप असलेली व्यक्ती शाेधूनही सापडणार नाही. कधी चंचल ,कधी ध्यानस्थ, कधी मस्ती, कधी राैद्र तर कधी प्रेमळ आई. स्वामींची ही विविध रूपे मनाला भुरळ घालून जातात. पण ह्या मालिकेत दिसणारे स्वामी हे पस्तीशीच्या वयात दिसतायत. तारुण्यात स्वामींचे दर्शन घडतय.

स्वामींचे मूळरूप आणि अक्षयने साकारलेले स्वामी रूप ह्यात खुप तफावत आहे. स्वामी साकारण्याचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालाय ह्यात प्रश्नचिन्ह नाही. अनेक जणांनी साेशल मिडीयावर स्वामी भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी या मालिकेला खूप छान प्रतिसाद देखील दिला आहे.

 

swami samartha inmarathi

 

नाटकातून चित्रपटातून मालिकेतून आजवर स्वामींची अनेकांनी भूमिका साकारली. त्यात काही भूमिका या फार लाेकप्रिय ठरल्या, श्रध्दास्थानी राहिल्या. ज्या स्वामी भूमिका गाजल्या त्यात प्रेक्षकांना भारावून टाकणारी स्वामी भूमिका जर कुठली असली तर ती ” ताेची एक समर्थ ” ह्या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध नाट्य अभिनेते दाजी भाटवडेकर आहेत.

युट्युब वर ह्या चित्रपटचे सर्व भाग सहज पाहायला मिळताता. मी सुध्दा मिळेल तेव्हा दाजी भाटवडेकर ह्यांच्यातल्या स्वामींना पाहताे. त्यांचे वागणे बाेलणे, त्यांचे हावभाव जसे आपण ऐकले हाेते अगदी तसेच आहेत. दाजी भाटवडेकर हे मुळात त्याच वयात असल्याने त्यांना हि भूमिका खूप छान मांडता आली. चित्रपटात वेळेला बंधन असल्याने ते त्याच कालावधीमध्ये दाखवणे गरजेचे आहे त्यानुसार या चित्रपटामध्ये ते सर्व काही समावेश केला गेल आहे. स्वामीं प्रकट ते स्वामी समाधीपर्यंतचा सगळा काळ पाहताना अंगावर काटा उभा राहतो.

त्यानंतर जर स्वामी भूमिका गाजली असेल तर ती देऊळ बंद ह्या चित्रपटामध्ये माेहन जाेशी सरांनी साकारलेली. देऊळ बंद ही पुर्णतः काल्पनिक कथा आहे. त्यात दाखवलेल्या घटना ह्या लेखकांच्या शब्दातून स्वामी भक्तांना आवडेल अशी आहे. दिंडोरी प्रणित स्वामी संस्थानच्या मार्गदर्शनाखाली बनवलेला हा चित्रपट तुम्हाला स्वामी अस्तित्व आजही आहे त्याची प्रचिती घडवून देत.

 

swami deool band inmarathi

 

विज्ञान आणि श्रध्देचा खूप छान संवाद या चित्रपटामध्ये सादर केला आहे. देव कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी ही देव आहे आणि ताे आपल्या आसपास, आपल्या साेबत आहे. कलीयुगात देव ही व्याख्या नसून एक अदृश्य शक्ती आहे जी सदैव आपल्या पाठीशी आहे. वेगळ्या रूपात मांडल्यामुळे ह्या चित्रपटाने प्रेक्षकांना आपलंस केलं.

निर्भिडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता ह्या त्यांच्या गुणांमुळे स्वामी आपल्याला आपल्या घरातील एक मुळ पुरुष असल्याचे भासते.

नंतर कृपासिंधू स्वामी समर्थ महाराज ह्या मालिकेतील प्रफुल्ल सामंत ह्यांची भूमिका! प्रफुल्ल सामंत ह्यांची भूमिका आणि अक्षयची भूमिका ह्यात काहीच फरक जाणवत नाही. जर ह्या तिन्ही भूमिका आपण पाहिल्या असतील तर सध्या चर्चेत असणारी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अक्षय ह्यांची भूमिका पाहताना आपल्याला थाेडंस जड जाईल. पण जिथे भक्ती आहे तिथे स्वामी सर्व रूपात गाेड दिसतात.

 

swami inmarathi

हे ही वाचा – दत्तजन्म कथा – हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ह्या मालिकेनंतर संतांवर, महापुरुषांच्या जीवनप्रवासावर मध्यंतरी एकही मालिका आली नाही. झी मराठीच्या ह्या मालिकेच्या यशानंतर कलर्स मराठीचा हा विचार स्वामी भक्तांसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. कदाचित बाळू मामांच्या मालिकेला मिळालेल्या यशामुळेच कलर्स मराठीने विचार केला असावा. पुढे शेगावच्या गजानन महाराजांवर, धनकवडीच्या शंकर महाराजांवर ही मालिका यायला हरकत नाही.

स्वामींचे वाक्य “भिऊ नकाेस मी तुझ्या पाठीशी आहे ” हे ऐकताना, वाचताना फार मोठा आधार वाटताे . त्यामुळे स्वामी भूमिकेत काेण आहे हे महत्वाचे नाही. महत्वाचा आहे तो स्वामी संवाद. या निमित्ताने स्वामी आपल्याला राेज भेटतात हेच भाग्य आपले. फक्त मालिका तयार करणा-यांनी काेणत्याही प्रकारची अतिशयोक्ती न करता जे आहे त्याचा अभ्यास करून दाखवावे हिच इच्छा!

जय श्री स्वामी समर्थ

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?