' हापूस फळांचा राजा आहेच पण; या १० दुर्मिळ आंब्यांचा स्वाद तुम्ही अनुभवलाच पाहिजे! – InMarathi

हापूस फळांचा राजा आहेच पण; या १० दुर्मिळ आंब्यांचा स्वाद तुम्ही अनुभवलाच पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एप्रिल आणि मे महिना सुरू झाला की प्रत्येक घरात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. शाळकरी मुलांना सुट्ट्या असतात त्यामुळे त्यांचा घरात धुडगूस सुरू असतो.

दिवसभर त्यांचं बाहेर उन्हात खेळणं, आणि मग खेळून झालं की १० रूपयाच्या बर्फाच्या गोळ्यावर ताव मारणं, १ रुपयाचा पेप्सीकोला खाणं, अशा कित्येक गोष्टी आपणसुद्धा आपल्या लहानपणी अनुभवल्या असतील.

 

pepsicola inmaarathi

 

घरातसुद्धा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. घरात पिण्याच्या पाण्याचा माठ भरून ठेवणे त्यात वाळा घालणे, घरातल्या एसी कुलर्सचं काम करून घेणे अशी लगबग सुरू असते.

पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ज्याची लहानांपासून वृद्ध सगळेच आतुरतेने वाट बघत असतात, तो म्हणजे फळांचा राजा आंबा, आणि त्यातही मे महिन्यात हापूस आंबा नाही खाल्ला तर मग जीवन व्यर्थ आहे अशाच नजरेने लोकं तुमच्याकडे बघतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या महाराष्ट्रात हापूस, केसर, पायरी असे काही आंबे आहेत जे प्रामुख्याने खाल्ले जातात. पण दूधपेढा , दूरी, गुलाबखस, कालापहाड, इमरती, शेंदर्‍या, शककरगोटी, मारुत्या, पपय्या, ही काही खाद्यपदार्थ, मिठाई किंवा शीतपेयांची नावे नाहीत… ही नावे कशाची आहेत माहिती आहे का? मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडत्या आंब्याची!

खरी गम्मत तर ही आहे की, मधुर चवीच्या, अवीट आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणार्‍या आंब्याच्या बर्‍याच जाती आपल्याला माहिती नसतात.

 

mango inmarathi

===

हे ही वाचा सध्या आंबा रोज खाताय; पण फळांच्या राजाच्या या गोष्टी तुमच्या ध्यानीमनीही नसतील

===

सर्वांचा आवडता हापूस सोडला तर अजूनही काही आंब्याच्या जाती आहेत ज्या रसाळ चवीच्या तर आहेतच पण दुर्मिळदेखील आहेत. चला माहिती करून घेवू या आम्र कुलाची.

१) कोहितूर :-

 

kohitur mango inmarathi

 

बंगालचा नवाब सिराज-ऊद-दौला याने ही आंब्याची जात विकसित केली. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील असलेल्या या आंब्याचे मूळ १४८ प्रकार होते पण आता केवळ ४२ प्रकार शिल्लक राहिलेत.

हा आंबा चवीला अतिशय रसाळ असून तेवढाच नाजुकदेखील आहे. एका खास बांबूच्या सूरीनेच तो कापावा लागतो. तसेच झाडावरून उतरवल्यावर खास कापडात ठेवावा लागतो. राजा महाराजांसाठी खास बनवलेला हा आंबा प्रती नग ५०० ते १५०० रुपयात मिळतो.

 

२) नुरजहान :-

 

noorjahaan mango inmarathi

 

जसा कोहितूर तसाच हादेखील दुर्मिळ आणि शाही. पण आंब्यांची राणी म्हणून ओळखला जातो. मध्यप्रदेशातील काठठीवाडा क्षेत्रात याची लागवड केली जाते. चवीला अतिशय मधुर असणारा हा आंबा वजनाला भारी म्हणजे १ ते २ किलो असतो.

जूनच्या अखेरीस बाजारात येतो. ५०० ते १२०० रु. प्रती नग विकला जातो. बडोदा, वापी, अहमदाबाद इथून या आंब्याला चांगली मागणी असते.

