Site icon InMarathi

पूर्वी आपल्याकडे मातीच्या भांड्यात अन्न शिजवायचे ना – त्याचं महत्व थक्क करणारं आहे!

clay utensils inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काळ बदलला आणि मनुष्याच्या राहणीमानात, सवयींमध्ये अनेक मोठे बदल झाले. हे बदल फक्त राहणीमानापुरतेच मर्यादित नव्हते तर, माणसाची संपूर्ण जीवनशैलीच काळाने बदलवली. मग याला गृहिणींचे स्वयंपाकघर कसे अपवाद ठरेल?

 

 

किचनमध्ये देखील काळानुसार नवनवीन स्वयंपाकाची भांडी आली आणि जुनी मातीची आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी किचनमधून हद्दपार झाली. मात्र मागील काही काळापासून हीच मातीची भांडी पुन्हा किचनची शोभा वाढवण्यासाठी सज्ज झाली आहेत.

आजच्या नॉनस्टिकच्या काळात आपल्या पारंपरिक मातीच्या भांडयांना मिळणारी पसंती खूप चांगली आणि सुखावणारी आहे. स्वयंपाकघर आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहे. आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत याच मातीच्या भांड्यांचे आरोग्यदायी फायदे.

===

हे ही वाचा – बायकोने दिलेल्या चॅलेंजमधून तयार झाली किचनमधील सर्वात उपयुक्त वस्तू!

===

 

अन्न उत्तम शिजते

चांगल्या आरोग्यासाठी जेवण बनवताना ते हळू हळू शिजले पाहिजे. मातीच्या भांड्यात अन्न शिजताना ते हळूहळू शिजत असल्याने अन्नाची पौष्टिकता राखली जाऊन ते आपल्या शरीरास फायदेशीर ठरते.

 

 

पोषक द्रव्ये

मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळत असल्याने आपले शरीर देखील सुदृढ राहते. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नातून कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात मिळते.

 

 

तेल कमी

मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना तेल हे नॉनस्टिकपेक्षा कमी लागते. त्यामुळे अतिशय कमी तेलात आपला स्वयंपाक होतो. शिवाय या अन्नामुळे शरीरातील आम्लपित्ताची पातळी देखील राखली जाते.

 

===

हे ही वाचा – तुमच्या किचनमध्ये असलेल्या या वस्तू कधी जीवघेण्या ठरतील तुम्हाला कळणारही नाही

===

बद्धकोष्ठतेपासून सुटका

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो.

 

 

अधिक रुचकर आणि चविष्ट

मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना त्यात त्या भांड्यांचा एक वास आणि चव उतरत असल्याने अन्न अधिक रुचकर होते.

 

 

वाजवी किंमत आणि भरपूर पर्याय

अॅल्युमिनियम, नॉनस्टिक आणि इतर सर्व भांड्यांच्या तुलनेत मातीची भांडी रास्त दारात उपलब्ध होतात. सोबतच मातीच्या भांड्यांमध्ये कुकर, तवा, कढई पासून पाण्याच्या बाटल्या, हंडी आदी अनेक भांडी मिळतात.

 

 

पर्यावरण पूरक

मातीची भांडी वापरल्यामुळे निसर्गाला कोणतीच हानी पोहचत नाही. शिवाय या भांड्यांची विल्हेवाट लावणे देखील अतिशय सोपे आणि पर्यावरण पूरक आहे.

 

===

हे ही वाचा – तुमच्या किचनमध्ये “हे” पदार्थ असतील तर कोरोनाच्या संकटात बाजारात खरेदीची वणवण टळेल

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version