Site icon InMarathi

औषधं बनवणं ते आत्म्याशी संवाद साधणं – झाक्री लोकांविषयी तुम्हाला ठाऊक आहे का?

shaman inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

देव-दानव या संकल्पनेवर आपल्यापैकी काहींचा विश्वास असतो, तर काहींचा असतो सुद्धा… या देव आणि दानव हे विषय जसे अगदी सहजरित्या बोलले आणि चर्चिले जातात, तितक्या सहजपणे भूतखेतं, आत्मा वगैरे विषयांबद्दल सुद्धा आपण अनेकदा बोलत असतो.

अगदी लहान असताना भुतांच्या गोष्टी ऐकण्यापासून ते मोठं झाल्यानंतर, आपल्या आजूबाजूच्या मंडळींकडून मला हा असा अनुभव आला वगैरे पर्यंत बरंच काही आपण ऐकलेलं असतं. काहींचा आत्म्यावर विश्वास असतो, काहींचा यावर अजिबात विश्वास नसतो. आपल्या आजूबाजूला अशी दोन्ही प्रकारातील माणसं असतात.

या सगळ्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. या लेखाचा उद्देश सुद्धा कुठल्याही अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही, मात्र एका अशा जमातीबद्दल आम्ही सांगणार आहोत, जी थेट आत्म्याशी संवाद साधते असं मानलं जातं.

 

 

त्यांच्याकडे अगदी पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे… त्यांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून आत्म्याशी सुरु असलेला हा संवाद त्यांना वैद्यकीय मदतीसाठीही मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरतो असंही ते मानतात.

ही जमात आहे नेपाळमधील… झाक्री या नावाने ही जमात ओळखली जाते. Shamanism या इंग्रजी शब्दाचा नेपाळी भाषेतील अर्थ झाक्री असा होतो. Shamanism ही अशी एक धार्मिक प्रथा आहे, ज्यात एखादी विशिष्ट व्यक्ती आत्म्याशी संवाद साधत असते.

===

हे ही वाचा – ज्या रस्त्यांवर रात्री खूप भयानक अनुभव येतात, ते भारतातील रस्ते माहित आहेत का?

===

कोण आहेत झाक्री

पोटापाण्यासाठी आपला मायदेश सोडून भारतात येणारी नेपाळी मंडळी आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. चायनीजच्या गाडीवर, वॉचमनच्या  खुर्चीत बसलेले हे नेपाळी लोक तर आपल्याला ठाऊक असतात. पण नेपाळमध्येही अनेक जाती-जमाती अस्तित्वात आहेत.

 

 

या अनेक प्रकारच्या लोकांपैकी तमंग, मगर, राय, लिंबू आणि गुरुंग, शेर्पा या वंशातीळ विशिष्ट लोक, झाक्री या जमातीत मोडतात. हीच मंडळी आत्म्याशी संवाद साधतात आणि त्याचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करत असतात. इतरांवर कुठल्याही प्रकारचं संकट किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल, तर ते दूर करण्याचं काम झाक्री करतात.

शमन होण्याची प्रक्रिया खडतर

तरुणाईपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कुणीही शमन म्हणजेच झाक्री असू शकतं. मात्र, सामान्य माणसापासून शमन होण्याचा प्रवास अतिशय खडतर असतो. मोठ्या कठीण चाचण्या देऊन मगच शमन होता येतं.

शमन होण्याच्या कठीण परीक्षांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची चाचणी असते, ती म्हणजे चक्क आठवडाभर उपाशी राहण्याची. बरं, या काळात केवळ उपाशी राहायचं नसतं, तर जंगलातील एका गुहेत वास्तव्य करावं लागतं.

या विधीचं नावही ‘गुफा’ असं आहे. गुफा या हिंदी शब्दाचा मराठी अर्थ गुहा असाच होतो. म्हणजेच गुहेशी संबंधित असणाऱ्या या विधीचं नाव या वास्तव्यावरूनच पडलं असावं.

 

 

शमन होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती उपाशी पोटी सात दिवस गुहांमध्ये राहतात. हिंदू धर्मीय असणारी ही मंडळी या वास्त्यव्यादरम्यान विविध पूजादेखील करतात. याकाळात पूजेसह मंत्रपठणही केलं जातं. मध्यरात्री जळत्या शेकोटी आणि राखेभोवती नृत्य करण्याचा विधीसुद्धा यात समाविष्ट असतो.

===

हे ही वाचा – ‘सहारा’ वाळवंटातही तगलेली ही जमात अरबांच्या जुलुमाखाली भरडली जातेय!

===

झाक्री नेमकं काय करतात

वैद्यकशास्त्र, दवाखाने, इस्पितळं अस्तित्वात नव्हती त्या काळात झाक्री म्हणजेच ही शमन मंडळी रुग्णांवर उपचार करत असत. गावागावातील प्रत्येक रुग्ण त्यांच्या उपचारांनी बरे होत असत.

