Site icon InMarathi

कुठे राईट हॅन्ड तर कुठे लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह… याचं रहस्य चक्क इतिहासात दडलंय…!!

right feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गाडी चालवणे हा अनेकांचा छंद असतो तर अनेकांना गाडी चालवणे अत्यंत कंटाळवाणे वाटते, आज देशभरात लॉकडाऊन असल्याने अनेकांच्या गाड्या ह्या पार्किंग मध्येच पडून आहेत. त्यामुळे आता त्या गाड्या जेव्हा कधी बाहेर पडतील तेव्हा त्यांना थेट पहिले गॅरेज मध्ये न्यावे लागेल.

आज अनेकजण परदेशात कामानिमित्त जात असतात किंवा तिकडे स्थयिक होण्यासाठी जातात तेव्हा सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे प्रवास करायचा. पब्लिक ट्रान्सपोर्ट काही देशांमध्ये कमी प्रमाणात असल्याने अनेकजण स्वतःची गाडी घेणे पसंत करत.

 

 

गाडी घ्यायची  म्हंटली तरी पुढे समस्या असते ती म्हणजे चालवण्याची, कारण आपलीकडे गाडीचे स्टेअरिंग हे उजवीकडे असल्याने व ज्या देशात गेलो असू तिथल्या गाड्यांमध्ये जर डावीकडे स्टेअरिंग असते त्यामुळे पंचाईत निर्माण होते. त्यामुळे लेफ्ट हॅन्ड ड्रायविंगचा सराव होण्यासाठी वेळ लागतो.

हे लेफ्ट अँड राईट हॅन्ड ड्रायविंगची काय नेमकी भानगड आहे समजून घेऊयात

विविध देशांत एकाच कंपनीची कार जेंव्हा रस्त्यांवर उतरते तेंव्हा तिच्या स्टिअरिंग व्हिलची जागा मात्र बदललेली असते. बाकी सर्व गोष्टी समान असल्या तरीही स्टिअरिंग व्हिल मात्र डावं उजवं असतं. असं का असावं? हा काही आधुनिक काळात बनलेला नियम नाही तर, मध्ययुगात याची मूळं आढळतात –

तुम्ही कधी अमेरिकेत गेला असाल तर तुम्हाला गाडीत बसल्या क्षणी विचित्र वाटू शकतं. याचं कारण गाडी चालविणारा डाव्या बाजुला बसलेला असतो आणि गाडी रस्त्याच्या उजवीकडून चाललेली असते. आहे ना  गोंधळ?

 

हे ही वाचा – “रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत ? जाणून घ्या काय खास आहे या गाडीत

आजच्या घडीला उजवीकडे स्टेअरिंग असणाऱ्या गाड्या एकूण जगाच्या ६५% देशात चालवल्या जातात तर डावीकडे स्टेअरिंग असणाऱ्या गाड्या ३५% देशात चालवल्या जातात.

कार कंपन्या जेव्हा डावीकडून गाड्या चालवणाऱ्या देशांसाठी कार उत्पादन करतात तेव्हा त्यांना स्टिअरींग व्हिल गाडीत उजवीकडे बसवावं लागतं. तीच कार उजवीकडून गाडी चालवणाऱ्या देशात आणायची तर स्टिअरिंग व्हिल डावीकडे जातं. ही एक मजेशीर भानगड आहे जी वर्षानुवर्षं चालत आलेली आहे.

कारचं स्टिअरिंग व्हिल कोणत्या बाजूस हे रस्त्यावरून कोणत्या बाजूनं वाहतूक होते यावर अवलंबून आहे. तुम्हाला वाटत असेल की हे सगळं आधुनिक काळात नियमबध्द झालेलं आहे, तर तसं नाहीये. कारचा शोधही लागला नव्हता तेव्हापासून म्हणजे मध्ययुगापासून याची सुरवात झालेली आहे. या काळात प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर घोड वापरला जात असे किंवा पायी चालत जात असत.

