' नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जाणारी सुप्रसिद्ध “चायनीज कालिमाता”…! – InMarathi

नूडल्स आणि मोमोजचा नैवेद्य दाखवला जाणारी सुप्रसिद्ध “चायनीज कालिमाता”…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा मंदिरांचा देश आहे. जितकी मंदिरे तितक्या रूढी आणि तितक्याच प्रथा.. आणि या प्रथा देखील निरनिराळ्या आणि इंटरेस्टिंग. इतकेच नाही तर मंदिरातील देवतेसमोर दाखवले जाणारे नैवेद्य, त्यातही व्हारायटी..आहे न गमतीची गोष्ट.

पण तुम्हाला जर समजले की एका मंदिरात देवीला चक्क नूडल्स, चॉपस्टिक, मोमोज, फ्राईड राईस यांचा नैवेद्य दाखवला जातो तर? आहे ना अमेझिंग? चला तर जाणून घेवूया या नूडल्सच्या नैवेद्यामागची चायनीज कहाणी..

कलकत्त्याच्या टेंगरा (चायना टाऊन) भागातील गोष्ट, साधारण ६० वर्षांपूर्वी या भागात कालीमातेचे कोणतेच मंदिर नव्हते. केवळ एका झाडाखाली काही काळ्या दगडांची देवी म्हणून स्थानिक लोकांकडून पुजा-अर्चना केली जात असे.

 

kaali devi inmarathi

 

त्या भागात इतर लोकांबरोबरच काही चायनीज लोकही रहात होते. त्यांच्यापैकी एक लहान मूल आजारी पडले. अनेक प्रकारचे उपचार करूनही ते मूल काही बारे होईना. त्यावेळी कोणीतरी त्या मुलाच्या पालकांना त्या झाडाखालील देवीची उपासना करायला सांगितली.

===

हे ही वाचा विचित्र नैवेद्य ते सांगाड्यांची पूजा! अत्यंसंस्काराच्या विचित्र पद्धती तुमची झोप उडवतील

===

हा ही उपाय करून बघू या विचाराने त्या चायनीज आई वडिलांनी त्या झाडाखालच्या देवीची उपासना केली आणि अहो आश्चर्यम! त्यांच्या मुलाच्या तब्येतीत फरक पडू लागला. काही दिवसांनी ते बाळ पूर्ण बरे झाले.

त्यानंतर त्या भागातील चायनीज लोकांनी देवी कालीची भक्ती करायला सुरवात केली. काही वर्षानी त्यांनी त्या काळ्या दगडांभोवती मंदिर बांधले. ज्यांना कालिमातेच्या नावाने पूजले जात होते.

सध्याचे ग्रनाईट दगडात बांधलेले मंदिर हे १९ वर्षे जुने आहे. त्याचबरोबर त्या मंदिरात देवी कालीच्या दोन पारंपारिक मुर्तींची देखील स्थापना करण्यात आली आहे.

त्या भागातील भक्तांबरोबर देवीचे चायनीज व बौद्ध भक्त देखील म कालीच्या दर्शनाला तेथे मोठ्या संख्येने येतात. म्हणून या मंदिराचे नाव ही चायनीज काली मंदिर असे पडले आहे.

 

chinese kaali mandir inmarathi

 

वर्षभर जरी चीनी आणि बंगाली शेजारी शेजारी असूनही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करत नसले तरी काली मातेच्या मंदिरात आणि परिसरात मात्र वेगळे चित्र पहायला मिळते. सारा परिसर एका उर्जेने उजळल्यासारखा वाटतो.

आठवड्यातील इतर दिवशी देखील हे चीनी बांधव तेव्हड्याच उत्साहाने देवीचे दर्शन घेताना दिसतात. मंदिराचे ५५ वर्षीय व्यवस्थापक ईसोन चेन यांनी संगितले की काली पुजा आमच्यासाठी खास आहे.

मंदिरातील सेवेला पहाटेच सुरवात होते. प्रत्येकाला त्याची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्याप्रमाणे कोणी पूजेसाठी फुले आणतो, कोणी नैवेद्य आणि प्रसादासाठी फळे आणि मिठाई आणतो, तर काहीजण इतर व्यवस्था पाहतात.

एक बंगाली पंडितजी रोज सकाळी संध्याकाळी येऊन कालिमातेची पूजा व आरती करतात. त्याचप्रमाणे कालीमातेची चीनी पद्धतीनेही पूजा केली जाते. मोठ्या मेणबत्त्या आणि खास चायनीज ईसेन्स असलेल्या अगरबत्त्या दुर्गापूजेच्या वेळी देवीसमोर लावण्यात येतात.

 

chinese kali temple inmarathi

 

या खास चायनीज पद्धतीने बनवलेल्या असून इतर कोणत्याही दुर्गापूजेच्या मांडवात त्या दिसत नाहीत. काली मातेचे हे मंदिर परस्पर सामंजस्याचे प्रतीक बनले आहे.

===

हे ही वाचा बंगालमधील दुर्गा पूजेची सुरूवात इंग्रजांनी केली होती! स्थानिक जमीनदारांना खिश्यात घालण्यासाठी!

===

इथली अजून एक परंपरा अशी आहे की या मंदिराच्या परिसरात कोणाची दृष्ट किंवा नजर लागू नये म्हणून handmade पेपर जाळला जातो. अगदी देवीला नमस्कार देखील चायनीज पद्धतीने केला जातो. आज जगभर जातीद्वेष, वर्णद्वेष यांमुळे झगडे होत असताना हे चायनीज काली मंदिर एकात्मतेचे प्रतीक बनले आहे.

ह्या मंदिराच्या कहाणीवरून हेच दिसून येते की धर्म आणि श्रद्धा या दोन भिन्न गोष्टी आहेत. तुमच्या जवळ विश्वास आणि श्रद्धा असेल तर धर्म कोणता आहे याने काहीच फरक पडत नाही.

तेंगारा मधील चायनीज सांगतात की आमच्यापैकी काही ख्रिश्चन आहेत, काही बौद्ध आहेत.. पण तरीही आम्ही कालीमातेची पुजा करतो.

हे मातामंदिर आमच्या समाजाचे अविभाज्य अंग आहे. पण मंदिराचे खरे वैशिष्ट्य तर दुसरेच आहे, ते म्हणजे या मंदिरात माता काली ल चक्क नूडल्स, चॉप्सी, मोमोज यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच प्रसाद म्हणूनही ग्रहण केला जातो.

 

noodles inmarathi

 

यातील नजर किंवा दृष्ट लागणे या गोष्टींवर विश्वास ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग असला तरी स्वादिष्ट नूडल्स आणि मोमोजच्या मिळणार्‍या प्रसादामुळे हे कोलकत्यातील चायनीज काली मंदिर पर्यटक आणि काली भक्तांसाठी आकर्षणाचा विषय बनले आहे हे नक्की!

===

हे ही वाचा केरळच्या ह्या देवाला लागतो चॉकलेटचा नैवेद्य!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?