शिक्षण सेक्युलर करण्यासाठी मदरसाना “सामान्य शाळा” करण्याचं मोठं पाऊल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
महाराष्ट्र आणि देशात सध्या गाजत असलेला मुद्दा म्हणजे १०,१२ च्या परीक्षा, गेल्या वर्षभरापासून परीक्षेबाबत बैठका सुरु आहेत. मात्र कोणतेच ठोस पाऊल सरकार कडून उचलली जात नाहीत. एकीकडे मुलांचे भविष्य देखील टांगणीला लागले आहे.
शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत विद्यार्थी घरूनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत, तरी सुद्धा शाळा पालकांनाकडून अव्वाच्यासवा फी आकारात आहेत त्यामुळे पालक सुद्धा हवालदिल झाले आहेत.
‘मुलांना उत्तम शिक्षण मिळावे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा’, यासाठी आसाम सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यावरून मागच्या वर्षी विरोधी पक्षाने बराच विरोध केला होता.
आसाममध्ये नुकत्याच निवडणूका होऊन सरकारदेखील स्थापन झाले. आसामच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र आता हेमंत बिस्वा यांच्याकडे देण्यात आली. सत्तेत येताच त्यांनी कामाला सुरवात देखील केली. एकूणच सध्या देशातील शिक्षणाचा आणि शाळांचा बोजवारा उडाला आहे.
–
हे ही वाचा – हिंदू-मुस्लिम ऐक्य साध्य करण्यासाठी
–
याच धर्तीवर त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, तो असा आहे की आसाममध्ये जितक्या मदरसा आहेत त्यांचे सर्वसामान्य शाळांमध्ये रूपांतर करण्यात यावे.
शिक्षणमंत्री रानोज पेगू आणि अर्थमंत्री अजंता नियोग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी एकूणच सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची तातडीने अंमलबाजवणी करण्यात यावी असे ही त्यांनी बैठकीत सांगितले.
या निर्णयाबाबत त्यांनी अधिक सविस्तर माहिती दिली की, हा निर्णय आधीच्या सरकाने घेतला असून, आम्ही अंमलबाजवणी करत आहोत, तसेच आसामध्ये एकूण ६१४ मदरसे आहेत. दरवर्षी सरकार तीन ते चार करोड रुपये या मदरसांवर खर्च करते.
मदरशांच्या बरोबरीने काही संस्कृत शाळांचे सुद्धा सामान्य शाळेत रूपांतर करण्यात येणार आहे.
ते पुढेच असेही म्हणाले, सरकारचे काम आहे सरकार चालवणे, धार्मिक शिक्षणासाठी करोडो रुपये सरकार खर्च करू शकत नाही. त्यामुळे येत्या ५ महिन्यात सर्व मदरशांचे सामान्य शाळेत रूपांतर केले जाईल.
एकीकडे हा निर्णय घेतलाच आहे याच शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक हवेतच, यासाठी तातडीने शिक्षक भरती करण्याची ऑर्डर देखील केली आहे.
या प्रस्तावावर विरोधक आधीच आक्रमक झाले होते. त्यात मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्या आल्या हा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा धार्मिक वातावरण ढवळू शकते. आधीच मुख्यमंत्र्यांनी बीफ वर बंदी घातली आहे. त्यामुळे मुस्लिम समाज पुन्हा एकदा दुखावला जाण्याची शक्यता आहे.
–
हे ही वाचा – मदरसात मुस्लिम मुलावर मौलवीने जे केलं तेच तो आज इतर बालकांवर करतोय…
–
आज उत्तरप्रदेश सारख्या राज्यात मदरशांमध्ये अनेक विचित्र प्रकार घडून येताना दिसून येतात. मुलांच्या लैंगिक शोषणापासून ते अगदी एका डॉक्टरने थेट आपले क्लीनिक उघडण्यापर्यंत असे प्रकार घडून येत आहेत.
आज मुलं जरी घरातून शिकत असली तरी प्रत्येक सरकराने मुलांचा सर्वांगीण विकास आणि त्याच बरोबरीने उत्तम शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.