' या ५ टिप्स वापरुन टायर्सची काळजी घ्या आणि पावसाळ्यात होणारे बाईक अपघात टाळा! – InMarathi

या ५ टिप्स वापरुन टायर्सची काळजी घ्या आणि पावसाळ्यात होणारे बाईक अपघात टाळा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मे महिना संपत आलाय, काही दिवसातच मानसून येऊन थडकेल आणि प्रत्येकाला पावसाळी ट्रीपचे वेध लागतील, ट्रेकर्स ग्रुपचे नवीन प्लॅन्स तयार होतील. सध्या कोरोना महामारीमुळे सगळीच पर्यटनस्थळं बंद आहेत. पण तरीही शक्य होईल तितकी काळजी घेऊन लोक त्यांची पावसाळी ट्रीप प्लॅन करतील.

पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माळशेज घाट अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाइक रायडर्सची गर्दी आपल्याला बघायला मिळते.  बरेच लोक पावसाळ्यातल्या बाइक राईडसाठी खूप उत्सुक असतात.

 

bike ride inmarathi

 

सुंदर निसर्ग, चहूबाजूला पसरलेली हिरवळ, पावसाने धुवून निघालेले स्वच्छ रस्ते, प्रवासात कोणत्यातरी टपरीवर थांबून केलेली चहा, वडापावची किंवा कंदाभजीची लुटलेली मजा. हे ऐकून कित्येकांना आता आपली बाईक राईड कधी प्लॅन होतीये याचीच उत्सुकता लागली असेल.

पण तुम्हाला माहितीये का याच सुखावाह पावसाळ्याच्या मौसमात सर्वात जास्त बाईक अपघात होतात. रस्ते निसरडे असल्याने आपल्याही नकळत मोटरसायकल घसरतात, आणि अपघात होतात.

आज आम्ही तुम्हाला त्याविषयीच काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत. पावसाळ्यात बाईक चालवताना खासकरून कोणती काळजी घ्यावी? बाईकच्या टायर्सची काय काळजी घ्यायची?

हे ही वाचा सुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स

तुमची पावसाळी बाईक राईड सुखरूप व्हावी आणि पावसाळ्यात तुम्हाला बाईक चालवताना कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून या काही महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी!

१. पहिल्या पावसानंतर बाईक चालवणं टाळा :

 

first rain inmarathi

 

काही लोकं खूप उत्साही असतात, पहिला पाऊस पडला रे पडला की त्याची मजा घ्यायला ते थेट बाईक काढून लांब राईडला जातात. पण पहिला पाऊस पडल्यावर रस्ते जास्त निसरडे होतात, तसेच इतके दिवस टायर्सची सध्याची परिस्थिति माहीत नसल्याने बाईक घसारण्याचे चान्सेस जास्त असतात.

फक्त पहिला पाऊसच नाही, शक्यतो नंतरही पाऊस पडून गेल्या गेल्या लगेच बाईक चालवणं टाळायलाच हवं!

२) कोरड्या भागावरून गाडी चालवा :

 

bike skit inmarathi

 

पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात त्यामुळे बाईकची पकड कमी होऊन टायर आणखीन गुळगुळीत होतात, त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात बाईक चालवताना कोरड्या रस्त्यावर किंवा कमी ओल्या लेनमधून गाडी चालवावी.

३) पुढच्या ब्रेकचा वापर कमी करा :

 

disc brake inmarathi

 

लहानपणी सायकल शिकतानासुद्धा आपल्याला सतत ही गोष्ट सांगितली जाते की पुढचा ब्रेक हा खूप अर्जंट लागतो!

तसंच सध्याच्या बऱ्याचशा मोटरसायकलला पुढे डिस्क ब्रेक दिलेला असतो, एमर्जन्सिसाठीच त्या अर्जंट ब्रेकचा वापर करायचा असतो, या ब्रेकमुळे गाडी कोणत्याही स्पीडमध्ये असली तरी ती जागच्या जागी थांबते. आणि हेच जास्त घातक ठरू शकतं.

पावसाळ्यात रस्ते निसरडे असल्याने एवढा अर्जंट ब्रेक लावल्याने गाडी घसरून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो पुढच्या ब्रेकचा वापर कमीच ठेवा आणि मागच्या आणि पुढच्या दोन्ही ब्रेकचा वापर एकत्र करा

४) स्पीडब्रेकर्सवर ब्रेक खूप काळजीपूर्वक वापरा :

 

speedbreaker inmarathi

 

आपल्याइथल्या स्पीडब्रेकर्सची अवस्था तुम्हाला चांगलीच ठाऊक असेल. कुठे अगदी छोटे स्पीडब्रेकर्स असतात तर कुठे भले मोठे, कुठे त्यावर खड्डे पडेलेले असतात तर कुठे त्यावर खडी पडलेले असते, आणि पावसाळ्यात तर त्यांची स्थिति आणखीनच बिकट होते.

त्यामुळे या अशा स्पीडब्रेकर्सवर गाडी हळू करताना अत्यंत काळजीपूर्वक ब्रेकचा वापर करा, कारण स्पीडब्रेकर्सचा आकार आणि टायरचा खालचा भाग यांच्यात काही गडबड झाली तर गाडी तिथेच घसरू शकते!

५) टायर्सची नियमित काळजी घ्या :

 

bike tyres inmarathi

 

फक्त पावसाळ्यातच नाही तर इतरही दिवसांत टायर्सची नियमित काळजी घ्या. त्यात हवा किंवा नायट्रोजन भरत असाल तर तो किती प्रेशरने भरताय साधारण किती दिवसांचे अंतर ठेवून भरताय याकडे लक्ष द्या.

प्रत्येक ऋतुत टायरमध्ये विशिष्ट प्रेशरनेच हवा भरली जाते त्यामुळे पेट्रोलपंपवर किंवा इतर ठिकाणी हवा भरताना दुर्लक्ष करू नका. हवा सतत कमी होत असल्यास पंक्चर नाहीये ना याची खात्री करून लवकरात लवकर ते काढून मोकळे व्हा.

हे ही वाचा गाड्यांच्या टायर्सचा रंग काळा का असतो? वाचा यामागची थक्क करणारी कारणं

सध्या ट्यूबलेस टायर्सचा जमाना असला तरी त्यांची तितकीच काळजी घेणं गरजेचं असतं. घर्षण होऊन गुळगुळीत झाल्याने गाडीचे टायर्स ठराविक कालावधीनंतर बदलावे लागतात त्याकडेही लक्ष द्यावे.

 

bike ride 2 inmarathi

 

जसं एखाद्या बाईक राईडला गेल्यावर जो आनंद आपल्याला आपली गाडी देते तशीच आपण तिची काळजी घ्यायलाच हवी, तुम्ही पण येणाऱ्या पावसाळ्यात कुठे बाईक राईडला जाणार असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा. तुमचा प्रवास सुखकर होवो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?