आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘न भुतो न भविष्यति’ अशा परिस्थितीचा सामना गेल्या वर्षापासून जगभरातील लोकं करत आहेत. लॉकडाऊन, क्वारंन्टाइन, अॅन्टिजन टेस्ट हे शब्द आता सरावाचे झाले असले तरी गेल्या वर्षी मार्च महिन्यात मात्र दररोज नवी संकंट समोर उभी रहात होती.
मागील वर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची हाक दिली आणि भारत घराच्या चार भिंतीत कैद झाला. यापुर्वी कधीही न मिळालेली अशी सक्तीची विश्रांती प्रत्येक कुटुंबाने आपआपल्या परिने घालवली. काहींना कुटुंबियांसोबतचा हा वेळ म्हणजे पर्वणी वाटली तर काहींना हा एकांत नकोसा वाटला.
मात्र दाम्पत्यांसाठी हा काळ मात्र सुखाचा ठरला. काम, नोकरी, जबाबदा-या यांत गुंतलेल्या पतीपत्नींना हवाहवासा असलेला निवांत वेळ लॉकडाऊनने दिला. अनेका दाम्पत्यांनी याच काळात कुटुंब नियोजनाचे बेत आखले आणि सक्तीच्या या विश्रांतीत घराघरात बाळांतपण साजरे झाले.
तुमच्याही आसपास, कुटुंबात अशी अनेक तान्हुल्यांचे जन्म या काळात झाले असतील ना?
–
हे ही वाचा – गर्भवती महिलांनी कोरोना संकटात “ही” काळजी घेणं त्यांच्यासह बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे
–
लॉकडाऊनच्या काळातील गरोदरपण आणि जन्म हा केवळ चर्चेचाच नव्हे तर विनोदी मीम्सचाही विषय ठरला. “मिळालेल्या वेळाचा सदुपयोग”, किंवा “यानंतर प्रसुतीसाठी वेगळी रजा घ्यायची गरज नाही” असं म्हणत अनेकांनी हा निर्णय घेतला असला तरी खरी परिस्थिती मात्र काही औरच आहे.
तुमच्या माहितीत अशी काही कुटुंब असतील ज्यांनी या काळात मुलांना जन्म देण्याास पसंती दिली असेल, मात्र प्रत्यक्षात जगभरात कोरोनाच्या काळात प्रसुती नाकारणा-या किंवा जाणीवपुर्वक लांबणीवर टाकणा-यांची संख्या वाढल्याचे तज्ञ सांगतात.
एवढंच नव्हे तर या संकटकाळात प्रसुती होऊ नये याची काळजी घेतानाच भविष्यात प्रसुतीची तरतुद करण्यासाठीही अनेक जोडप्यांनी या काळाचा वापर केला आहे. या काळात एग्ज फ्रीझिंग करणा-यांच्या जगभरातील आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे.
चक्रावलात ना? तुम्हाला वाटेल की ही काय भानगड आहे? भविष्यातील प्रसुती वर्तमानात ‘मॅनेज’ करण्यासाठी नेमकं या तरुणींनी काय केलं?
जाणून घ्या एग्ज फ्रीझिंग बद्दल…
एग्स फ्रीझिंगच्या प्रक्रियेमध्ये, निरोगी एग्स स्त्रियांच्या अंडाशयातून काढून प्रयोगशाळेत साठवली जातात. वैद्यकीय गोठवण्याला क्रायोप्रिझर्वेशन असे म्हणतात. एग्स फ्रिज झाल्यानंतर, जेव्हा एखाद्या स्त्रीला आई बनण्याची इच्छा असते, तेव्हा ती तिच्या निरोगी एग्ससह गर्भ धारणा करू शकते.
विज्ञानाच्या प्रगतीने ही किमया साध्य केली आहे. इतकेच नव्हे तर आजपर्यंत अनेक महिलांनी या प्रक्रियेचा मार्ग अवलंबला आहे. यामध्ये प्रामुख्याने परदेशी महिलांचा समावेश असला तरी काही भारतीय सेलिब्रिटींनीही या प्रक्रियेला पसंती दिली आहे.
या प्रक्रियेत सहभागी होणा-या दाम्पत्यांना प्रक्रियेची माहिती देण्यात येते, त्यानंतर काही कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतर महिलेच्या चाचण्या केल्या जात परिक्षण होते, महिलेच्या अंडाशयातील एग्स हे साठवण्यासाठी योग्य आहेत की नाही? याची पाहणी झाल्यानंतर प्रक्रिया सुरु होते.
प्रक्रिया ही गुंतागुंतीची नसून महिलांना यात फारशा वेदनाही होत नसल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात.
एग्स लिक्विड नायट्रोजनचे फ्रिझरमध्ये १९६ डिग्री तापमानाला अनेक वर्ष गोठवता येऊ शकतो. लिक्विड नायट्रोजनचे कुठलेही दुष्परिणाम एग्सवर होत नाही. त्यामुळे जास्तवेळ एग्स गोठलेले राहू शकतात. गोठवल्यानंतर अनेक वर्षांनी एग्स पुन्हा ॲक्टिव्ह करता येतात. याही प्रक्रियेचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत, बाळ अगदी सुदृढ जन्माला येऊ शकतं.
