आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
२०२० च्या सुरुवातीपासूनच कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. याच कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊनदेखील सुरु झाला. या लॉकडाऊनचा फटका आमपासून खासपर्यंत सर्वानाच जोरदार बसला. मात्र याचा सर्वात मोठा आणि दीर्घ परिणाम झाला पर्यटनाच्या क्षेत्रावर.
==
हे ही वाचा : खूषखबर! भारतात हा प्रयोग यशस्वी झाला, तर तुम्ही हवेतून पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल!
==
कोरोनामुळे अनेक देशांनी त्यांच्या सर्व बॉर्डर आणि देशाबाहेर जाणारी वाहतूक सेवा बंद केली. याचा परिणाम पर्यटनावर झाला. ज्या लोकांचे जीवन या पर्यटनावर अवलंबून आहे, त्यांना तर त्याचा तोटा झालाच मात्र देशाला पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही याचा परिणाम झाला.
यासर्व गोष्टींवर दिल्लीच्या या ट्रॅव्हल एजेंसीने एक नामी शक्कल लढवली आहे. लसीचा तुटवडा पर्यटनावर झालेला परिणाम या दोन्ही बाबींचा विचार करून या एजेंसीने या दोन गोष्टींना एकत्र करून एक ट्रॅव्हल पॅकेज तयार केले आहेत.
ही ट्रिप दिल्ली ते मॉस्को अशी २४ दिवसांची असणार आहे. यात तुम्हाला रशियाची सैर तर होणारच आहे सोबतच स्फुटिनिक-वी या लसीचे दोन डोस देखील दिले जाणार आहे. भारतीयांना लस देण्यात रशियाची परवानगी असल्याने ही लस सहज घेता येणार आहे.
Tell your friends to follow Sputnik V on Twitter!✌️
Our social media followers will be the first to be invited to get #SputnikVaccinated in Russia when the program starts. pic.twitter.com/Sxn17cjlmQ— Sputnik V (@sputnikvaccine) April 1, 2021
रशियात जर परदेशी नागरिक ७ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तिथे लस मिळू शकते. त्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, जे ट्रॅव्हल कंपनीच करणार आहे. शिवाय तिथे दोन लसींमध्ये २१ दिवसांचे अंतर ठेवले आहे.
==
हे ही वाचा : गर्दी टाळून पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल, तर या ऐतिहासिक लेण्यांना भेट द्याच!
==
त्यामुळे तिथे पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथे लसीचा पहिला डोस दिला जाईल. त्यानंतर पुढचे काही दिवस तुम्हाला मॉस्को आणि परिसराची टूर करण्यात येईल. या संपूर्ण ट्रीपसाठी तुम्हाला १ लाख ३० हजारापर्यंत खर्च येणार आहे.
या खर्चात तुमचे विमान तिकीट, नाश्ता, जेवणासह तिथे काही दिवसांचा फिरणाचा खर्च समाविष्ट आहे. मात्र व्हिसासाठी लागणारे १०००० हा अतिरिक्त खर्च तुम्हाला करावा लागणार आहे.
या ट्रीपसाठी तुमचा कोरोनाचा आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असणे बंधनकारक आहे. तिथे पोहोचल्यावर तुम्हाला क्वारंटाईन होण्याची देखील आवश्यकता नाही.
या ट्रीपची पहिली ३० लोकांची बॅच आधीच रशियाला रवाना झाली आहे. दुसरी बॅच मेच्या शेवटी जाणार असून, जूनमध्ये देखील या ट्रिप होणार आहेत.
तुम्हाला देखील लस घेण्यासोबतच रशिया फिरायचे असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.
===
हे ही वाचा : सेलिब्रिटी मालदीवला निसर्ग सौंदर्यासाठी जात नाहीत! त्यामागे आहेत वेगळीच कारणं!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.