' गुजरातने चर्चिलेला हा स्टार्ट अप प्रत्येक राज्याने सुरु केला तर मेक इन इंडियाचं स्वप्न नक्की पूर्ण होईल! – InMarathi

गुजरातने चर्चिलेला हा स्टार्ट अप प्रत्येक राज्याने सुरु केला तर मेक इन इंडियाचं स्वप्न नक्की पूर्ण होईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला पवित्र मानून, गोमाता म्हणून तिची पूजा केली जाते. इतकेच नव्हे तर गोमय (शेण), गोमुत्र, गायीच्या दुधापासून बनवलेले तूप हे सुद्धा धार्मिक कार्यात, होम हवनासाठी वापरले जाते.

घरात काही अपवित्र गोष्ट घडल्यास गोमुत्र शिंपडून घर पवित्र केले जाते. नैवेद्य सुद्धा गोग्रास दिला तरच देवापर्यंत पोचतो अशी धारणा आहे. शिवाय पोळा, वसुबारस ह्या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.

थोडक्यात आपला देश कृषिप्रधान असल्याने तसेच त्यांच्यापासून मिळणाऱ्या विविध गोष्टींमुळे गाय, बैल ह्यांना लोकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे, म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये त्यांना पवित्र मानतात.

 

indian-cow-worship-marathipizza
pagalparrot.com

 

हल्लीच गोरक्षणासाठी भारत सरकारने कायदे कडक केले आहेत. पण ह्याही पुढे जाऊन गुजरात मध्ये आता गोधनापासून नवीन व्यवसाय सुरु करण्यास प्राधान्य दिले आहे.

Cow Startups मुळे cow-based industry निर्माण होण्यास चालना मिळेल. ह्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल, नवीन व्यवसायाचे क्षेत्र खुले होईल शिवाय गोवंशाचे रक्षण सुद्धा होईल.

गुजरात सरकारचा असा विचार होता की,

गोमूत्र, गायीचे दूध, तूप आणि गोमय ह्यांना इकॉनॉमी मध्ये अंतर्भूत केले जाऊ शकते. त्याने छोटी गावे, शहरे ह्याठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळू शकेल.

 

cow-startup-marathipizza01
yourstory.com

 

गायीचे दूध, तूप व गोमुत्र औषधी आहे हे आयुर्वेदात सांगितले आहे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या रिसर्च मध्ये सुद्धा हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच अनेक सौंदर्य उत्पादनांच्या व औषधांच्या निर्मितीमध्ये ह्या गोष्टींचा उपयोग केला जातो.

ह्या स्टार्टअप चा उद्देश हा होता की गायीपासून मिळणाऱ्या वस्तूंचे नवीन माध्यमांद्वारे branding व मार्केटिंग करणे.

ह्यात गोपालन, दुध व इतर दुग्धजन्य पदार्थ जसे तूप वगैरे ,तसेच गोमुत्र ,गोमय ह्यांची विक्री करणे ह्या सर्वांचा समावेश होतो.

गोधनाचा वापर उत्पन्न मिळवण्यास करण्यासाठी गुजरात मध्ये गो-सेवा आयोगाची निर्मिती केली आणि ते मोठ मोठ्या उद्योगपतींकडून आणि इंडस्ट्रीमधील लोकांकडून ह्यासाठी सपोर्ट मागत आहेत.

त्यांचे असे म्हणणे होते की

आजवर गोधनाकडे एक प्रोडक्ट ह्या दृष्टीने बघितले गेलेले नाही, गोधनामुळे व्यापार उद्योगाला चालना मिळू शकते. खेड्यातील लोकांना कुठेही बाहेर न पडता हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

 

cow-startup-marathipizza02
navodayatimes.in

 

गौसेवा आयोगाचे चेअरमन डॉक्टर वल्लभ काठीरिया म्हणाले,

गो पालन आणि गोधनाचा उपयोग करून अनेक प्रोडक्ट्सची निर्मिती होऊ शकते. हे प्रोडक्ट्स व्यावसायिकरीत्या मार्केट मध्ये यशस्वी होऊ शकतात. फक्त ह्याचे व्यवस्थित branding आणि मार्केटिंग व्हायला हवे. ह्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळेल. आजवर ह्या पद्धतीने विचारच केला गेला नव्हता.

ह्या गो उत्पादनांची विक्री मोठ्या शहरांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन द्वारे करण्याला मोठा वाव आहे. तसेच हे स्टार्ट अप्स छोट्या गावांमध्ये तसेच लहान शहरांमध्ये सुरु करण्यासही खूप वाव आहे.

ह्यामध्ये गो पालन करणारे स्त्रियांचे गट सहभागी होतील अशी आशा आहे.

 

cow-startup-marathipizza03
india.com

 

हा आयोग “गौ संत संमेलन” आयोजित करण्यात आले होते. ह्या संमेलनातून गोरक्षणासंबंधी नवीन झालेल्या कायद्यांविषयी जनजागृती करण्यात आली. आणि ह्या नव्या व्यवसायाचा लोकांमध्ये प्रचार करण्यात आला.

भविष्यातही ही संकल्पना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली तर खरच एक नवीन व्यवसाय सुरु होऊन गावातील व लहान शहरातील अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल आणि गोधनाचे रक्षण व संवर्धन सुद्धा आपसूकच होईल.

हे देखील वाचा: (ह्या भारतीय जातीच्या गाईं समोर विदेशी हायब्रीड गायी अगदी फिक्या आहेत)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?