आजही अनेकजण हे उपचार मानतात. अंगदुखीसारख्या काही आजारांसाठी आजही गावांमधील अनेकजण शमन लोकांचा रस्ता धरतात. इतकंच नाही, तर डॉक्टर उपचार करू शकले नाहीत असा कुठलाही रुग्ण हा हमखास शमन व्यक्तींची भेट घेतो.

आत्म्याशी संवाद साधण्याची कला अस्तित्वात असल्याने, त्याचाच वापर करून ही मंडळी औषध निर्मिती करतात असं मानलं जातं. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या उपचारांनी लोक बरे होत असल्याची उदाहरणंसुद्धा पाहायला मिळतात.

 

 

इतर धार्मिक बाबींमध्येही सहभाग

लग्न, अंत्यसंस्कार अशा मानवी जीवनातील महत्त्वाच्या दिवशी झाक्री उपस्थित असतात. त्यावेळी विविध धार्मिक विधी पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. याशिवाय शेतातील धान्यकापणीसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय मानली जाते.

आत्म्याशी संवाद

आपल्या या दैवी शक्तीच्या आधारे ते आत्म्याशी संवाद साधून त्याला बोलावून घेऊ शकतात. त्यांनी बोलावल्यामुळे प्रकट झालेले हे आत्मा नंतर त्यांच्या शरीरात प्रवेश करतो. शमनमार्फत हा आत्मा त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधतो.

या आत्म्याला बोलावत असताना आजूबाजूला विशिष्ट पद्धतीने वाद्य वाजवली जात असतात. यात मुख्यत्वे करून ढोल, पडघमसारख्या वाद्यांचा समावेश असतो. असा संपूर्ण लवाजमा घेऊन ही प्रथा पार पाडणाऱ्यांना धमी-झाक्री असं म्हटलं जातं.

याशिवाय अधिक जास्त अनुभवी आणि अधिक ज्ञानी व्यक्तींना कुल-धमी म्हटलं जातं. यांनी मात्र ढोलवादन, मंत्र, जप यांची आवश्यकता नसते. ते केवळ एका बंद खोलीत आपल्या दैवी शक्तीच्या आधारे देवतांशी आणि आत्म्याशी संवाद साधू शकतात.

 

 

संवाद पूर्ण होईपर्यंत हा आत्मा शमनच्या शरीरात कायम असतो. कुटुंबातील मंडळींशी संवाद साधून समाधानी झाल्यावरच हा आत्मा निघून जातो. या प्रथेला नेपाळी भाषेत ‘चिंता’ असं म्हटलं जातं. हिंदू, बौद्ध, तिबेटी अशा विविध धर्म आणि संस्कृतींमध्ये ही प्रथा पाळली जाते.

हे घडतं कसं

नेपाळमधील पहाडी भागात आजारपण हे अशुभ शक्तीचं लक्षण मानलं जातं. आजूबाजूला वसतीच्य आजूबाजूला वावरणाऱ्या अशुभ शक्तींचा तेथील लोकांवर प्रभाव आहे असं मानलं जातं.

हा प्रभाव वाढला की आजारपण येत असल्याची धारणा या लोकांमध्ये आहे. हे आजारपण अनेकदा फार लांबतं. त्यावर कुठलेही उपचार फायद्याचे ठरत नाहीत. असं झाल्यावर आत्म्याशी संवाद साधूनच या आजारातून बरं करता येऊ शकतं, जे काम झाक्री म्हणजेच शमन करत असतात.

 

 

पुरुष आणि स्त्री यांच्यापैकी कुणीही शमन होऊ शकतं. ही ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी शमन त्याचा वापर करत असतात. भूतखेतं आणि या अप्रिय, वाईट शक्ती त्यांना दिसणं, हे त्यांच्या दैवी देणगीचा भाग मानलं जातं. या शक्तींचा विनाश त्यांना करता यावा यासाठी हे सारं घडत असतं, अशी मान्यता आहे.

जंगलामध्ये औषध निर्मिती

शमन लोक  जंगलात आतमध्ये जाऊन त्यांच्या औषधांची निर्मिती करतात. हे जंगल इतके घनदाट असते, की तो परिसर नेहमीच डावामुळे ओलसर राहिलेला असतो. अशा भागात हव्या असणाऱ्या विशिष्ट वनस्पती शोधून त्यांची खोडं, पाला यांचा वापर करून औषध निर्मिती करण्यात येते.

 

 

त्यासाठी आग पेटवण्याचे मोठे कष्टाचे कामही त्यांना करावे लागते. दवामुळे संत ओल्या असणाऱ्या या झाडांमध्ये अग्नीनिर्माण करणं हे त्यांच्यासाठी मोठं दिव्य असतं.

या सगळ्या परिस्थितीवर मात करून त्यांची औषध निर्मिती होत असते. याच औषधांचा वापर उपचारांसाठी केला जातो.

अशी ही शमन जमात वर्षानुवर्षे हयात आहे आणि आपल्या शक्तींच्या जोरावर समाजातील लोकांची मदत करण्याचे कार्य अविरतपणे करत आहे.

===

हे ही वाचा – जमिनीवरून आकाशात बाणांचा वर्षाव करत त्या विदेशी माणसाला धडा शिकणारी जमात

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version