आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जुन्या काळातील हिंदी गाणी म्हणजे एक निराळंच सुख असतं. त्या सुमधुर गाण्यांमधील बरीचशी गाणी ही एव्हरग्रीनच म्हणायला हवीत. हल्लीच्या काळातील ढिंच्याक गाणी ही सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडतील अशी शक्यता कमीच असते.
जुन्या गाण्यांचं मात्र तसं नाही. ती गाणी जरा नीट कान देऊन ऐकली, की आपोआपच आवडतात, ऐकावीशी वाटतात आणि मग मनात घर करून हळूहळू चादर पसरत ओठांवरही रुळू लागतात. आपण कधी गाणं गुणगुणू लागलो, हे आपलं आपल्यालाही कळत नाही.
त्या गाण्यांचे शब्द, संगीत, गायक आणि मग पडद्यावर साकारलं गेलेलं त्यांचं रूप या सगळ्याच गोष्टी निराळ्या… मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता दीदी, अशा ताई, मुकेशजी एक ना अनेक किती गायकांची नावं नमूद करावीत.
अशा या अप्रतिम गायकांनी आपल्यासाठी गाणी गावी, एखादं गाणं फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीने गावं असा हट्ट मनात असावा, असे अनेक प्रसंग मनोरंजन विश्वात अनेकदा घडले. एखादं गाणं, हे केवळ त्याच गायकाकरिता बनलं आहे असा ठाम विश्वास असावा आणि मग येन केन प्रकारेण त्याच गायकाकडून गाणं गाऊन घ्यावं. असे प्रसंगही कमी नाहीत.
===
हे ही वाचा – पडद्यावर अतिशय सुंदर दिसणारी ही सर्व गाणी एका वेगळ्याच तारेवरच्या कसरतीची उदाहरणं आहेत
===
असाच एक प्रसंग घडला होता, अनिल कपूर आणि किशोर कुमार यांच्या बाबतीत… अनिल कपूर म्हणजे चिरतरुण नायक आणि किशोरदा म्हणजे चिरतरुण आवाज! पडद्यावर अनिल कपूर आणि त्यांना किशोर कुमार यांचा आवाज हे समीकरण सुद्धा छान जमून यायचं.
किशोरदांचे चाहते होते अनिल कपूर
किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. त्यांचे चाहते आजही कमी नाहीत. आजची तरुणाई सुद्धा त्यांच्या चाहत्यांच्या यादीत अगदी सहज सामावून गेली आहे. तसेच आजही तरुण भासणारे अनिल कपूरसुद्धा त्यांचे चाहते होते. अभिनेता म्हणून पडद्यावर आपली छाप पडायला सुरुवात केली, त्याआधीपासूनच!
अनिल कपूर यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलासुद्धा त्यांना किशोरदा यांचा आवाज लाभला होता. मात्र एक अशी वेळ आली, ज्यावेळी अनिल कपूर यांच्यासाठी किशोरदा यांचं प्लेबॅक नसेल की काय अशी शंका निर्माण झाली. हे घडलं होतं ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटादरम्यान…!!
नेमकं काय घडलं
शेखर कपूर यांचं दिग्दर्शन, बोनी कपूर-सुरिंदर कपूर यांची निर्मिती, अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी अशी अभिनयाची उत्तम फळी असलेल्या या सिनेमाची गीतं जावेद अख्तर यांनी लिहिली होती.
या चित्रपाटातील गीतांसाठी किशोरदा पार्श्वगायन करत होते. ‘काटे नहीं कटते’, आणि ‘करते हैं हम प्यार मिस्टर इंडिया सें’ या गाण्यांचं रेकॉर्डिंग तर पूर्ण झालं होतं. मात्र संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि किशोरदा यांच्या काहीतरी बिनसलं.
किशोर कुमार यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीसह काम न करण्याचा निर्णय घेतला.
‘जिंदगी की यही रीत हैं’ या गाण्याचं रेकॉर्डिंग झालेलं नव्हतं. गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेते अनिल कपूर या दोघांचीही मनापासून इच्छा होती, की हे गीत किशोरदा यांच्याच आवाजात रेकॉर्ड व्हावं.
किशोरदा मात्र पार्श्वगायन न करण्याबद्दल ठाम होते. खरं तर बराच काळ किशोर कुमार यांच्याशी संपर्क साधणं सुद्धा शक्य होत नव्हतं. तरीदेखील अनिल कपूर आणि जावेद अख्तर मात्र त्यांनीच हे गीत गावं यासाठी आग्रही होते.
===
हे ही वाचा – अनिल माधुरीच्या ‘त्या’ सुपरहीट गाण्याचं शूटिंग चक्क किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये झालं होतं!
===
अनिल कपूर यांची मध्यस्ती
मोठ्या प्रयत्नांती अनिल कपूर आणि किशोरदा यांचा संपर्क झाला. यानंतर अनिल कपूर यांनी किशोरदा यांच्याकडे भेटीची मागणी केली. ही भेट जादुई ठरली. अनिल कपूर यांनी किशोरदा आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा संपर्क घडवून आणला.
अनिल कपूर यांच्या या मध्यस्थीनंतर त्यांच्यातील बेबनाव संपला. किशोरदा यांच्या स्वभावाची ख्याती आपणही ऐकली आहेच. मोठ्या मिश्किल स्वभावाचे किशोर कुमार यांचा राग विरघळला. त्यांनी ‘जिंदगी की यही रीत हैं’ गाण्याची तयारी दाखवली.
किशोर कुमार यांनी मिस्टर इंडिया सिनेमातील हेही गाणं गायलं आणि आणखी एक सदाबहार गीत निर्माण झालं.
मिस्टर इंडियाची गाणीही गाजली…
अनिल कपूर यांच्यासाठी किशोरदा यांनी पार्श्वगायन केलंय आणि गाणं सुपरहिट झालंय अशी ही काही पहिली वेळ नव्हती, याआधी सुद्धा ‘मुझे तुम याद करना और मुझको…’, ‘लिये सपने निगाहों में’ अशी गाणी सुपरहिट झालीच होती.
किशोरदा यांचा आवाज असलेली मिस्टर इंडिया या चित्रपटातील गाणी सुद्धा खास ठरली. ‘काटे नहीं कटते ये दिन ते रात…’ आणि ‘जिंदगी की यही रीत हैं’ ही गाणी तर आजही आपल्या ओठांवर रेंगाळत असतात.
जावेद अख्तर यांचे शब्द असणारं ‘जिंदगी की यही रीत हैं’ हे गाणं अखेर अनिल कपूर यांच्या मध्यस्थीमुळे किशोरदा यांनी गायलं. सुंदर शब्दांना छानशा संगीताची जोड असूनही, काय सांगावं कदाचित किशोरदांच्या आवाजात हे गाणं ऐकता आलं नसतं, तर हे गाणं सदाबहार ठरलंही नसतं.
===
हे ही वाचा – आभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.