 

 

रस्त्यावरून जाताना घोडा रस्त्याच्या डाव्या बाजूनी नेला जात असे. जेणेकरून रस्त्याच्या मध्यभागी त्यांचा जो वापरातला म्हणजे उजवा हात आहे तो मोकळा राहिल.

सुरक्षेसाठी प्रवासादरम्यान हत्यार बाळगलं जात असे. त्याचप्रमाणे घोड्यावर बसतानाही डावीकडून बसण्याचा प्रघात आहे. मग वाटेत जर थांबावं लागलं आणि घोड्यावर चढ उतार करावा लागला तर तो रस्त्याच्या कडेला करणं सुरक्षित होत आणि सोयिचंही.

फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत याच पध्दतीनं रस्त्यावर चाललं जात असे, घोडागाड्याही याच पध्दतीनं जात असत. त्या काळात फ्रान्समधे समाजात आर्थिक भिन्नता मोठ्या प्रमाणावर होती.

सधन लोकांकडे घोडागाड्या असत आणि त्या रस्त्यावरून धावत असताना डाव्या बाजूनं धावत, असं करत असताना पायी चालणार्‍यांना जबरदस्तीनं उजव्या बाजूनं चालायला लावलं जात असे. मात्र राज्यक्रांतीच्या अखेरीस चालणार्‍यांच्या बाजूनं गाड्या धावू लागल्या आणि याचाच परिणाम म्हणजे घोडागाडीचा कोच डावीकडे बसू लागला.

आजही ना डावे उजवे होतात ना उजवे डावे डावे अट्टाहासानं डावेच राहिलेले आहेत तर उजव्यांनीही त्यांचा हट्ट सोडलेला नाही. मुळात गाडीचं स्टेअरिंग डावीकडे का असतं? याचं कारण अत्यंत मजेशीर तर आहेच शिवाय आजच्या काळाचा विचार करता हा बादरायण संबंधच वाटेल. या सगळ्यामागे जे नाव आहे ते म्हणजे , महान योध्दा नेपोलियन. आश्चर्य वाटलं नं? यामागचं तर्कशास्त्र तर आणखीनच मजेशीर आहे.

 

 

नेपोलियन डावखुरा होता आणि घोड्यावर बसून तलवारबाजी करताना, उजव्या हातानं लगाम धरून डाव्या हातानं तलवार चालवत असे. म्हणून मग घोडा उजवीकडून जात असे. आता या घोड्याचा, तलवारीचा आणि लढाईचा काही एक संबंध कारशी नसला तरीही हा तर्क मात्र गाडीला सुकाणू बसविताना वापरला आहे ही खरंच गमतीची गोष्ट आहे. मात्र ब्रिटिशांनी नेपोलियनलान जुमानता आपलं डावीकडून जाणं चालूच ठेवलं.

 

इतकंच नाही तर ब्रिटिशांचं साम्राज्य जिथे जिथे पसरल होतं तिथे सर्वत्र हाच नियम लागु केला. म्हणूनच भारतातील व्यक्ती इंग्लंडमधे गेली की तिला गाडी चालविण्यात फ़रक जाणवत नाही मात्र तीच व्यक्ती अमेरिकेत किंवा युरोपियन देशात गेली तर तिला गाडी चालविताना विचित्र वाटतं.

 

 

आता प्रश्न असा येतो की युरोपमधल्या देशांचंही एकवेळ ठीक आहे पण अमेरिकेनं का बरं ब्रिटिशांच्या विरोधात जात डावीकडचं ड्रायव्हिंग स्विकरलं असावं? तर याचं कारण आहे की, अमेरिकेला आपली ब्रिटिश मूळं मुळापासून काढायची असल्यानं त्यांनी ब्रिटिशांच्या विरूध्द जे आहे ते स्विकारलं. मात्र या कारणाशिवाय आणखिन एक कारणही सांगितलं जातं.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यानच अमेरिकेत एक वाहन मोठ्या प्रमाणात वापरात होतं जे अमेरिकेच्या लेफ्ट हॅन्ड ड्रायव्हिंग कारसाठी कारणीभूत ठरलं.

