आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेल्या वर्षी आलेल्या कोरोना या साथीच्या आजाराने अक्षरशः मानवी जीवन विस्कळीत करून टाकले, अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाले देशाची आर्थिक घडीच बिघडून गेली त्यात पुन्हा लोक सावरत असताना, दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती ओढवली गेली.
कोरोनावर आता लसी उपलब्ध झाल्यात काही जणांनी त्या घेतल्यासुद्धा, त्यातलाच काही जणांना लस घेऊनसुद्धा कोरोना होत आहे त्यामुळे साहजिकच लस हा उपाय नाही हे लोकांच्या लक्षात आले त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे आहे.
कुठलाही रोग आला तरी आपल्याकडे भारतात अस्स्सल देशी उपाय केले जातात, भारतात आजही अनेक ठिकाणी रोगांवर अघोरी उपाय केले जातात. आपल्याकडील आदिवासी जमात तर जंगलातील झाडाच्या पाल्यांनी आपले रोग बरे करतात, त्यांना कोणत्याच डॉक्टरची गरज नसते.
–
हे ही वाचा – कोरोना काळात कोरडा खोकला सतावतोय? मग हे घरगुती उपाय आजच करा
–
मागच्या वर्षी कोरोनाकाळात एका गोष्टीने कोरोनापेक्षा थैमान घातले होते ते म्हणजे काढा, सर्दी खोकला आला की आजही अनेक घरात काढे दिले जातात. त्याच धर्तीवर कोरोनासारख्या आजरांवर देखील असाच एक रामबाण काढा तयार करण्यात आला होता.
घरोघरात हा काढा तयार करून घरातल्याच लोकांना जबरदस्तीने तो पाजण्यात आला, आपण भारतीय कुठलीच गोष्ट प्रमाणात करतात नाही, त्यामुळे या काढ्याचा देखील अनेकांनी अतिरेक केला. त्यामुळे साहजिकच त्या काढ्याचे दुष्परिणाम देखील अनेकांना झाले.
अनेक तज्ज्ञ लोकांनीदेखील सांगितले होते, हा काढा प्रमाणातच आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेच घ्यावा, कारण त्यात वापरले जाणारे घटक हे उष्ण असल्याने तसेच आपला घास हा नाजूक असल्याने त्या भागाला आग पडू शकते असे ते वारंवार सांगत होते.
काही महिन्यांपूर्वी रामदेव बाबांनी देखील कोरोनीलसारखे औषध बाजारात आणले जे कोरोनवर मात करू शकते मात्र नंतर त्यांनी यावर घुमजाव केला.
वाफ घेणे, हात स्वछ धुणे, मास्क लावणे या गोष्टी आपण नित्यनियमाने करतोच मात्र यापलीकडे जाऊन काढ्याचे अतिरेक कारण आरोग्यसाठी घातक आहे.
मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात असे सांगिलते होते की लिंबाच्या रसाचे थेंब जर नाकात टाकले तर कोरोना हा आजार बरा होतो.
वास्तविक लिंबू हे फळ अनेक आजरांवर उपाय म्हणून वापरले जाते, अँटी बॅक्टरीयल म्हणून ते काम करते तसेच व्हिटामीन सीचा प्रमुख स्रोत म्हणून लिंबाकडे पहिले जाते. आज अनेक घरात रोज कोणत्या तरी पदार्थत लिंबू हे वापरले जातेच. लिंबाचं सरबत तर हमखास बनणारं पेय.
असं हे लिंबू खरंच कोरोनसारख्या महाभयंकर आजवर देखील उपयोगी पडू शकतं का? चला जाणून घेऊयात यामागचं तथ्य आणि तज्ज्ञांचे यावर काय म्हणणं आहे…
तथ्य काय?
पीआयबी या संस्थेने व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून, त्याची पडताळणी करून तो पूर्णपणे फेक असल्याचे त्यांनी सांगितले. या गोष्टीमागे कोणताही ठोस शास्त्रीय पुरावा नाही.
–
हे ही वाचा – कोरोनामुक्त झाल्यावरही येणाऱ्या ‘अशक्तपणावर’ मात करण्याचे ७ सोप्पे घरगुती उपाय!
–
ऑक्सिजन लेवल वाढवण्यसाठी होमियोपॅथीची एक गोळी उपयोगी पडते, अशी चर्चा चालू होती मात्र आरोग्य विभागाने यावर आक्षेप घेतला असून लोकांनी स्वतः कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत असा सल्लाही दिला आहे.
लिंबू खरं तर बहुउपयोगी मानले जाते मात्र कोरोनसारख्या आजारावर हे उपयोगी पडणारे नाही, आज कोरोनावर जगभरातून संशोधन केले जात आहे. काही देश मात्र कोरोनामुक्त झाले देखील, मात्र आपल्याकडे असे खोटे उपाय सांगून लोकांना उगीच आणखीन संभ्रमात टाकत आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.