Site icon InMarathi

सध्याच्या मालिका डोकं बाजूला ठेऊन बघण्यापेक्षा ह्या १० सुंदर जुन्या मालिका पुन्हा बघा!

serial poster im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपल्याकडे लॉकडाऊनमध्ये जसे रस्ते सामसूम असायचे तसे ८०च्या दशकात देखील सकाळी रस्ते सामसूम असायचे त्यामागचं कारण होत रामायण महाभारत यासारख्या पौराणिक मालिकांचं प्रक्षेपण.

८० च्या दशकात नुकताच भारतात टीव्ही नामक प्रकार दाखल झाला होता. आजच्यासारखे तेव्हा घरोघरी टीव्ही नसायचे त्यामुळे गल्लीत अथवा शेजारीपाजारी ज्यांच्याकडे टीव्ही असेल त्यांच्याकडे लोक गर्दी करत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रामायण महाभारत या मालिका साप्तहिक होत्या त्यामुळे साहजिकच लोकांना दर आठवड्याला नव्या कथेची, भागाची उत्सुकता असायची. आजच्यासारखं डेली सोप ट्रेंड तेव्हा अस्तित्वात देखील नव्हता.

 

 

रामायण महाभारतबरोबरीने देख भाई देख, बुनियाद, ऑफिस ऑफिस, फौजी, मालगुडी डेज यासाख्या वेगवेगळ्या धाटणीच्या सिरियल्स लोकांचं मनोरंजन करायच्या, आज हिंदीतले नावाजले गेलेलं कलाकार याच सिरियल्स मधून आलेले आहेत.

हिंदीत एकीकडे अशा धाटणीच्या सिरियल्स चालत होत्या तर मराठी पाऊल कसे मागे पडेल, चिमणराव गुंड्याभाऊ, दामिनी, शेती विषयी मालिका त्याकाळातसुद्धा होती ती म्हणजे आमची माती आमची माणसं, तेव्हा चॅनेल किंवा केबल प्रकार नुकताच सुरु झालेला असल्याने या सर्व मालिका सह्याद्रीवर लागायच्या.

 

 

मालिकांचे २००,३०० भाग करणं हे त्याकाळात जिकरीचे कारण तंत्रज्ञान फार प्रगत नव्हते, पूर्वीच्या मालिका २०,३० भागात संपायच्या.

मराठी मालिकांचे सुवर्णकाळ उजाडायला २००० साल उजाडावं लागलं, तेव्हा अल्फा नावाने आताचे झी मराठी हे चॅनेल सुरु झाले. ज्या चॅनेलने मराठी माणसांची नाडी अगदी व्यवस्थित पकडली आणि दजेदार अशा मालिका प्रसारित केल्या. ज्या मालिका आजही लोक युट्युब वर जाऊन पुन्हा पाहतात.

सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे पुन्हा एकदा घरात अडकलेलो आहोत, आताच्या मालिकांचे फ्रेश भाग बघण्यापेक्षा जुन्या आठवणींना उजाळा देऊयात…

१. प्रपंच :

प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीयल आजही एकत्र कुटुंबपद्धतीची महती सांगते. समुद्रकिनारी टुमदार घर, घरात तीन पिढ्या, पिढीप्रमाणे प्रत्येकाचे विचार, घराघरातले संवाद, तगडी कलाकार मंडळी, अशी उत्तम भट्ट जमून आलेली ही सिरीयल आजही प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेते.

 

 

घर आणि तीन पिढ्या म्हंटले की वाद संवाद होणारच पण कुठेही अतिरेक नाही, भडक पात्र, संगीत नाही, मागे असलेल्या समुद्राप्रमाणे संथ पण श्रवणीय पार्शवसंगीत. प्रतिमा ताईंच्या उत्तम कलाकृतीपैकी एक.

२. आभाळमाया :

आज मराठीत जे अनेक कलाकार उत्तम काम करत आहेत ते सगळे याच सिरियलच्या साच्यातून बाहेर पडलेले आहेत. नवरा सोडून गेल्यावर, तीन मुलींना वाढवणे ते सुद्धा एकट्या स्त्रीने. तसेच त्याच मुली मोठ्या झाल्या नंतरचा त्यांचा प्रवास, एकीकडे समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टींवर ही मालिका बेतलेली होती.

 

हे ही वाचा – दूरदर्शनवरील एका सिरीयलचा असाही परिणाम: शेतकरी झाला मशरूमचा राजा!

३. घडलंय बिघडलंय :

आज चला हवा येऊ द्या, कॉमेडी एक्सप्रेस मध्ये ओढून ताणून विनोद निर्मिती करत आहेत. त्याकाळात या सिरीयलने पारंपरिक भारूड, गवळण  यांचा आधार घेत सामाजिक राजकीय घटनांवर उपहासात्मक असे विनोदी स्किट सादर केले जात होते.

