Site icon InMarathi

समुद्रमंथनातून प्राप्त झालेला अमृतकलश ‘या’ मंदिरात असल्याचा दावा…!!

amrut kalash candi temple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देव – दानवांच्या युद्धानंतर समुद्रमंथन झाल्याची गोष्ट आपण ऐकली असेलच. एकीकडे देव, एकीकडे दानव, मधे पाणी घुसळण्यासाठी मंदार पर्वत आणि दोरखंडाच्या जागी वासुकी नाग…

समुद्रमंथन झालं आणि अनेक मौल्यवान वस्तू, रत्न, प्राणी आणि स्वतः देवी लक्ष्मी त्यातून पुन्हा प्रगट झाल्या. याशिवाय त्या समुद्र मंथनातून एक अशी वस्तू गवसणार होती जी प्राशन करणाऱ्याला अमरत्व प्रदान होईल. ती वस्तू म्हणजेच अमृत.

अमृत मिळताच देव आणि दानवांत पुन्हा भांडण सुरु झालं, चढाओढ सुरु झाली. कोण अमृत प्राशन करेल यावरून पुन्हा युद्ध व्हायची शक्यता निर्माण झाली. त्याचवेळी भगवान श्री विष्णूने, एका सुंदर, मोहक आणि मादक स्त्रीचं रूप धारण केलं. ज्याला आपण विष्णूचं ‘मोहिनी रूप’ म्हणतो.

 

===

हे ही वाचा – समुद्रमंथनात वापरला गेलेला मंदारचाल पर्वत सापडला गुजरातजवळील समुद्रात!

===

याच मोहिनीने दानावांकडून तो अमृताचा घट काढून घेऊन देवांकडे सुपूर्द केला. ते अमृत देवांनी प्राशन केलं आणि उरलेलं अमृत लपवून ठेवण्यात आलं.

हेच उरलेलं अमृत इंडोनेशियामध्ये सापडल्याचा दावा तिथल्या लोकांनी केला आहे.

चला जाणून घेऊया इंडोनेशियात सापडलेल्या अमृताच्या घड्याची गोष्ट

तेरा ते सोळाव्या शतकात, म्हणजेच इंडोनेशियात इस्लाम बाळावण्याआधीच्या काळातील, कंडी सुकूह हे शेवटचं हिंदू मंदिर. त्यानंतर इंडोनेशियात हिंदू मंदिरांचं निर्माण झालं नाही.

लावू पर्वतावरील कंडी सुकूह या शिव मंदिराची निर्मिती १४३७ इसवीसन पूर्वीची आहे. ईस्लामी आक्रमणात हे मंदिर उद्धवस्त करण्यात आलं होतं. १८१५ साली जेव्हा जवाचे राजा थॉमस राफ्लेस यांचा इथे दौरा झाला, तेव्हा पिरॅमिड स्वरूपी सुंदर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे आदेश त्यांनी दिले आणि या मंदिराचे पुनर्निर्माण केले गेले.

 

 

२०१६ साली जेव्हा इंडोनेशियन पुरातत्व विभागाने या मंदिराचा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्यांना तिथे हिंदू संस्कृती दर्शवणारी अनेक चित्र, कोरीव कलाकृती, मूर्ती इत्यादी मिळाल्या. तिथेच त्यांना एक अतिशय सुंदर आणि पारदर्शक स्फटिकापासून बनवलेलं शिवलिंग सुद्धा मिळालं.

त्या शिवलिंगाचे निर्माण एका तांब्याच्या कलशावर केले गेले आहे आणि त्या कलशात कुठला तरी पारदर्शक द्रव पदार्थ असल्याचं दिसून येत होतं.

हजारो वर्षांपासून ते द्रव्य जसंच्या तसं असलेलं पाहून संशोधक आणि इतिहासकार विचारात पडले. विज्ञानासाठी ही गोष्ट अचंबित करणारी होती.

कोणत्याही बाटलीत किंवा भांड्यात आपण पाणी किंवा कोणताही द्रव भरून ठेवला, की एक तर तो आटतो किंवा त्याचं स्वरूप बदलतं. पण या पाण्याला यापैकी काहीच झालेलं नव्हतं.

 

===

हे ही वाचा – या मंदिराचे अप्रतिम सौंदर्य आणि वास्तुशास्त्र पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल!

===

तिथल्या स्थानिकांचं म्हणणं असं आहे, की त्या मंदिरात, देव दानव युद्धाच्या काळात मिळालेला अमृत कलश असल्याची माहिती त्यांना पूर्वजांकडून मिळाली आहे. पण क्रूर इस्लामी शासकांनी, तो कुणालाही सापडू नये म्हणून या मंदिरात ठेवला होता.

सुरक्षितपणे हा कलश लपवण्यात आला होता असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. स्थानिकांनी त्या कलशात अमृत आहे असा अंदाज व्यक्त केला. तो कलश मिळालेल्या जागेजवळील भिंतीवर समुद्र मंथन आणि महाभारतातील आदिपर्वाच्या कथा कोरलेल्या असल्याचं स्पष्ट दिसून येतं. त्या कोरीव कलाकृतीतील कथेनुसार अमृताचा कलश देवांनी स्वतः इथे स्थापन केल्याचं इथली माणसं सांगतात.

 

 

पुढे पुरातत्व विभागातील टीमने त्या कालाशाचा अभ्यास केला.  त्यातील कार्बन डेटिंगनुसार त्या कलशाला १२ व्या शतकात बनवले गेले असून, आक्रमकांच्या धोक्यामुळे लपवून ठेवण्यात आल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

कलश अशा पद्धतीने बंद करण्यात आला होता, की कोणीही त्याला सहजपणे उघडू शकणार नव्हते. या कलशाबरोबरच पुरातत्व विभागाच्या टीमला कंडी सुकूह मंदिरात अनेक मौल्यवान रत्न, दागिने, भांडी अशा वस्तू सुद्धा मिळाल्या.

या सगळ्या वस्तूंवरून आणि इंडोनेशियात सतत मिळणाऱ्या पुराव्यांवरून इंडोनेशिया आधी हिंदू राष्ट्र असल्याचा दावा तिथल्या पुरातत्व विभागाने केला आहे.

त्या कलशातील द्रव अजूनही जसंच्या तसं आहे हे पाहून थक्क व्हायला होतं. त्या कलशात नेमकं काय आहे, हे अजून तरी पुरातत्व विभागाला समजलेलं नाही.

इतिहासात कंडी सुकूहसारखी किती तरी रहस्ये दडलेली आहेत. पण प्रत्येकच रहस्याचा उलगडा मनुष्याला होणे शक्य नाही.

===

हे ही वाचा – ब्रह्म देवाचं एकच मंदिर असण्यामागे कारणीभूत आहे ‘सावित्रीचा शाप’!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version