' व्हॅसलिन म्हणजे मऊ त्वचा : याच व्हॅसलिनचे ‘इतर’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का? – InMarathi

व्हॅसलिन म्हणजे मऊ त्वचा : याच व्हॅसलिनचे ‘इतर’ उपयोग तुम्हाला माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिवाळ्याच्या सुरुवातीला पडणारी गुलाबी थंडी थोडी वाढू लागली आणि काहीशी बोचरी होऊ लागली, की काही गोष्टी अगदी साहजिकपणे वापरात येऊ लागतात. यात एक गोष्ट अगदी हमखास असते, ती म्हणजे व्हॅसलिन!

ओठ फुटू नयेत यासाठी, त्वचा उत्तम राहावी म्हणून व्हॅसलिनचा वापर केला जातो. थंडीचा त्रास झाल्याने फुटलेल्या त्वचेची काळजी घेणं, टाचांच्या जखमांवरील उपचार यासाठी सुद्धा अगदी सर्रासपणे व्हॅसलिनचा वापर केला जातो.

काही मंडळी केवळ थंडीच्या दिवसातच नाही, तर अगदी नियमितपणे त्वचेची काळजी घेण्यासाठी व्हॅसलिनचा वापर करतात. त्वचा कायम टवटवीत आणि तजेलदार राहावी हा त्यामागचा उद्देश असतो.

 

vaseline aka petroleum jelly inmarathi

 

त्वचेची अशी उत्तम काळजी घेणारं हे व्हॅसलिन आरोग्याव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींमध्ये फारच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त  शकतं हे तुम्हाला माहित आहे का? होय, या व्हॅसलिनचे अनेक भन्नाट फायदे आहेत.

चला तर मग जाणून घेऊया, हे व्हॅसलिन रोजच्या जीवनात कुठे आणि कसं उपयोगी पडतं…

पुरुषांसाठी सुद्धा फायद्याचं

साहसाला व्हॅसलिन म्हटलं, की महिलांच्या कामी येणारी वस्तू अशाच नजरेने पाहिलं जातं. व्हॅसलिनचा वापर करणं अनेक पुरुष टाळतात. त्वचा मॉइश्चराइझ करण्याच्या गोष्टी, म्हणजे स्त्रियांचं काम असा विचार अनेक पुरुष मंडळी करत असतात. पण व्हॅसलिनचे हे उपयोग तुमच्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतील बरं का मंडळी…

 रेझरची काळजी घेणं

घरच्या घरी दाढी करण्यासाठी ज्या रेझरचा वापर करता, त्याची निगा राखण्यासाठी व्हॅसलिन फारच उपयोगी आहे. रेझरच्या ब्लेडवर व्हॅसलिनचा थर लावून ठेवल्यास ब्लेडला गंज लागणार नाही. शिवाय त्याच्यावरील चकाकी आणि ब्लेडचा दर्जा चांगला राहण्यास मदत होईल.

 

razor inmarathi

===

हे ही वाचा – छोट्या समस्या सोडवण्यासाठी रोजच्या वापरातील या गोष्टींचे ‘असेही’ उपयोग होऊ शकतात!

===

हेअर डाय करताना

केस पांढरे पडू लागले, की हेअर डायचा वापर अनेकदा केला जातो. या हेअर डायमुळे कपाळावर डाग पडण्याची शक्यता असतेच. या त्रासापासून वाचायचं असेल, तर केसांना डाय लावण्याआधी कपाळावर केसांजवळ व्हॅसलिनचा एक थर चढवा.

याशिवाय चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग काढण्यासाठी कुठलंही केमिकल वापरण्याआधी व्हॅसलिनचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावरील डाग निघणं सोपं जाईल.

 

black heads inmarathi

 

शूजची चकाकी वाढवा

तुमचे चामड्याचे शूज पोलिश करताना व्हॅसलिनचा वापर केलात, तर बुटांची चकाकी वाढवणं शक्य होईल. पोलिश झालेल्या बुटांवर व्हॅसलिनचा पातळ थर दिल्यास बूट अधिक चकाकू लागतील.

 

shoes inmarathi

 

काय तर मग पुरुष मंडळी, आता वापरणार ना व्हॅसलिन तुम्हीसुद्धा…

थांबा, अजून या व्हॅसलिनचे उपयोग संपले नाहीत. बरंच काही बाकी आहे. चला तर मग पुढे बघुयात, व्हॅसलिनचे इतर फायदे…

महिलांनो असाही वापर करून पहा

व्हॅसलिनचा वापर करून त्वचेची काळजी घेता येते, हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच असतं. पण बरं महिला मंडळ, याचे आणखीही काही फायदे आहेत, जे तुम्ही करून बघायलाच हवेत.

केसांची निगा राखा

केसांना ‘स्प्लिट एंड्स’पासून वाचवण्यासाठी व्हॅसलिनचा वापर केला जाऊ शकतो.

