Site icon InMarathi

कोरोनाविरुद्ध वापरलं जाणारं हे शस्त्र कधी तुमचाच घात करेल हे कळणारही नाही

gargale inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा धोका जसा वाढू लागला तसे घराघरात डॉक्टरांचा जन्म झाला” असा विनोद होत असला तरी ही बाब पुर्णपणे असत्य नाही.

कोरोना हा ‘न भुतो न भविष्यति’ रोगाशी दोन हात करण्याचे प्रयत्न सर्वचस्तरावर होऊ लागले. यापुर्वी कधीही या रोगोशी परिचय नसल्याने डॉक्टरांनी वेगवेगळ्या उपचारांचे प्रयत्न सुरु केले तर शास्त्रज्ञ प्रभावी लस शोधण्यासाठी अहोरात्र झटू लागले.

 

 

असेच प्रयत्न भारतातील प्रत्येक घरात सुरु झाले. रोग झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा तो रोग होवू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे हा थोरामोठ्यांचा सल्ला सर्वांनाच पटला.

सर्दी, खोकला, कफ, घसादुखी ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असल्याचं WHO ने जाहीर केल्यानंतर या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी हरत-हेचे उपाय केले जात आहेत. मग त्यामध्ये ऐरवी कडू वाटणारे काढेही आनंदाने प्यायले गेले तर गुळवेलीसारख्या आयुर्वेदिक औषधांनाही पसंती मिळाली.

 

 

पुन्हा एकदा आजीचा बटवा उघडला गेल्याने अनेक घरगुती उपायांना प्राधान्य दिले गेले, यामधील एक महत्वाचा उपाय म्हणजे गुळण्या!.

घशाची खवखव असो, इन्फेक्शन किंवा सर्दी, खोकल्यामुळे दुखणारा घसा, कोणत्याही विकारासाठी पुर्वीपासून गुळण्या केल्या जातात. किंबहुना वातावरणात झालेला बदल, किंवा हवेतील इन्फेक्शन, किटाणू यांपासून बचाव करण्यासाठीही हा उपाय प्रभावी ठरतो.

डॉक्टरांकडूनही गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो.

 

 

तर कोरोनाच्या या युद्धात अनेकांनी गुळण्या करण्याला आपलं शस्त्र म्हणून स्विकारलं. एकाअर्थी हा अत्यंत बहुणुगी उपाय आहे यात शंका नाही, मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच!

टिव्हीवरील जाहिराती किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांनी दिलेले सल्ले यांमुळे अनेकांनी या गुळण्यांचे प्रमाण वाढवले. आपल्या आजुबाजुच्या घरांमध्ये किंवा मित्रमंडळींकडे नजर वळवली तरी याचा प्रत्यय येईल.

गुळण्या केल्याने कोरोना होणारच नाही असा ठाम विश्वास व्यक्त करणारे अनेकजण आजही दिवसातील जास्तीत जाास्त वेळा गुळण्या करत गरम पाण्याची वाफही घेतात.

मात्र या शस्त्रांचा अतिरेकी वापर कधी तुमच्याच जीवावर बेतेल याची तुम्हाला कल्पनाही नसेल.

विश्वास बसत नाहीये? मग गुळण्यांचा अतिरेक झाल्यास त्याचे हे धोकादायक परिणाम तुम्ही वाचायलाच हवेत. 

हे ही वाचा – कोरोना काळात कोरडा खोकला सतावतोय? मग हे घरगुती उपाय आजच करा

१. उच्चरक्तदाब, कॉलेस्ट्रॉलची वाढ

कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करण्यावर अनेकांचा भर असतो. मीठाचे गुणधर्म लक्षात घेता घशातील इन्फेक्शनवर मीठ प्रभावी आहे यात शंका नाही, मात्र त्याचा अतिरेक प्रकृतीच्या नव्या समस्यांचे कारण ठरू शकतो.

गुळण्या करताना काही प्रमाणात पाणी शरीरात जातेच, त्यामुळे त्यातील मीठाचे प्रमाण अधिक असल्यास जास्त प्रमाणात मीठही शरिरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल किंवा स्थुलत्व अशा तक्रारी असणा-यांना मुळातच मीठ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी दिवसातून ३ हून अधिक वेळा गुळण्या केल्यास त्यामुळे शरिरातील मीठाचे प्रमाणही वाढते आणि सातत्याने असे होत राहिल्यास ही बाब गंभीर ठरू शकते.

