Site icon InMarathi

जगातील १० देश जेथे लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही!

tax-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखाचं शीर्षक वाचून बरेच जण बुचकळ्यात पडले असतील, म्हणत असतील हे कसं शक्य आहे? आपल्याला वाटतं आपल्या भारताप्रमाणे प्रत्येक देश हा त्याच्या नागरिकांकडून इन्कम टॅक्स वसूल करतोच. पण असं मुळीच नाही.

जगात असेही काही देश आहेत जेथील नागरिकांना आपल्या प्रमाणे इन्कम टॅक्सची चिंता करण्याची गरजच नाही, कारण त्यांना इन्कम टॅक्स भरावाच लागत नाही. चला जाणून घेऊया जगातील अश्या १० देशांबद्दल!

 

बर्म्युडा

traveltoanewcountry.com

बर्म्युडा हा अतिशय छोटा देश आहे. येथे नागरिकांना कोणताही पर्सनल टॅक्स द्यावा लागत नाही. येथील कर्मचाऱ्यांना केवळ १४ टक्के पे-रॉल टॅक्स द्यावा लागतो.

 

ब्रूनई

youtube.com

या लहानग्या देशात देखील नागरिकांना कोणताही पर्सनल टॅक्स द्यावा लागत नाही. येथे केवळ एम्पलॉयी ट्रस्ट फंड आणि सप्लीमेंटल कंट्रीब्यूटरी पेन्शन स्कीम आहे.

 

संयुक्त अरब अमिरात

stupiddope.com

संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE देश जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांमध्ये गणला जातो. येथे श्रीमंतांची कमी नाही, तरीही देशाच्या कोणत्याही नागरिकाला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. या देशात विदेशी बँका आणि विदेशी तेल कंपन्यांच्या कॅपिटल गेन इन्कमवर नॉर्मल बिझनेस टॅक्स तेवढा आकाराला जातो.

 

सौदी अरेबिया

express.co.uk

सौदी अरेबिया देशामध्ये पगारावर कोणताही टॅक्स घेतला जात नाही. परंतु बाहेरून येऊन येथे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना २० टक्के टॅक्स भरावा लागतो. त्याशिवाय या देशातील कोणत्याही नागरिकावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकाराला जात नाही.

 

बहामास

guidetocaribbean.net

बहामास या देशात सुद्धा इन्कम टॅक्स आकाराला जात नाही. येथे कॅपिटल गेन वा गीट टॅक्स देखील भरावा लागत नाही, येथे केवळ रियल इस्टेट एक्झीव्हीशन टॅक्स आणि होल्डिंग टॅक्स लागू आहे.

 

कतार

aspetar.com

तेलांच्या खाणींनी संपन्न असलेल्या या देशामध्ये जागोजागी श्रीमंत पाहायला मिळतात, परंतु तरीसुद्धा यांच्याकडून इन्कम टॅक्स घेतला जात नाही. तसेच कोणत्याही नागरिकाच्या उत्पन्नावर, डिव्हीडन्ड, कॅपिटल गेन किंवा संपत्तीवर देखील कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकाराला जात नाही.

 

ओमान

familytraveller.com

ओमान देश देखील धन दांडग्यांनी संपन्न देश आहे परंतु येथे सुद्धा नागरिकांकडून इन्कम टॅक्स घेतला जात नाही.

 

कुवेत

youtube.com

कुवेत देशातील प्रत्येक नागरिक देखील इन्कम टॅक्स पासून मुक्त आहे. परंतु येथे प्रत्येक नागरिकाला सोशल इन्शुरन्स मध्ये योगदान देणे भाग आहे.

 

कॅमेन आयलँड

fratantoniinteriordesigners.com

येथे नागरिकांना ना इन्कम टॅक्स द्यावा लागतो ना हि कोणत्या सोशल इन्शुरन्समध्ये योगदान द्यावे लागते. येथे प्रत्येक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन स्कीम चालवणे मात्र बंधनकारक आहे. यामध्ये बाहेरच्या देशातून स्थायिक झालेल्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होतो.

 

बहरीन

som.com

बहरीन देशामध्ये इन्कम टॅक्स नाही मात्र सोशल इन्शुरन्स आणि एम्पलॉयमेंट टॅक्स मात्र वेळच्या वेळ भरावा लागतो. येथील कंपन्यांना देखील आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वतीने १२ टक्के सोशल इन्शुरन्स टॅक्स भरावा लागतो.

असे आहेत हे देशांदेशांमधील वेगवेगळे कायदे!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version