 

३) आम्रपाली :-

 

aamrapali mangoes inmarathi

 

दशहरा व नीलम यांच्या संकरातून १९७१ मध्ये हा आंबा कृषि अनुसंधान केंद्र दिल्ली येथे विकसित केला गेला. चवीला अत्यंत गोड, पातळ सालीचा, फळात रेषा नसलेला असतो.

===

हे ही वाचा लॉकडाऊन वाढलाय, घरी आंबे पण आहेत; तर आंब्याच्या या १२ डीशेस् एकदा ट्राय करून बघाच!

===

४) भारत आंबा :-

 

bharat mango inmarathi

 

केरळमधील थ्रीसुर जवळील मुंदूर येथे वर्षातून तीन वेळा बहर येणार्‍या या आंब्याची चव प्रियूर व मुवांदन या स्थानीक प्रजातीच्या एकत्र चवीसारखी लागते. एक फळ साधारण ३०० ग्रामचे असते.

५) गोटी / काली गोटी :-

मोठ्या गोटीच्या आकाराएवढा हा स्थानिक ग्रामीण आंबा, हिरव्या सालीचा, गोड आणि केशरी रसाचा, कोय अगदी छोटी असणारा गावकूसातला पण आता दुर्मिळ झालेला आंबा. याचाच अजून एक भाऊबंद आहे तो म्हणजे काली गोटी. हा देखील दुर्मिळ झालाय.

६) साखर्‍या आंबा :-

 

sakhrya inmarathi

 

मध्यम आकाराचा आणि साखरेसारखी गोडी असणारा हा स्थानिक आंबा. पण याची लागवड आता फारशी प्रचलित नाही.

 

७) राघू / राघ्या आंबा :-

 

raghu mango inmarathi

 

साधारण तोतापुरी आंब्यासारखा दिसणारा हा आंबा. या आंब्याचा देठाच्या विरूद्ध बाजूला पोपटाच्या चोचीचा आकार असतो म्हणून हा राघू आंबा.

जाड सालीचा लोणच्याचा आंबा..आता दुर्मिळ झाला असून याची जागा तोतापुरी आंब्याने घेतली आहे.

८) बैंगनपल्ली :-

 

bainganpalli inmarathi

 

आंध्रप्रदेशातील हा प्रसिद्ध आंबा असून घट्ट रसाचा आणि फळात रेषा नसलेला आहे. यालाच सफेदा असेही म्हणतात. हा आंबा चिरून आणि रस काढूनही खाल्ला जातो. चवीला रसाळ असलेल्या या आंब्याची, टिकावू असल्याने मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

 

९) चौसा :-

 

chaunsa inmarathi

 

हा आंबा शक्यतो चोखून खाल्ला जातो. बिहार व उत्तर प्रदेशातील हा प्रसिद्ध आंबा चवीलाही भलताच गोड असतो. पातळ साल आणि सोनेरी रंग, निमुळता आकार यामुळे आकर्षक दिसणारा हा आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो.

बिहारमधील चौसा या गाववरून या आंब्याचे नाव चौसा हे पडले.

 

१०) बदामी :-

 

badami mango inmarathi

 

कर्नाटकचा हापूस म्हणून ओळखला जाणारा बदामी आंबा आकाराने बदामासारखाच दिसतो. जास्त केसर नसलेला सोनेरी पिवळ्या रंगातला, देठाकडे थोडा लालसर असलेला हा आंबा, चवीला हापूस आंब्याहूनही एकदम गोड असतो.

याशिवाय अल्फान्सो-हापूस, केशर, पायरी , रत्नागिरी हापूस, दशेरी, लंगडा, तोतापुरी, निलम, हिमसागर, मालगोवा, मालदा, सिंदूरा, रसपल्ली ही हापूसची भावंडेदेखील आपली रसना तृप्त करत आहेत.

===

हे ही वाचा देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स… चुकूनही विसरू नका!

===

मग सांगा बरे यातील कोणता आंबा तुम्हाला खायला आवडेल? तुम्हाला माहीत असलेल्या आंब्यांच्या इतर जातीही आमच्या सोबत जरूर शेअर करा आणि या मौसमात आपल्या आवडत्या आंब्याचा जरूर आस्वाद घ्या..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?