कॉनेस्टोगा वॅगन असं या वाहनाचं नाव होतं. याचा आकार एरविच्या बग्गीच्या तुलनेनं प्रचंडच होता याचं कारण यामधून मुख्यत्वये मालाची वाहतून होत असे. त्या काळातल्या त्या लॉरीच म्हणा नंतर या वॅगनमधून शेकडो किलोचा माल नेला जात असे आणि म्हणूनच याला सहा सहा घोडे जोडावे लागत असत.

 

 

या वॅगनला कोचची स्वतंत्र सिट नसे. कोच जोडलेल्या घोड्यापैकी जो सर्वात शेवटचा डावीकडचा घोडा असे त्यावर बसत असे आणि उजव्या हातात लगाम धरत असे. या कारणामुळे वॅगन रस्त्याच्या उजवीकडून नेली जात असे. जेणेकरून रस्त्यावरची रहदारी त्याला नीट दिसावी.

१७९२ साली पेनेसिल्व्हेनियानं याप्रकारच्या वाहनरस्त्याच्या उजवीकडून चालविण्याचा अधिकृतपणे नियमच बनविला. त्यानंतर बारा वर्षांनी न्युयॉर्कनंही हा कायदा आपलासा केला आणि हळूहळू संपूर्ण अमेरिकेचाच हा नियम बनून गेला.

 

हे ही वाचा – गाड्यांच्या टायर्सचा रंग काळा का असतो? वाचा यामागची थक्क करणारी कारणं

युरोपनं नेपोलियनचा तर्क सर आंखोपर घेतला असला तरीही मग ब्रिटिशांचा उजव्या ड्रयव्हिंगचा काय तर्क असावा? तर तो अगदीच नैसर्गिक कारणावर आधारीत आहे. जगातले बहुतांश लोक हे उजवे आहेत. आपली बरीचशी कामं ते उजव्या हातानं सफ़ाईनं करू शकतात म्हणून कारही उजव्या हातानं चालविणं तुलनेनं सुलभ आहे.

घोडागाड्या जाऊन स्टिअरिंग व्हिल असणार्‍या गाड्या आल्या त्या काळात अगदी सुरवातीला बहुसंख्यांचा उजव्या हाताचा वापर लक्षात घेत स्टिअरिंग व्हिल उजवीकडेच होतं. मात्र १९०८ साली फ़ोर्ड यांनी पहिल्यांदाच मॉडेल टी मधे हे स्टिअरिंग व्हिल डावीकडे बसविलं.

कार उत्पादन कंपन्यांना डावीकडेच स्टिअरिंग्व्हिल असणं गाडी चालविण्याच्यादृष्टीनं सोपं आणि सुरक्षित वाटलं. अमेरिका हा त्या काळातली सर्वात मोठी कार निर्यातदार देश असल्यानं सहाजिकच बहुसंख्य देशांत गाड्यांचं स्टिअरिंगव्हिल डावीकडचं होतं म्हणूनच त्यांची रहदारीची बाजू उजवी बनली.

ब्रिटनभरही १८३५ पर्यंत परंपरा चाललेली होती. मात्र ब्रिटन पार्लमेंटनं कायदा करून वाहतूक रस्त्याच्या डावीकडूनच झाली पाहिजे असा नियम काढला. ब्रिटीशांची सत्ता असलेले देश अशा रीतीने  डावीकडची रहदारी आणि उजवीकडचं स्टिअरिंगव्हिल असणारे राहिले. अशा रीतीने  एकीकडे  ब्रिटनचा कायदा आणि दुसरीकडे नेपोलियनचा फ़तवा यामुळे तमाम जग डाव्या आणि उजव्यात विभागलं गेलं. घोडा गाड्या जाऊन स्वयंचलीत कार्स आल्या तरीही  ही विभागणी आजही आहे तशीच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version