Site icon InMarathi

बँक अकाउंटशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलण्याचे सोप्पे मार्ग!

online banking 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोना काळ असला, लॉकडाऊन सुरु असले, तरी बँकेचे व्यवहार पूर्णपणे बंद नाहीत. बँकेचे व्यवहार बंद होऊ सुद्धा शकत नाहीत. अर्थात, घरच्या घरी बसून हे व्यवहार पूर्ण करणं हल्लीच्या काळात तसं सोपं झालं आहे.

हे व्यवहार पूर्ण झाल्यावर त्याबद्दल आपल्याला मिळणारी माहिती सुद्धा आता मोबाईलच्या माध्यमातून अगदी लगेच कळू शकते, हेही आपल्याला माहित असेल.

सध्या मोबाइल नंबर तुमच्या बँक खात्याशी संलग्न असणे खूप महत्वाचे झाले आहे. तुम्ही तुमच्या बँकेचा कोणताही व्यवहार केला, की लगेच तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मेसेजद्वारे त्या व्यवहाराबद्दल माहिती मिळते. या मेसेजमुळे आपला व्यवहार बरोबर झाला आहे की नाही ते देखील समजते.

आपला मोबाइल नंबर अकाऊंटशी संलग्न असणे सध्याच्या काळात खूपच गरजेचे झाले आहे. अलीकडच्या काळापासून आपण अनेक बँक फ्रॉडबद्दल ऐकत, पाहत आलो असल्याने आपला मोबाइल नंबर बँकेत रजिस्टर्ड असण्याचे फायदे सर्वश्रुत आहेत.

==

हे ही वाचा : ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात

==

तुमचा मोबाइल नंबर जर तुमच्या बँक अकाऊंटशी जोडलेला नसेल तर तो बँक अकाऊंटशी संलग्न करणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या महामारीच्या काळात बँकेत जाऊन नंबर अपडेट करणे शक्य नसल्याने तुम्ही ही प्रक्रिया घरी बसून देखील करू शकता?

 

 

त्यातही जर तुमच्याकडे नेटबँकिंगची सुविधा असेल, तर तुमच्यासाठी ही प्रक्रिया अधिक सुकर होते. कशी ती जाणून घेऊया.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेच्या नेटबँकिंग वेबसाइटवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर प्रोफाइलवर क्लिक करावे. त्यानंतर पर्सनल डिटेलवर क्लिक करा. तिथे तुम्ही तुमचा प्रोफाइल पासवर्ड टाकून सबमिट करा.

===

हे ही वाचा : “कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत

===

 

सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि जुना नंबर दिसेल, ज्यात मोबाइल नंबर बदलण्याचा पर्यायही असेल.

त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाइल नंबर बदलू शकता. जर तुमच्याकडे इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन मोबाइल नंबर बदलू शकता.

 

 

कोरोनाच्या या कठीण काळात घरी बसून, सुरक्षित वातावरणात जर काम होणं शक्य असेल, तर तोच पर्याय निवडणं कधीही उत्तमच.. नाही का!!!

===

हे ही वाचा : DMart चे फ्री कुपन मिळणारा WhatsApp मेसेज : आणखी एक भयंकर गंभीर ऑनलाईन फ्रॉड

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version