आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कुस्ती या खेळाचं एकच उद्दिष्ट असत ते म्हणजे प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवणे. केवळ काही मिनिटांच्या या खेळात आपली सर्व शक्ती आणि खेळाच्या युक्त्या स्पर्धक पणाला लावतात. यामागे असते ती म्हणजे त्यांची इतक्या वर्षांची मेहनत, चिकाटी आणि संयम.
आपल्याकडे म्हणतात की, ‘खेळाडूंचं आयुष्य काही वर्षापुरते असते’, नंतर कुठे तरी सरकारी नोकरी पदरात पडते आणि त्यामुळे खेळ मागेच पडला जातो. दंगल सारख्या सिनेमात आपण पहिले असेल एका कुस्तीवीराला केवळ पैशाच्या अभावी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता आले नाही.
कुठल्या ही खेळाडूच खेळातील त्याच करियर घडायला अनेक वर्ष लागतात मात्र एका चुकीमुळे पूर्ण करियर बरबाद होते. आपल्याकडे प्रत्येक खेळामध्ये असे खेळाडू आहेत ज्यांचे करियर त्यांनी केलेल्या चुकांमुळे उध्वस्त झाले.
सध्या असच एक चर्चेत आलेलं नाव म्हणजे सुशील कुमार, देशाला अनेक पदके मिळवून देणारा हा खेळाडू चक्क एका खुनाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या कुस्तीवीरचा प्रवास….
–
हे ही वाचा – ‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन
–
कोण आहे सुशील कुमार :
हरियाणाच्या अस्सल कुस्तीच्या मातीत, बाप्रोला या गावात सुशील कुमारचा जन्म झाला, आपल्या कोल्हापूर मध्ये जसे घराघरात कुस्तीवीर तयार होतात तसेच या हरियाणाच्या जाटाने वयाच्या चौदाव्या वर्षांपासून कुस्तीला सुरवात केली.
कुस्तीसाठी लागणारे पोषक वातावरण असे घरात नव्हतेच, कारण त्याचे वडील MTNL मध्ये ड्राईव्हर होते तर आई गृहिणी होती. त्यामुळे घरची परिस्थिती तशी बेताचीच पण अशा परिस्थितीमध्ये हार न मानता आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कुस्तीच्या मातीत आपले पाउल टाकले.
सुशीलचा भाऊ पैलवान असल्याने त्याला कुस्तीची प्रेरणा त्याच्याकडूनच मिळाली आणि १४ वर्षी छत्रसाल स्टेडियमवर त्याने कुस्तीचा श्रीगणेश केला.
मोठे कोचिंग, महागडे डाएट यासारख्या गोष्टींमधून अस्सल मातीतले कलाकार तयार होतच नाहीत त्यासाठी लागते ती मेहनत, परिस्थितीची जाणीव आणि एकच स्वप्न ते म्हणजे देशासाठी खेळायाचे, सुशीलने सुद्धा सामान्य प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने फ्री स्टाईल कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवले.
सुशील कुमारचे यश:
२००० सालापासून त्यांचे यशाची खरी फळे चाखायला सुरवात केली. २००० साली जुनियर गटातच त्याने गोल्ड मेडल मिळवले, पुढे अशीच यशाची घोडदौड सुरु राहिली.
एशियन गेम्स असो किंवा ऑलिम्पिक असो सुशीलने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मेडल्स मिळवली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत २०१४ साली सिल्वर मेडल जिंकून भारतातसाठी दोन स्वतंत्र पदके जिंकून दिली.
२०१४ सालच्या स्कॉटलंड ऑलम्पिक मध्ये ७४ किलो गटातील कमर अब्बास ला त्याने हरवून गोल्ड मेडल जिंकले होते.
पुरस्कार :
भारतचे नाव जगात पोचवणाऱ्या या खेळाडूला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे, अगदी अर्जुन पुरस्कारापासून ते महाराष्ट्र सरकार, हरियाणा सरकार पर्यंत, विविध पुरस्कार त्याला देण्यात आले.
सद्यस्थितीमध्ये भारत सरकारने रेल्वेमध्ये त्याला नोकरी दिली होती आणि त्यामुळे साहजिकच खेळणं देखील त्याने थांबवले होते.
अटक का केली?
ज्या स्टेडियमवर त्याने कुस्तीचे बाळकडू प्यायले होते तेच स्टेडियम त्याच्यासाठी घातक ठरले. दोन गटात मालमत्तेवरून झालेल्या भांडणात एका कुस्तीवीरचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत जे कुस्तीवीर होते ते देखील जखमी झाले. त्या मारामरती सुशील देखील सहभागी होता.
पोलिसांनी एफआयआर सुशील आणि अन्य आरोपींच्या विरोधात दाखल केली होती, तसेच या भांडणात गोळीबार देखील झाला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सुशील कुमार काही दिवस फरार देखील होता मात्र त्याला अटक करण्यात यश आले.
सुशीलच काय म्हणणं आहे?
सुशीलने त्याच्यावरील आरोप फेटाळले आहेत त्याचे असे म्हणणे आहे की, ‘या वादात आपल्याला उगाच ओढलेले आहे आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही’.
–
हे ही वाचा – ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू
–
इतक्या वर्षांची कठोर मेहनत, अनेक गोष्टींचा त्याग, एक चुकीमुळे खेळाडूला आयुष्यातून उध्वस्त करतो. पैशाच्या मोहापायी फ़िक्सिन्ग नामक कीड आज खेळाला लागली आहे. त्यामुळे खेळाचा खऱ्या अर्थाने खेळ खंडोबा झाला आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.