Site icon InMarathi

ह्या ११ भारतीय जातीच्या गाईंसमोर विदेशी हायब्रीड गायी अगदी फिक्या आहेत!

cows inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गाय म्हणजे आपल्या देशातील बहुतांश हिंदूंसाठी माताच!

एक असं पवित्र रूप जे भाविक हिंदू धर्मियांसाठी पूजनीय आहे. तर अश्या या देवतुल्य गायीचे पूर्वी फार जास्त सांस्कृतिक महत्त्व असायचे.

आजही आहेच. पण पूर्वीची परिस्थिती फार वेगळीच होती. पूर्वी ज्याच्याकडे सर्वात जास्त गायी तेवढा तो अधिक संपन्न, श्रीमंत समजला जायचा.

कारण होते गायीची उपयुक्तता.

ज्यामुळे त्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये देखील भरघोस वाढ व्हायची. अश्या या दुभत्या जनावराला लोक अगदी प्रेमाने वागवायचे आणि आजही वागवतात हे विशेष!

 

 

आजही गायीला साधी जखम जरी झाली तरी अक्ख घर तिच्या काळजीमध्ये बुडून जातं.

दुर्दैवाने गायीचा मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरते – जणू कुटुंबातीलच एखादी व्यक्ती सोडून गेली आहे.

अश्या या गायीला आपला बळीराजा अगदी प्राणापलीकडे जपतो.

तुम्हाला माहितच असेल की गायींच्या देखील जाती असतात, पण त्याबद्दल आपल्याकडे जास्त तपशील नसतो.

संपूर्ण जीवन गोठयामध्ये काढलेला माणूसच गायींच्या जातीबद्दल इत्यंभूत माहिती देऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला गायींच्या काही परिचित आणि अज्ञात जातींबद्दल सांगणार आहोत, ज्या विदेशातील हायब्रीड गायींच्या जातीपेक्षाही सरस आहेत.

देवणी गाय

 

 

दिसायला देखण्या आणि विविध स्तरांवरील प्रदर्शनांमध्ये मानांकन सिद्ध करणारारी गायीची जात म्हणजे देवणी होय. “मराठवाडा भूषण” ही पदवी देखील या जातीच्या गायीला प्राप्त आहे.

दुष्काळी स्थितीमध्ये देखील तग धरून उभी राहणारी या जातीची गाय महाराष्ट्र राज्याचे भूषण आहे.

राठी

 

 

राठी जातीची गाय राजस्थानमधील बिकानेर, गंगानगर, हनुमानगड आणि पंजाबमधील फाजीलाका भागांमध्ये आढळते.

या जातीच्या गायींची सहीने इतर जातींपेक्षा छोटी असतात आणि शरीरावर काळे आणि पांढरे डाग असतात.

अमृत महल

 

 

या जातीच्या गायींचा संबंध कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्याशी आहे. जेथे या जातीला बेन्ने चावडी या नावाने ओळखले जाते.

या गायीच्या उदरातून जन्म घेणारे बैल अतिशय मजबूत असतात, ज्यांच्या शेती आणि जडकामासाठी वापर केला जातो.

गिर

 

 

या जातीच्या गायींचे मूळ गुजरातमधील गिर जंगलातील मानले जाते. ही गाय दुध देण्याच्या काळामध्ये जवळपास ३१८२ किलो दुध देते.

त्यामुळेच इतर जातींपेक्षा गिर जातीची गाय सरस ठरते.

ओंगोले

 

 

या जातीच्या गायीचे वजन तब्बल ४३२ ते ४५५ किलोग्रामच्या आसपास असते. हि गाय वर्षाच्या २७९ दिवसांमध्ये ६०० ते २५१८ किलो दुध देते.

या गायीच्या दुधामध्ये मेद (fat) चे प्रमाण ५% च्या आसपास असते. ज्यामुळे आजही या जातीच्या गायीला मोठ्या प्रमाणावर मागणी येते.

पोंवार

 

 

उत्तरप्रदेशच्या पिलभीत जिल्ह्यामध्ये या गायी मोठ्या प्रमाणावर आढळायच्या.

या गायीमधील उत्तम वैशिष्ट्ये हेरुन शास्त्रज्ञांनी या जातीच्या गायीपासून एक नवीन जात विकसित केली. ती जात देखील याच नावाने ओळखली जाते.

पोंवार जातीची गाय भारतातील बहुतांश भागांमध्ये सहज आढळून येते

डांगी

 

 

मुंबईबाहेरील डांग नावाच्या गावामध्ये या गायीच्या जातीचे मूळ आहे असे मानले जाते.

त्यावरूनच या जातीला डांगी हे नाव पडले. या जातीच्या गायी काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात.

खिल्लारी

 

 

पश्चिम भारतामध्ये या जातीच्या गायी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

स्थानिक लोक या गायीचा उपयोग शेतीच्या कामांमध्ये देखील करतात. पण इतर जातीच्या गायींच्या तुलनेमध्ये या जातीच्या गायींची दुध देण्याची क्षमता कमी असते.

या जातीच्या गायींची देखणे रूप पाहून शेतकरी या  गायींना पांढरे सोने संबोधतात.

निमारी

 

 

या जातीची गाय मध्यप्रदेशाच्या खांडवा, इंदोर आणि बारवानी जिल्ह्यामध्ये आढळते.

या गायीच्या ब्रीडिंग साठी मध्यप्रदेश सरकारने एक ब्रीडिंग फार्म देखील सुरु केले आहे.

थरपारकर

 

 

कमी खुराक असून देखील या गायी जास्त दुध देतात. वाळवंटासारख्या ठिकाणची परिस्थिती या गायींसाठी अनुकूल असते.

या जातीच्या गायी वर्षाला १८०० ते ३५०० लिटर दुध देतात.

सिंधी

 

 

दुधाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये या जातीच्या गायी फार प्रसिद्ध आहेत.

या जातीचे मूळ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. जास्त दुध देण्याच्या क्षमतेमुळे संपूर्ण जगभरात या जातीच्या गायी पाहायला मिळतात हे विशेष!

सहिवाल

 

 

या जातीच्या गायींचे मूळ पाकिस्तानमधील सहिवाल प्रदेशाशी निगडीत आहे, परंतु सध्या भारताच्या पंजाब प्रांतामध्ये या जातीच्या गायी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

या जातींच्या गायीमध्ये उन सहन करण्याची जबरदस्त क्षमता असते. ज्यामुळे आफ्रिकन देशांमध्ये या जातीच्या गायीला चांगली मागणी आहे.

अश्या हा देशी गाई…आणि त्यांच्या सुप्रसिद्ध जाती!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version