Site icon InMarathi

तृतीयपंथ्यांशी निगडीत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी…

eunuch-marathipizza00

topyaps.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तृतीयपंथी अर्थात ज्यांना समाज हिजडा, किन्नर वा छक्का म्हणून ओळखतो, त्यांच्याबद्दल नेहमीच समाजातील इतर स्तरांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे. तृतीयपंथी वर्गाला जाणून वाळीत टाकल्यासारखे लोक वागवतात.

शरीरातील बदलांमुळे पुरुष असून देखील त्यांना स्त्री सारखं जगावं लागतं. अर्थात तृतीयपंथी बनण्यासाठी त्यांच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही, परंतु समाजतील इतर वर्ग जवळ करत नसल्याने त्यांना हे जीवन जवळ करणे भाग पडते.

udaipurtimes.com

काही तृतीयपंथी उच्च शिक्षित असून देखील केवळ त्यांच्या ‘अश्या’ असण्यामुळे त्यांना कामावर ठेवले जाते नाही.

परिणामी लोकांपुढे हात पसरून भिक मागण्याची पाळी त्यांच्यावर येते. आपल्या आसपास नेहमीच आपल्याला या वर्गाचे दर्शन होत असते. उगाच म्हणून ते कधीही कोणाला त्रास देत नाही (काही अपवादात्मक अनुभव सोडले तर… कारण प्रत्येक वर्गामध्ये एक असा घटक असतोच जो संपूर्ण वर्गाचे नाव खराब करतो.) त्यांना पाहिलं की ज्याप्रमाणे मनात एक किळसवाणी भावना उत्पन्न होते, त्याचप्रमाणे त्यांच्या बद्दल कुतुहूल देखील जागे होते.

तृतीयपंथी वर्गाबद्दल खऱ्या गोष्टी कमी पण जास्त अफवाच लोकांपर्यंत पोचल्या आहेत, ज्यामुळे या वर्गाची इतर समाजापुढील प्रतिमा अधिकच मलीन झाली आहे.

timesofindia.indiatimes.com

पण आज आपण तृतीयपंथ्यांशी निगडीत काही अश्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या आजही आपल्याला माहित नाहीत!

तृतीयपंथ्यांचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्येही आढळते. महाभारतामध्ये शिखंडी या पात्राचा उल्लेख आढळतो. हा शिखंडी देखील तृतीयपंथी संबोधला गेला आहे. याच शिखंडीच्या सहाय्याने अर्जुनाने भीष्मांचा पराभव केला.

पुराण काळात राजा महाराजांकडे नाच-गाणे सादर करून तृतीयपंथी आपला उदरनिर्वाह करायचे. अर्जुनाला देखील अज्ञातवासात असताना एका शापामुळे एक वर्ष बृहन्नडाच्या रुपात तृतीयपंथी बनून वावरावे लागले होते. याच रुपात त्याने राजकन्या उत्तरा हिला नृत्य आणि गायन शिकवले होते.

en.wikipedia.org

ज्योतिष शास्त्रानुसार वीर्याच्या अधिकतेमुळे पुरुष (पुत्र) उत्पन्न होतो, रक्त (रज) च्या अधिकतेमुळे स्त्री (कन्या) उत्पन्न होते आणि वीर्य आणि रज यांचे समान प्रमाण असल्यास किन्नर संतान (तृतीयपंथी) उत्पन्न होते.

असं म्हटलं जातं कि एखाद्या शुभप्रसंगी दारी आलेल्या तृतीयपंथ्याला जर रिकाम्या हाताने परत पाठवले, तर त्या प्रसंगातील शुभ शकून त्याच्यासोबत निघून जातो. त्यांना कायद्याने लग्न करण्याची वा शाळेत जाण्याची परवानगी नसली तरी सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहे. तेथे त्यांचा उल्लेख Gender E म्हणून केला जातो.

namaste.wordpress.com

तृतीयपंथी वर्गाच्या संस्कृतीची पाळेमुळे हिंदू धर्मात आढळत असली तरी सध्या मात्र या वर्गावर इस्लाम धर्माचा प्रभाव जास्त आहे. या वर्गाचे बहुतांश गुरु आणि नेते हे मुस्लीम आहेत.

इस्लाममध्ये देखील ‘हराम’ या नावाने तृतीयपंथ्यांचा उल्लेख पाहायला मिळतो. हे हराम सुलतानाच्या पदरी चाकरी करायचे. राजा महाराजांप्रमाणे या हरामांना सुलतान नाच गण्यासाठी न ठेवता आपल्या बेगमच्या कक्षाभोवती अंगरक्षक म्हणून रुजू करायचे. अनेक हरामांनी आपल्या शौर्याच्या जोरावर मुघल सैन्यामध्ये देखील पदे भूषवली होती.

उदाहरण पाहायचे झाल्यास मलिक काफुर याच्याकडे पाहिले जाऊ शकते. हा तो हराम होता ज्याने दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी ह्याच्यासाठी संपूर्ण दख्खन स्वत: ताब्यात घेतले होते.

postgenderism.weebly.com

एखाद्या पुरुषाच्या अंगी स्त्री गुण असतील आणि त्याला तृतीयपंथी म्हणून वावरायचे असेल तर त्यापूर्वी त्यांच्या शरीरातून पौरुषत्व काढून घेण्याची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची मानली जाते. हि प्रक्रिया म्हणजे त्याचा ‘हिजडा’ म्हणून पुनर्जन्म आहे असे मानण्यात येते.

तृतीयपंथ्याचा अंतिम विधी आजही एक रहस्यमय गोष्ट आहे. या बद्दल अनेक अफवा देखील समाजात प्रचलित आहेत. त्यांचा अंत्यविधी रात्रीच्या समयी पार पडतो आणि त्यात बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नसते हि गोष्ट मात्र खरी आहे.

topyaps.com

तृतीयपंथांचा वार्षिक उत्सव तमिळ कालगणनेच्या नववर्षी कुवागम या मद्रास मधील लहानग्या गावामध्ये आयोजित केला जातो, जेथे भारतभरातील सर्व हिजडे एकत्र जमतात.

तृतीयपंथी आपली आराध्य देवता अरावन याच्याशी वर्षातून एकदा लग्न करतात. पण हे लग्न केवळ एका दिवसाचं असतं. दुसऱ्या दिवशी अरावन देवाच्या मृत्यूसकट त्यांचे वैवाहिक आयुष्य देखील संपुष्टात येते.

topyaps.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version