कोरोनाच्या काळात पसंती वाढली
मागील अनेक वर्षांपासून या पद्धतीचा वापर केला जात आहे. मात्र सेलिब्रिटी किंवा ठराविक स्तरातील महिला यांच्याकडून ही पद्धत वापरली जात होती. पण कोरोना काळात अनेक सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनीही या पद्धतीचा वापर केल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दाम्पत्यांना एकमेकांसह अधिक वेळ मिळाला. अशावेळी शारिरीक संबंधांची शक्यता अधिक असून त्यामुळे गरोदरपणाच्या शक्यतेतही वाढ झाली. मात्र जगभरातील अनेक दाम्पत्यांनी या काळात मुलं होणे टाळले.
गेल्यावर्षापासून जगाला कोरोनाचा विळखा आहे. एकामागून एक येणा-या कोरोनाच्या लाटांचा शेवट अद्यापही झालेला नाही. सध्या सर्वच देशात लसीकरण मोहिम सुरु झाली असली तरी बारतासारख्या अनेक देशांमध्ये तरुणांना लसीचे दोन्ही डोस मिळालेले नाहीत.
शारिरीक तक्रारी, कोरोनाचा वाढता धोका, महागडे आणि वेदनादायी उपचार, समाजातील वाढणारी नकारात्मकता अशा कठीण परिस्थितीत दाम्पत्यांना स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं कठीण वाटते. अशावेळी एका नव्या जीवाची जबाबदारी घेणे अनेकांना मान्य नाही.
शिवाय कोरोना संक्रमणात प्रसुती स्विकारणे म्हणजे महिलेच्या जीवाशी खेळ. अशावेळी नऊ महिने तिची काळजी घेणे, कोरोनापासून तिचा बचाव करणे, वेळोवेळी कराव्या लागणा-या चाचण्या, अशा कठीण काळात कुटुंबातील इतर सदस्यांशी असलेला दुरावा , त्यामुळे मदतीला मिळणारा विलंब अशा अनेक कारणांमुळे प्रसुती टाळण्याचा विचार दाम्पत्यांमध्ये जोर धरत आहे.
नॅशनल एग्ज फ्रीझिंग क्लिनीकतर्फे देशभरात अनेक रुग्णालयात ही प्रक्रिया केली जाते. त्यांच्यातर्फे दिल्या जाणा-या अनेक मुलाखतीत त्यांनी कोरोना संक्रमणाच्या काळात या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले आहे.
कोरोनाकाळात सातत्याने होणा-या शारिरीक संबंधांमुळे प्रसुतीचा धोका आहेच, मात्र या काळात स्त्रियांमध्ये अनेक हार्मोनल बदलही घडत आहेत. अशावेळी २५ ते ४० वयोगटातील महिलांच्या प्रजनन क्षमतेतही वाढत होत आहे.
कोरोनामुळे अनेेकांचे विवाह रखडले तर अनेकांनी जाणीवपुर्वक कौटुंबिक बाबी पुढे ढकलल्या आहेत असे असले तरी पतीपत्नीच्या वयाचे घड्याळ धावत असल्याने योग्य वयातील प्रजनन क्षमतेचा वापर भविष्यात व्हावा यासाठी या प्रक्रियेला प्राधान्य दिले जात आहे.
एग्स फ्रीझिंगमधील धोके
वरकरणी सोप्या वाटणा-या या प्रक्रियेत महिलेच्या शरिरात मोठा बदल होतो. थकवा, मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी, स्तन दुखणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. क्वचित केसेसमध्ये रक्ताच्या गाठी, पोट दुखी आणि उलट्या होतात मात्र याचं प्रमाण अत्यल्प असतं.
फ्रिज केलेला एग्स जाऊन फलित होतील आणि गर्भधारणा होईल याची काहीही खात्री देता येत नाही. ही प्रक्रिया पार पाडताना भविष्यात आपण आई होऊ शकतो ही खात्री मनाची होते आणि पुढे गर्भधारणा यशस्वी झाली नाही तर त्याचा मानसिक धक्का बसण्याची शक्यता असते.
वयाचे बंधन
तज्ञांच्या मतानुसार या प्रक्रियेत वय ही सर्वाधिक महत्वाची बाब आहे. २० व्या वर्षाच्या सुरूवातीला एग्स फ्रिजिंग केल्यास चांगल्या दर्जाचे एग्स मिळतात. पण वाढत्या वयात एग्स खराब होण्याचा धोका असू शकतो. म्हणून २५ ते ३० वयात एग्स फ्रिज करण्याचा सल्ला डॉक्टरांतर्फे दिला जातो.
तंत्रज्ञानाने मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडवला असला तरी कोणतीही साधनं, नवी प्रक्रिया वापरताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. प्रसुती हा महिलाच्या आयुष्यातील अनमोल क्षण असला तरी तो काळजीपुर्वक हाताळला जावा.
कोणताही निर्णय घेण्यापुर्वी तज्ञांशी सखोल चर्चा केली जावी. म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हीही तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकता.
–
हे ही वाचा – निरोगी राहण्यासाठी जर रोज व्हिटॅमिनच्या गोळ्या खात असाल तर थांबा, आधी ‘हे’ वाचा
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.