 

 

४. वादळवाट :

दिग्दर्शक विनय आपटे यांच्या तालमीत तयार झालेल्या मंदार देवस्थळी, यांनी दिग्दर्शित केली ही मालिका, राजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, वकिली व्यवसाय आणि कुटुंब यासारख्या मसाल्यांची एक उत्तम कलाकृती म्हणजे वादळवाट, देवराम खंडागळे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे.

 

 

विशेष लक्षात रहाणारे म्हणजे सिरीयलचे टायटल सॉन्ग जे तेव्हाही आणि आजही अनेकांच्या फोनची रिंगटोन म्हणून आहे.

 

५. दामिनी :

आजच्यासारखे  प्राईम टाईम तेव्हा नव्हते त्यामुळे सह्याद्रीवर दुपारी लागणारी ही मालिका अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. दुपारी अनेक घरात थोडावेळ पडण्याची प्रथा असते मात्र लोक आवर्जून ४ ते ४.३० दरम्यान उठून ही सिरीयल पाहत असत.

 

 

एका स्त्री पत्रकाराला कसा संघर्ष करावा लागतो यावर सिरियलचे कथानक बेतले होते. प्रतीक्षा लोणकर यात मध्यवर्ती भूमिकेत होत्या.

६. गोट्या :

‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत’, हे बोल कानावर आज जरी पडले तरी आपल्याला गोट्या ही सिरीयल आठवते. कोकणातील पार्शवभूमी आणि ना. धो. महानोर यांच्या गोट्या या कांदंबरीवरून ही सिरीयल घेतली होती.

 

 

७. बेधुंद मनाची लहर :

केवळ आपला वर्ग कौटुंबिक न ठेवता बेधुंद मनाची लहर सारख्या तरुणाईला आकर्षित करणाऱ्या सिरीयल देखील येऊ लागल्या होत्या. कॉलेज विश्व्, मैत्री, प्रेम या तरुणाईच्या लाडक्या विषयांवर ही मालिका बेतली होती.

 

 

आजचे आघाडीचे दिग्दर्शक संजय जाधव यांचे पहिले दिग्दर्शन असणारी ही सिरीयल होती.

८. श्रीयुत गंगाधर टिपरे:

दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या सदरावरून ही मालिका केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केली होती. ५ जणांचे कुटुंब, हलक्या फुलक्या पद्धतीचे वातावरण सोबतीला विनोदाची साथ आणि दिलीप प्रभावळकरांचा नेहमीप्रमाणे लाजवाब अभिनय, यामुळे ही मालिका चांगलीच गाजली.

 

 

९.असंभव :

‘प्रेक्षकांना फक्त हसवणे किंवा कौटुंबिक महत्व न सांगता त्यापलीकडे जाऊन गूढकथा दाखवणे’, हाच प्रयत्न करणारी ही मालिका होती, विशेष म्हणजे यातील गूढपणा हा शेवटपर्यंत टिकून राहिला होता. कलाकारांचा उत्तम अभिनय त्याजोडीला तितकेच उत्कृष्ट दिग्दर्शन या गोष्टीमुळे लोक या सिरीयलशी चांगलेच बांधले गेले होते.

 

 

१०. उंच माझा झोका :

ज्याकाळात स्त्री शिक्षणाला विरोध होता त्या काळात रमाबाई रानडे सारख्या स्त्रिया पुढे येऊन शिकल्या आणि समाजाला देखील शिक्षणाचे महत्व पटवून दिले, याच कथेवर ही सिरीयल बेतली होती.

कथेचा काळ जरी १०० वर्षांपूर्वीचा होता तरी याकाळात देखील तो हुबेहूब साकारला होता, त्याकाळातील वातावरण निर्मिती, बोली भाषा, कलाकारांचे अभिनय, छोटी व मोठी रमाबाई साकारणारे कलाकार यामुळे एका उत्तम विषय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – स्वप्नील जोशी “अश्या” अवतारात, वाचक म्हणतात “म्हातारीचा झगा आठवला”

आज एकूणच सर्व मराठी चॅनेल वरील सिरियल्स अवस्था पाहता जुने ते सोने ही मराठी म्हण लागू पडते. आज डेली सोप मुळे मालिका बेसुमार वाढत चालल्या आहेत. त्यात TRPचे गणित सांभाळणे, यामुळे वाट्टेल ते प्रेक्षकांच्या माथी मारायचे.

अशाच मालिका मग सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होताना दिसून येतात. विवाहबाह्य संबंध, प्रेमप्रकरण, यांसारख्या गोष्टींना आता प्रेक्षकवर्ग कंटाळला आहे, हे बहुदा त्यांना कळत नसावे.

मागच्या वर्षी जसे रामायण महाभारत पुन्हा दाखवले गेले तसेच या सिरीयलसुद्धा पुन्हा आवर्जून आजच्या स्मार्ट पिढीला दाखवणे गरजेचे आहे.

चॅनेलवाले त्यांचे काम करणार, शेवटी रिमोट आपल्या हाती असतो आपल्याला काय पाहायचे आहे काय नाही, हे प्रत्येकाने ठरवावे त्यात ओटीटी प्लँटफॉर्म सारखे पर्याय आज उपलब्ध आहेतच.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version