 

२. तोंडाचा अल्सर

घसा दुखत असल्यास मोजक्या वेळी गेलेल्या गुळण्या प्रभावी ठरतात, मात्र पाण्याचे तापमान गरजेपेक्षा जास्त उष्ण असेल आणि अशा उष्ण पाण्याने वारंवार गुळण्या केल्या गेल्या तर घसा, जीभ या अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो.

गरजेपेक्षा जास्त वेळा गुळण्या केल्याने तोंड आल्याची समस्या या वर्षभरात अनेकांना जाणवली असेल, सातत्याने गरम पाण्याचा जीभेशी संपर्क साधाल्यास शरिराचे तापमान वाढते. तसेच जीभेला बसणा-या चटक्यांमूळे जीभ, गालाच्या आतील त्वचा यांना फोड येतात. अशावेळी खातानाही त्याचा त्रास जाणवतो.

 

 

परिणामी हा त्रास टाळण्यासाठी अनावश्यक वेळी गुळण्या टाळाव्यात.

३. घशाला सुज येणे 

तोंड, घसा, जीभ हे नाजूक अवयव आहेत, या अवयवांना अतिरिक्त उष्णतेची सवय नाही, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसातून तीनाहून अधिक वेळा गुळण्या केल्यास यामुळे घशाला सूज येण्याचीही शक्यता असते.

 

 

४. लहान मुलांबाबत सावधान

मोठ्यांना गुळण्या करण्याची सवय असते, मात्र लहान मुलांना ही सवय नसते. लहानग्यांना कोरोनाचा असलेला धोका लक्षात घेता अनेक पालक लहान मुलांवरही गुळण्या करण्याची सक्ती करतात.

हा उपाय मुलांना बालरोगतज्ञांनी सांगितला असेल तर योग्य आहे, मात्र डॉक्टरांना न विचारता हा उपाय केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

 

 

मुलांना गुळण्या करण्याची योग्य पद्धत ठाऊक नसते, अनेकदा ते पाणी त्यांच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. अशावेळी अत्यंत सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

हे ही वाचा – सावधान : रोज ‘काढा’ घेताय? आधी हे वाचा, नाहीतर…

गुळण्या करण्याचे योग्य प्रकार

१. फ्रीजमधील थंड पाणी किंवा गरजेपेक्षा जास्त उष्ण पाणी अशा दोन्ही प्रकारांच्या पाण्याचा वापर टाळावा. गुळण्या करताना घशाला सहन होईल इतक्या तापमानाचे पाणी घ्यावे. कोमट पाण्याने गुळण्या करमे सर्वोत्तम असल्याचा सल्ला डॉक्टर देतात.

२. घसा, खोकला यापैकी कोणताही त्रास जाणवत असल्यास गुळण्या करा मात्र त्याचा अतिरेक टाळा, दिवसातून २ किंवा जास्तीत जास्त ३ वेळा गुळण्या करणे योग्य, मात्र त्याहून जास्तवेळा गुळण्या केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

३. पाण्यात हळद टाकूनही गुळण्या करणे प्रभावी ठरते. हळदीतील अॅण्टिबॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घशातील खवखव कमी होते.

 

 

४. दुपारी तसेच रात्री जेवणानंतर गुळण्या कराव्यात.

५. गुळण्या करताना पाण्यात अनेकजण बेटॅडिनसारखी औषधांचा वापर करतात. ही औषधं उपयुक्तही असतात, मात्र त्यांचा अतिरेक नको, शिवाय अनेकांना काही औषधांतील घटक हानीकारक ठरतात. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नव्या औषधाचा वापर करा.

 

 

कोरोनाचा धोका लक्षात घेता सावधानता बाळगणं, काळजी घेणं हे गरजेचं आहेच, मात्र हे उपाय करताना त्यांचा अतिरेक होत नाही ना? या उपयांचा शरिराला अपाय होत नाही ना? याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version