 

split ends inmarathi

 

नेल पॉलिश 

नेल पॉलिश करून नखं सुशोभित करण्याची हौस अनेक मुलींना असते. अगदी प्रत्येक ड्रेसला मॅचिंग असं नेलपेंट लावण्यापासून ते वेगवेगळ्या नखांना वेगवेगळ्या शेड्स लावून फॅशन करण्यापर्यंत अनेक गोष्टी मुली करत असतात.

नेल पॉलिश लावत असताना, व्हॅसलिनचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. नखाच्या आजूबाजूला एक पातळसा व्हॅसलिनचा थर दिला, तर नखांच्या बाजूला कुठेही नेलपेंट लागणार नाही.

 

nail polish inmarathi

 

याशिवाय नेल पॉलिशच्या बाटलीवर झाकणाच्या आतल्या बाजूने थोडंसं व्हॅसलिन लावणं सुद्धा फायद्याचं आहे. यामुळे नेलपॉलिशच्या चिकटपणामुळे झाकण चिकटणार नाही.

कानात डूल घालताना

कानात डूल घालताना दुखत असेल, तर कानाच्या पाळीवर आणि डुलाच्या मागच्या भागावर थोडंसं व्हॅसलिन लावा. हे कानातील डूल सहजपणे घालण्यास मदत होईल आणि दुखणारही नाही.

 

ear ring inmarathi

 

मेकअप काढणं सोपं होईल

मेकअप काढताना त्वचा आणि डोळ्यांना कुठलाही अपाय होऊ नये असं वाटत असेल, तर व्हॅसलिनचा वापर करून मेकअप काढण्याचा पर्याय उत्तम!

काजळ, आय लायनर सारख्या गोष्टी व्हॅसलिनच्या वापराने सहज काढता येऊ शकतात. व्हॅसलिनचा वापर करून हलक्या हाताने या गोष्टी काढल्या जाऊ शकतात.

 

make up removal inmarathi

===

हे ही वाचा – कीटकनाशकापासून टॉयलेट स्वच्छतेपर्यंत असे कोका कोलाचे १३ उपयोग आजमावून बघा

===

घरगुती वापर

या काही फायद्यांव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसाठी व्हॅसलिन वापरता येऊ शकतं. व्हॅसलिनचे हे वापर अगदी घरगुती गोष्टींसाठी केले जाऊ शकतात. घरातल्या काही छोट्यामोठ्या समस्यांवरचा उत्तम उपाय म्हणजे व्हॅसलिन…!! चला तर मग, घरगुती उपाय सुद्धा जाऊन घेऊयात.

डाग काढणे

कपड्यांवर पडलेल्या मेकअपच्या डागांपासून, ते भिंत, फर्निचर यावर पडलेले डाग काढण्याची क्षमता व्हॅसलिनमध्ये आहे. लहान मुलांनी क्रेयॉनसारख्या रंगांनी खराब केलेली भिंत सुद्धा पुन्हा एकदा नव्यासारखी स्वच्छ करता येऊ शकते.

 

stains on walls inmarathi

 

 गोंद सुखू नये म्हणून 

नेलपॉलिशच्या बाटलीप्रमाणेच, गोंदाच्या बाटलीला व्हॅसलिन लावणं फायदेशीर ठरतं. यामुळे सुखलेली गोंदामुळे झाकण चिकटण्याचा धोका सुद्धा दूर होईल आणि गोंद सुखण्यापासून सुद्धा दूर राहील.

 

glue inmarathi

 

गंजण्याचा धोका कमी

विविध घरगुती हत्यारं, घरातील छोटीमोठी कामं करण्यासाठी उपयोगी ठरणारी टूल्स घरात अनेकदा असतात. पक्कड, पान्हे, स्क्रू ड्रायव्हर अशा या साधनांचा वापर नेहमी होत नाही. नेहमी वापरावी लागत नसल्याने त्यांना गंज लागण्याचा धोका सुद्धा सामान्य आहे.

 

tools inmarathi

 

अशावेळी या हत्यारांवर व्हॅसलिनचा मुलामा देऊन ठेवणं हा सर्वोत्तम उपाय ठरतो. पाणी आणि हवेतील ऑक्सिजनशी थेट संपर्क न आल्याने, ही टूल्स गंजण्यापासून सुरक्षित राहतील.

वंगण म्हणून उपयुक्त

किरकिर करणारे दरवाजे, कड्याकोयंडे, बिजागऱ्या या सगळ्या गोष्टींचा त्रास नेहमीच होत असतो. अशावेळी त्याला वंगणाची गरज असते.

 

hinges inmarathi

 

दरवाजे, खिडक्या, शेल्फ यासगळ्यासाठी एक उत्तम वंगण अर्थातच ल्युब्रिकंट म्हणून व्हॅसलिन काम करू शकतं.

===

हे ही वाचा – केळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?