Site icon InMarathi

कॅल्क्युलेटरवरील ‘या बटणांचे’, तुमचा वेळ वाचवणारे उपयोग; जाणून घ्या, मित्रांनाही सांगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या वस्तूंची मदत घेत असतो. आपल्या आयुष्यात असणाऱ्या अशा छोट्या-मोठ्या मशिन्समुळे जीवन अतिशय सोपे झाले आहे.

याच मशीनच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे ‘कॅल्क्युलेटर’. लाखो, करोडो अशा मोठ्या आकड्यांचे अगदी क्षणात हिशोब करणारा कॅल्क्युलेटर सर्वानाच माहित असेल. हल्लीच्या काळात तर, तो मोबाईलच्या रूपात, थेट खिशात जाऊन बसलाय.

हा कॅल्क्युलेटर वापरत असताना, त्यावर काम करत असताना, आपण फक्त आपल्याला गरजेची अशी, रोजच्या वापरातील बटणं वापरतो.

 

 

मात्र त्याच कॅल्क्युलेटरवर अंकांसोबतच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या नियमित बटणांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळी बटणं असतात. ज्याबद्दल आपल्या फार काही माहिती नसतं. आज आपण त्याच अनोळखी बटणांबद्दल जाणून घेणार आहोत.

===

हे ही वाचा :  किबोर्डवर शिफ्ट, कंट्रोल, अल्टच्या दोन किज का असतात? बघा तर!

===

 

कॅल्क्युलेटरमध्ये MS, MR, MC, M+, M-, C, CE ही बटणं आपल्याला कॅल्क्युलेटर वापरताना नेहमीच दिसतात. मात्र या बटणांचा अर्थ काय आणि त्याचा वापर कधी, कसा करतात हे आपल्याला माहित नसते. आज या लेखातून आपण तेच आज जाणून घेऊया.

MS (Memory Store) :

या बटनाचा वापर करून आपण एखादी संख्या सेव्ह करू शकतो. हिशोब करताना आपल्याला ज्या संख्येची सतत गरज पडणार आहे, ती संख्या टाईप करायची आणि मग MS बटण दाबायचे.

त्यानंतर ती संख्या कॅल्क्युलेटरच्या मेमरीमध्ये सेव्ह होईल आणि आपल्याला ती संख्या पुन्हा पुन्हा टाईप करायची गरज पडणार नाही.

 

 

MR (Memory Recall)

हे बटण दाबल्यास सेव्ह केलेली संख्या समोर येते.

 

 

MC (Memory Clear)

हे बटण दाबून, आपण सेव्ह केलेली संख्या मेमरीमधून काढून टाकू शकतो. त्यानंतर आपण दुसरी कोणतीही संख्या पुन्हा सेव्ह करू शकतो. या व्यतिरिक्त, कॅल्क्युलेटरमध्ये (M+) आणि (M-) नावाची दोन महत्वाची बटणे देखील असतात जी MS, MR आणि MC ला मदत करण्याचे काम करतात.

 

 

M+

MS द्वारे सेव्ह केलेल्या नंबरला दुसऱ्या संख्येत जोडण्यासाठी, M+ हे बटण वापरतात.

M-

MS द्वारे सेव्ह केलेल्या नंबरला इतर कोणत्याही संख्येमधून कमी करण्यासाठी M- हे बटण वापरतात.

 

 

कॅल्क्युलेटरवर नेहमी काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना C आणि चे या दोन बटनांमधील फरक माहित नसेल. CE बटण दाबले तर शेवटची टाइप केलेली संख्या काढून टाकली जाते, तर C बटण दाबल्यामुळे स्क्रीनमधून सर्व संख्या निघून जातात आणि शून्य येतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version